Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माणसाला गाडीने उडवणे ?

प
प्रशांत हेबारे
Sat, 06/20/2015 - 11:26
🗣 25 प्रतिसाद
परवा मी आणि ऑफीस मधले सहकारी मुंबई वरून पुणे ला येत होतो एस्प्रेस्स highway वरून. रात्रीचे ८.०० वाजले असतील. दुसरा टोल नाका सोडल्या नंतर. जवळपास १०० च्या स्पीड ला होतो. स्पीड लेन ला होतो. एकदम एक बाई समोरून चालत होती towards पुणे. sppedlane च्या मधोमध. लक्षात आले म्हणून डावीकडे गाडी घेतली आणि छातीत धस्स झाले. माझ्या बाजूचा सहकारी पण हकाबाका झाला. थोडक्यात वाचलो. पण थांबू शकत नव्हतो. जर ब्रेक लावला तर मी वेगात कुठे ठरी धडकलो असतो. माझ्या मागच्या गाडी ने पण माझ्या सारखा कट मारून गाडी घेतली. मी माझ्या सहकारी ला म्हटले बाबा पोलिसांना कळव. नाहीतर त्या पद्च्यार्याचा जीव जाईल. आता काही प्रश्न पडत्यात १. Express Highway वर बोर्ड लिहिलेला आहे पादचारी, सायकल, दुचाकी, तीनचाकी वाहनास परवानगी नाही २. जर एखाद्या वाहनेने रात्री त्या पादचारीस उडावेले किवा तो accident झाला आणि तो पादचारी मेला एक्ष्प्रेस्स highway वर तर तो गुन्हा ठरतो का. त्याला शासन होते का. ३. गाडी चालावाण्याराची चूक ठरते का, जर एकदम एक्ष्प्रेस्स highway तो पादचारी अडवा आला तर. आपल्या मध्ये कुणी वकील असेल तर legal angle ने सांगणे.

प्रतिक्रिया द्या
4941 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ए
एस Sat, 06/20/2015 - 18:15 नवीन
एक्स्प्रेस वेवर वेगमर्यादा ही ८० किमीप्रता एवढीच असताना तुम्ही ती का ओलांडली?
  • Log in or register to post comments
च
चिगो Sat, 06/20/2015 - 20:41 नवीन
मान्य आहे की ८० किमीप्रता ही वेगमर्यादा असतांना त्याहून जास्त गती असलेल्या वाहनास/वाहनाने अपघात झाल्यास वाहनचालकास कायदेशीररित्या गुन्ह्यासाठी बाध्य धरता येईल. पण, खरंच ८० किमीप्रता ही "एक्सप्रेस वे"साठी योग्य वेगमर्यादा आहे का? इतकी वेगमर्यादा तर कुठल्याही महामार्गावर असते. 'एक्सप्रेस वे' कसला मग तो? मी तरी स्पीडलेन (उजवी लेन) मध्ये कुठलीच गाडी ८० किमीप्रता इतक्या कमी (?) वेगात पाहिली नाहीये. मी स्वतः ६०-८० च्या गतीत गाडी दुसर्‍या किंवा सगळयात डावीकडच्या लेनमध्ये ठेवतो. मुख्य म्हणजे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं काय? पादचारी अलाऊड नसतांना ते आले मधे, आणि उडवला एखादा, मग गाडी ८०च्या खाली असेल तर तो गुन्हा ठरेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 06/20/2015 - 21:13 नवीन
इथे कायद्याच्या योग्यायोग्यतेचा प्रश्न नसून कायदा काटेकोरपणे पाळण्याचा आहे. पादचार्‍यांनी एक्स्प्रेस वे वर येऊ नये हे जितके आवश्यक आहे तितकेच वाहनांनीही वेगमर्यादा ओलांडू नये हेही आहे. धाग्यात विचारलेल्या प्रश्नाबद्दल - वाहनचालकावर गुन्हा दाखल होईल तो सदोष मनुष्यवधाचा आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा. पुढे नंतर योग्य ते पुरावे सादर करून वाहनचालक सुटेलही केसमधून. पण केस उभी राहणार, रेंगाळणार इत्यादी इत्यादी हे निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
प
प्यारे१ Sun, 06/21/2015 - 07:00 नवीन
एक्सप्रेस वे मुख्यत्वे वाहनांसाठी आहे. 80 ही कमाल वेगमर्यादा न पाळल्याबद्दल रडार ने वेग मोजून काय ती शिक्षा द्यायला हवीच पण पादचाऱ्यांनी मुख्यत्वे आपला जीव जाऊ शकतो या भीतीने तरी नियम पाळायला हवेत. तिथे वाहन हे कधीही सरस ठरणार आहे. आपल्याकडे सर्रास मोठ्या गाड्या कुठल्याही लेन मधून जाताना दिसतात. लहान गाड्या चुकीच्या बाजूने overtake करतात. एकन्दरच आनंदीआनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बिहाग Mon, 06/22/2015 - 09:44 नवीन
जर ६० ने चालवली आणि कोणी मध्ये कडमडले तर काय करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सर्वसाक्षी Sat, 06/20/2015 - 20:16 नवीन
कायदा काय आहे कल्पना नाही पण पादचारी बेकायदेशीरपणे आणि बेजबादरपणे द्रुतगतीमार्गांवर सर्रास चालतात आणि आपल्या बरोबर निष्पाप वाहन चालक व वाहनातील माणसांशी जीवघेणा खेळ खेळतात. मात्र रस्त्यात चालणार्‍या वा खास करुन महामार्गावर चालुन अपघाती परिस्थिती निर्माण करण्याबद्दल पादचार्‍यांवर कारवाई वा गुन्हे दाखल झाल्याचे ऐकीवात नाही. किंबहुन चूक कुणाचीही असली तरी सहानुभूती मात्र पादचार्‍याला असते. पादचारी 'बिचारा' आणि वाहनचालक माजलेले असे सर्वसाधारण समिकरण आहे. पादचार्‍यांच्या माजाचे उत्तम उदाहरण म्हणजे विक्रोळी कन्नमवार नगर येथे पूर्व द्रुतगती महामार्गावर पादचार्‍यांसाठी तब्बल तीन पूल बांधले आहेत. मात्र तरीही पादचारी पूलाच्या बरोबर खालुन सर्रास रस्ता ओलांडताना दिसतात. जिथे पादचार्‍यांना प्रवेश नाही अशा ठिकांणी पादचारी आल्यास खरेतर अपघात झाल्यास वाहन चालकाला दोषी ध्ररले जाउ नये, कायदा तसा आहे की कल्पना नाही. जलद मार्ग बांधताना जलद वाह्तूक हाच हेतु असतो. जर ४० किमि च्या वेगाने वाहने चालवायची तर द्रुतगती मार्ग या शब्दाला अर्थ नाही. वेगमर्यादा अति वेगाने अपघात होउ नये - खास करुन टायर फुटुन वा ताबा जाउन यासाठी असावी. वेगमर्यादा ही अशा रस्त्यावर मधे चालणार्‍या पादचार्‍याला संरक्षण म्हणुन नसते. नाइलाज म्हणुन पादचारी महामार्गावर आलाच तरीही त्याला एका कडेने चालणे सहज शक्य असते. तेव्हा अशा मार्गावर पादचारी रस्त्यावर आला तर त्यात अपघात झाल्यास सर्व जबाबदारी केवळ पादचार्‍याचीच असली पाहिजे, किंबहुना पादचारी अपघातात वाचला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी. अशा माजोर व आडमुठ्या पादचार्‍यांमुळे निरपराध वाहन चालक व प्रवासी यांच्या जिवावर बेतू शकते. अशा अपघातात पादचारी मृत झाल्यास वा अपंग झाल्यास त्याला विमा कंपनी कडुन कसलीही भरपाई मिळणार नाही हे निश्चित.
  • Log in or register to post comments
ब
बहारिन् चा खलिफा Sat, 06/20/2015 - 21:00 नवीन
बहारीनला वेगमर्यादा ऎशी व फ़क़्त तीन महामार्गावर शंभर आहे. झेब्रा क्रोस्सिंग व्यतिरिक़्त जर कोणाला उडवले तर गुन्हा नाही. वेगमर्यादा जास्त असताना पकडले गेल्यास भारतीय रुपयात अंदाजे आठ हजार दंड होतो आणि चिरीमिरी द्यायची गोष्ट केल्यास तुरुंगात टाकतात.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 06/21/2015 - 07:40 नवीन
दोन तीन दिवसापुर्वी एक मुर्ख जोडपं ग्रेड सेपरेटरमधे असचं मधे तडमडलेलं. तीन फुट उंचीचा डीव्हायडर आणि वरची झाडं. ओलांडुन थेड ग्रेड सेपरेटरमधे उडी मारली दोघांनी. माझी टु व्हीलर होती म्हणुन किमान पटकन मॅन्युव्हर तरी करता आली. अगदी मी ६०-७० ला होतो फक्त आणि माझ्या समोर १५-२० फुटावर उडी मारली दोघांनी. माझ्या डावीकडे गाडी असती तर मी खपलो असतो फुकट. एखादा फोर व्हीलर किंवा टेंपो ट्रक वगैरे असता तर दोघही ढगात असते.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 06/21/2015 - 11:12 नवीन
काई नाई हो. काई झाले नसते .... रात्रीच्या वेळेस बाई मध्ये आली म्हणजे नक्कीच ती भूत होती!
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 06/21/2015 - 11:46 नवीन
अन समजा भूत नस्ती, तर झाली असती. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सामान्यनागरिक Sun, 06/21/2015 - 11:19 नवीन
सायकलवाले अन पायी चालले तरीही वाहतूक कायदे लागु व्हावेत. सिग्नलवर सुद्धा सायकलस्वार बिनधास्त सिग्नल तोडूंन जातांना दिसतात.कायदा समान लागू व्हावा.!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 06/21/2015 - 11:39 नवीन
कायदा दोघांनाही (सायकल आणि चारचाकी गाड्या) समान आहे. फक्त कोणी तो पाळतो कोणी नाही. सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ शकतात पण गाडी चालवत नाही तर ढकलत जावे लागते. सायकलस्वाराने सायकलीवरून उतरून सायकल ढकलत न्यावी आणि चारचाकी वाहनानेही इंजिन बंद करून खाली उतरून गाडी ढकलत न्यावी. गाडीत बसून चालू इंजीनाच्या साहाय्याने गाडी चलवत नेणे अथवा सायकलवर बसून पेडल मारत जाणे म्हणजेच सायकल चालवत नेणे ह्याला परवानगी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
य
यसवायजी Sun, 06/21/2015 - 23:29 नवीन
सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ शकतात पण गाडी चालवत नाही तर ढकलत जावे लागते. यू श्योर? असे मधेच कुणी कडमडले तर ज्यांना हिरवा सिग्नल आहे त्यांनी काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पैसा Mon, 06/22/2015 - 05:09 नवीन
उडवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
त
तुषार काळभोर Mon, 06/22/2015 - 09:01 नवीन
सिग्नलचं माहिती नाही, पण मोटारसायकल हातात घेऊन तुम्ही ढकलत राँग साईडने जाऊ शकता, समजा तुमच्या कडे हेल्मेट नाहिये, अन् समोर चेकिंग चाललंय, तर त्यांच्या समोर गाडी ढकलत न्या आणि पुढे जाऊन गाडीवर बसा. अशा गोष्टी चालतात. सिग्नलवरसुद्धा गाडी ढकलत असल्यास पादचार्‍यांचे नियम लागू होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Wed, 06/24/2015 - 08:27 नवीन
पेठकर काका: "सिग्नल लाल असताना दोघेही जाऊ शकतात">> -१ पैल्वानभौ: "पादचार्‍यांचे नियम लागू होतील">> +१ पादचार्‍यांसाठी हिरवा सिग्नल असताना गाडी ढकलत नेणे चालत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
न
नाखु Mon, 06/22/2015 - 05:16 नवीन
कायदा विकला जातो हे अंतीम सत्य आहे. सिग्नलवर १०० ते ५०० रूपड्यांत तर अंगावर गाडी घातली तर लाखात. इतकाच काय तो फरक. तेव्हा कायदेशीर्-बेकायदेशीर असा फरक न करता पैसा (इथला मान्य्वर आय्डी नव्हे)
तर भारतीय चलन जिथे जास्त तिकडे कायदेशीर फायदेशीर कारवाई होते.
चिंचवड स्टेशनला फक्त रिक्षा व बेकायदा प्रवासी वाहतूक जीप्ड्या सोडून सर्व गाड्यांवर नो पार्कींग्ची कारवाई होते्. हे रोज पाहणारा अनुभवी नाखु बिनाचिर्मीरीवाला
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 06/24/2015 - 09:58 नवीन
नाखु बिनाचिर्मीरीवाला तुमच्या या प्रतिसादावरुन तुम्हीच आमचे (म्हणजे संस्थळाचे) पूर्वीचे मालक तर नाही ना, अशी शंका चाटून गेली. खरी ठरल्यास देव पावला.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 06/24/2015 - 11:14 नवीन
मी कुठंबी चिर्मेरी द्येत नाही (कुंपणी कामात तो नेमका कामाचा भाग असलेने टाळता येत नाही) संस्थळाचे माल्क म्हणजे लै मोठी गोष्ट. साधा सरळ नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
माझीही शॅम्पेन Wed, 06/24/2015 - 10:04 नवीन
नियम तोडण्यार्या सर्वानांच मग तो कार वाला असो व पादचारी ; भर रस्त्यात तुडवा , देशात लोकशाही असली तरी रस्त्यात हुकुमशाही असली पाहिजे असा कायदा समंत झाला पाहिजे लोक इतके डोक्यात जातात , हल्ली नवीनच बाईक शिकण्यार्यांचा जाम त्रास झाला आहे , रस्त्याच्या मध्य-भागातून चालवतात , होर्न / अपर-डीपर दोघानाही जुमानत नाहीत , अजून एक पाहिले रस्ता ओलांडताना पादचारी वाहतुकीचे साधे नियम जसे कि प्रथम उजव्या बाजूस पाहणे आणि नंतर डावी कडे हे न करता थेट डावी कडे पाहत रस्ता ओलांडतात , झेब्रा क्रोस्सिंग हा एक निव्वळ विनोद झाल्या त्यावरून कोणीही क्रॉस करत नाही जिथे पाहिजे तिथे घुसतात , त्यामुळे गाडी वाले पण थांबत नाहीत असेच बेदरकार पाने वाहतूक चालणार असेल तर नवीन नवीन संतोष माने निर्माण होणार ! राच्याकने :- अपर-डीपर हे कायदेशीर आहे का ?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 06/24/2015 - 10:28 नवीन
भारतीय जनतेचे रहदारीविषयक मंत्र खालीलप्रमाणे. मंत्र १ : १. तुम्ही पायी चालत आहात आणि सायकलवाल्याच्या धक्का लागला तर चुक सायकलस्वाराची. २. तुम्ही सायकलीवरुन चालत आहात आणि तुम्हाला मोटारसायकलस्वाराचा धक्का लागला तर चुक मोटारसायकलस्वाराची. अशा प्रकारे