Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाटतं असं... की!

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 06/19/2015 - 16:45
वाटतं असं... की तुझ्या हातात मोगरा भरभरून ठेवावा.. आणि सुगंधाशी सुगंधाला स्पर्धा करू द्यावी.. नक्की मला वेडं करणारा त्यातला कोणता आहे? ते शोधण्यासाठी! वाटतं असं... की पावसाने शांत झालेल्या मऊशार हिरवळीत तुझ्यासवे एकरूप व्हावं.. खऱ्या मीलनाचा मृद्गंध कळण्यासाठी! वाटतं असं... की तुझ्या हातांशी एकरूप झालेली मेहेंदी , मी नेहमी आठवावी.. हव्यास आणि सहजतेची ओढ यातला फरक.. मला समजण्यासाठी. वाटतं असं... की हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध! यात मिसळून जावं उरलेल्या सगळ्या आयुष्याचे 'जगणे' होण्यासाठी.. Rain (फ़ोटो:- फेसबुक वरून, साभार! )

प्रतिक्रिया द्या
7263 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ख
खटपट्या Fri, 06/19/2015 - 17:09 नवीन
अतीसुंदर कविता. चित्रही तेवढेच अप्रतीम.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/19/2015 - 18:32 नवीन
कवितेला चित्राची छान जोड मिळाली आहे. बाकी इकारान्त शब्द जाणुन ह्रस्व लिहिले आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 18:50 नवीन
नाही! बोंबल्या वरून लिहिल्यामुळे ज़रा मर्यादा आली. आणि बय्रा पैकी घाईत लिहिली आहे.. अत्ता सांजच्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 19:45 नवीन
आंssssssssssss फोटू कुटं ग्येला???????? :-/ दुत्त दुत्त दुत्त! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 20:11 नवीन
लावला का परत...? वाह! थांकु! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अनुप ढेरे Fri, 06/19/2015 - 17:33 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 06/19/2015 - 18:08 नवीन
गुर्जी ,तुमची परवानगी असेल तर जिलबी पाडू का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 18:26 नवीन
इचारतूस काय? जिलबी कर! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
य
यशोधरा Fri, 06/19/2015 - 18:29 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 06/19/2015 - 18:45 नवीन
वाह, किती अलवार शब्द आणि हळुवार भाव !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/19/2015 - 18:53 नवीन
सुंदर तरल कविता !
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 06/19/2015 - 19:32 नवीन
हे विशेष आवडलं वाटतं असं... की हरेक ठिकाणी तुझंच रूपक,तुझीच छटा,तुझा नाद...गंध! यात मिसळून जावं उरलेल्या सगळ्या आयुष्याचे 'जगणे' होण्यासाठी मस्त मस्त मस्त.........
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/19/2015 - 19:37 नवीन
अतिशय तरल. सुरेखच एकदम.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 06/19/2015 - 20:18 नवीन
कविता आणि फोटो एकदमच जबराट ओ आत्मूस. लै म्हंजे लैच भारी.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 06/19/2015 - 20:22 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन Fri, 06/19/2015 - 20:30 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 06/19/2015 - 20:33 नवीन
वा वा वा ही जिल्बी आव्डली :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 20:39 नवीन
@जिल्बी आव्डली :)>>> दुत्त जिल्बुचा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
पैसा Sat, 06/20/2015 - 05:37 नवीन
खासच आहे!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/20/2015 - 07:22 नवीन
खासच, आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 06/20/2015 - 07:25 नवीन
पाउस आतला आणि बाहेरचाही
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 06/20/2015 - 08:32 नवीन
फंटास्टिक् चित्र आणि आह! कविता. बुवा स्प्लिट पर्सनालिटी चा माणूस आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 06/20/2015 - 08:38 नवीन
बुवा... दंडवत
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 06/20/2015 - 10:37 नवीन
सुरेख कविता,बुवा!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 06/20/2015 - 11:45 नवीन
बुवा.. लिहीत जा की जरा नियमित पणे...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/20/2015 - 13:39 नवीन
आपका हुकुम सर आंखों पर जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ट
टवाळ कार्टा Sun, 06/21/2015 - 08:25 नवीन
बुवाजी ईन रोम्यानटीक कवीता :) लय म्हंजे लयच रोम्यानटीक
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा