Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

< वाटतं असं …. की >

र — रातराणी, Fri, 06/19/2015 - 21:14
अतृप्त यांच्या वाटतं असं… की ह्या सुंदर कवितेचे वाईट विडंबन करीत असल्याबद्दल अतृप्त आणि सर्व थोरा मोठ्यांची क्षमा मागते. वाटतं असं… की तुझ्या घोरण्याचे सगळे नमुने रेकॉर्ड करून ठेवावे, आणि एक दिवस तू झोपल्यावर ते चालू करावे, नक्की माझी झोपमोड करणारा खर्ज कुठला ते शोधण्यासाठी! वाटतं असं… की तुझे मळलेले सगळे मोजे गोळा करून तुलाच धुवायला लावावे, तू बूट काढल्यावर पसरणारा दुर्गंध, तुला कळण्यासाठी वाटतं असं… की तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा, भावना आणि यंत्र यातला फरक, तुला समजण्यासाठी वाटतं असं… की हरेक दुकानी, हरेक मॉली तुझेच पैसे तुझी निवड किती छान म्हणत उधळावेत उरवावेत थोडेसेच पैसे, पाकिटाची तुझ्या लाज राखण्यासाठी ( चित्र म्हणून प्रत्येकाने आपापल्या बायको किंवा प्रेयसी किंवा बायको आणि प्रेयसीचा फोटू आठवावा ही इनंती, शी. सा. नमस्कार)

प्रतिक्रिया द्या
9451 वाचन

💬 प्रतिसाद (48)
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/19/2015 - 21:18 नवीन
अफाट जमलय हो विडंबन.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2015 - 21:28 नवीन
@ वाटतं असं… की तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा, भावना आणि यंत्र यातला फरक, तुला समजण्यासाठी>> Image removed. अफाट हाणलय हो,निव्वळ अफाट! Image removed. आणि फ़ोटो बद्दलच्या कोमेंट ला तर १०० पैकी २०० मार्क आहेत. सं'रस विडंबन! Image removed. सल्लाम तुम्हाला आपल्याकडून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
र
रातराणी Fri, 06/19/2015 - 21:45 नवीन
ठांकू वेरी वेरी म्च!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
र
रुपी Fri, 06/19/2015 - 23:00 नवीन
फारच भारी! मला तर विडंबन नसून अनेकांच्या (अनेक जणींच्या) भावना मांडल्या आहेत असंच वाटत आहे ;)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 06/19/2015 - 23:46 नवीन
ही ही :) धन्यवाद! अजून बरीच आग आहे, ह्या कवितेत भरपूर भर घालता येईल पण हात आवरला :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
र
रुपी Sat, 06/20/2015 - 00:36 नवीन
हो ना.. मीही विचार करत होते आणखी कायकाय भर घालता येईल याचा, पण "फोनचा चक्काचूर" नंतर बरीच आग शमली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sat, 06/20/2015 - 01:20 नवीन
टी.वी पण आहे ग त्या फोडायाच्या लिस्ट मधे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
श
श्रीरंग_जोशी Sat, 06/20/2015 - 04:25 नवीन
टिव्ही फोडायचा का बरे? विकून टाकावा किंवा दान करावा. या माणसाने तर सुवर्णमध्य काढलाय ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
ब
बॅटमॅन Mon, 06/22/2015 - 14:28 नवीन
इंडीड =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/20/2015 - 00:41 नवीन
@ अजून बरीच आग आहे, ह्या कवितेत भरपूर भर घालता येईल पण हात आवरला :D >> :-D कित्ती कित्ती तो दू दू हिंसकपणा! :P ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 06/20/2015 - 04:14 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 06/20/2015 - 04:53 नवीन
एक नंबर......... मुळ कवितेप्रमाणे विडंबनही..........जबराट
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/20/2015 - 05:39 नवीन
विडंबन अवडले. पण विडंबन करायची परवांगी द मामि यानी मागितली आणि विडंबन रातराणीने केले. आयडी चुकून दुसरा वापरलात काय?
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/20/2015 - 06:55 नवीन
नाही हो! आगाउपणा दुसर काय :) दमामी मी न्हवेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sun, 06/21/2015 - 08:28 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sun, 06/21/2015 - 09:37 नवीन
औं अस्स नाही हसाच! उद्या मला पण तुमचा दु दु आय डी म्हणतील. काय करणार मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 06/21/2015 - 09:48 नवीन
ल्ल्ल्लूऊल्ल्ल्लूऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
द
दमामि Mon, 06/22/2015 - 11:30 नवीन
इतके सुंदर विडंबन केले आहे की मी जिलबी पाडायचे रद्द केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रातराणी Mon, 06/22/2015 - 20:31 नवीन
__/\__ आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ए
एस Sat, 06/20/2015 - 05:52 नवीन
वाटतं असं की... तुझे ठेवणीतले सग्गळे टोमणे गुपचूप ध्वनिमुद्रित करावेत, आणि एक दिवस तू छान मूडमध्ये असताना तुलाच ऐकवावेत, नक्की माझा मूड घालवणारा खास टोमणा कुठला ते शोधण्यासाठी!!!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 06/21/2015 - 09:47 नवीन
वैधानिक इशारा: मुळात तुम्हाला ती छान मूडमधे आहे असे वाटत असेल पण ते खरच असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टोमणे ऐकवाय्च्या आधी खास मित्राला कल्पना देऊन ठेवावी.कधी कशासाठी गरज पडेल सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 06/20/2015 - 06:03 नवीन
वाटतं असं की कपाटातल्या माझ्या कप्प्यात तू अतिक्रमण करून टांगलेल्या सर्व साड्या खाली फेकाव्यात, आणि तुलाच त्या गाठोड्यात बांधायला लावाव्यात. तुझ्या साड्यांची संख्या तुलाच कळण्यासाठी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/20/2015 - 06:07 नवीन
=)) माझा नव्रा मला गद्यात सांगतो. की तू मेल्यावर लाकडांची गरज नाही. साड्याच पुरेत! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अमितसांगली Sat, 06/20/2015 - 06:38 नवीन
....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रातराणी Sun, 06/21/2015 - 10:28 नवीन
ताई दाजीना सांग खबरदार् जर साड्यांविषयी माझ्या मनात आनाल असले काही, सकाळी दुधी रात्री कारली वाढीनं ताटात जोवर आहे प्राण कुडीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Sat, 06/20/2015 - 06:07 नवीन
वाटतं असं की... तुझ्या त्या टीव्हीवर एक दिवस एक बॅटच घालावी, बिनडोक मालिका आणि खरंखुरं आयुष्य यातला फरक तुला दाखवून देण्यासाठी.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 06/20/2015 - 07:04 नवीन
हे जबरी जमलय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाखु Sat, 06/20/2015 - 06:13 नवीन
वाटतं असं की... तू पाडलेल्या कविता जिल्ब्या फ्रेम करून ठेवाव्यात आणी लावाव्यात तुझ्या घरी-दारी हाफिसात नेहमी नजरेसमोर.. तुलाही कळू दे वाचकांना नक्की कशाचा आणि कसा डोक्याला शॉट लागतो ते.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/20/2015 - 06:19 नवीन
वाटतं असं की... तुला तुळशीबागेत नेण्याची लालूच दाखवावी आणि तिथून काहीच्च न घेता तुला बाहेर आणावी शेवटी एक लेडिज रुमाल घेऊन द्यावा तुझ्या डोळ्यांतल्या पाणीदार अंगाराला अजून फुलवण्यासाठी!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/20/2015 - 06:20 नवीन
दु..दु.. पुणेरी स्चॅप्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रातराणी Sun, 06/21/2015 - 09:54 नवीन
रुमालपण तुळशीबागेतून? सो मिड्लक्लास यू नो! कधी सुधारनार ही मुलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sun, 06/21/2015 - 11:42 नवीन
अहो रोसेशच्या आई, आधी स्वतःचे शुद्धलेखन सुधारा. त्यानंतर रोसेशच्या बापाला सुधारा. मग आम्हां 'मुलां'चं पहा हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sun, 06/21/2015 - 16:23 नवीन
काकू?काकू? मॅम म्हणत जा हो. काकू इज सो मिडलक्लास यू नो! इट्स ओके! पुढच्या वेळेस लक्षात ठेवा हं :) रोसेशचे डॅडी बिघडलेत हा तुमचा गैरसमज आहे. शुद्धलेखनाबद्दल मात्र आय टोटली अग्री बर का. काये ना रोसेश नवीन नाटक लिहतोय ना, पण त्याचा लॅपटॉप चोरीला गेला! इन्दुचच काम असणार ते! म्हणून त्याने माझा मॅक बॉरो केलाय. ते मोबाइल वरून लिहणे किती अवघड आहे! सो . . . . . . . ! तरी बर माझा s6 आहे! मोनिशा सांगत होती तिच्या मोटोरोला वर तर 2gच कनेक्षन आहे! मी घेऊन देत होते s6 तर म्हणाली बिल खूप येईल !सो..... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sun, 06/21/2015 - 19:08 नवीन
वोक्के, द-रारामामि! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
स
सतिश गावडे Sat, 06/20/2015 - 06:28 नवीन
वाटतं असं... की हातापाशी एक टमरेल भरुन ठेवावं.. आणि निसर्गाच्या हाकेची वाट पहात बसावी.. आली की लगेच ओ देऊन, आत शिरण्यासाठी! वाटतं असं... की अंधारभरल्या कूपात एक पिवळट दिवा लावून तुझ्यासवे एकरूप व्हावं.. हळूच टुरटुर करत शांतता भंगण्यासाठी!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 06/20/2015 - 06:42 नवीन
वाटतं असं की सा-या शौच कवितांवर एकदाच पाणी ओतावं आणि वाट बघत नसावं तांब्या परत येण्याची!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/20/2015 - 06:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
त
तिमा Sat, 06/20/2015 - 14:22 नवीन
वाटतं असं ...की सर्व शौचकवींना पुढनंच खो द्यावा आणि तांब्या ओतून द्यावा म्हणजे, जातील तसेच बरबटलेले लोकांच्या नजरा चुकवत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
र
रातराणी Sat, 06/20/2015 - 06:49 नवीन
पे ट ले त स ग ळे च !
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 06/20/2015 - 06:50 नवीन
आणि वाट बघत बसावं तांब्या (पाण्यासकट) फेकुन मारण्याची!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/20/2015 - 13:45 नवीन
बेफाम राडा चालु आहे! :-D रातच्याला उतरतो अता मैदानात! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
रातराणी Sun, 06/21/2015 - 09:21 नवीन
गुरुजी बहुतेक मैदान साफ व्हायची वाट बघत आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Sun, 06/21/2015 - 19:16 नवीन
या धाग्यावर बुवाबाजी कधी सुरु होणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
ट
टवाळ कार्टा Sun, 06/21/2015 - 08:28 नवीन
अग्गागा...कै ते ईडंबन आणि कै त्या प्रतिक्रीया....सुटलेत सग्गळ्ळे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sun, 06/21/2015 - 20:06 नवीन
पहिलं कडवं हास्यरस दुसरं कडवं करूणरस तिसरं कडवं गंभीररस चौथं कडवं चैनरस चपराक्क्क विडंबन !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/22/2015 - 14:27 नवीन
हाण्ण्ण तेजायला, सगळेच सुटलेत तेजामारी =)) =)) =)) एक नंबर धागा =))
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 06/22/2015 - 14:49 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/22/2015 - 20:37 नवीन
सर्वांचे आभार! पहिल्याच विडंबन प्रयत्नास इतके भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि नव विडंबनकारांची हौसला अफझाई केल्याबद्दल मंडळ शतश: आभारी आहे :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा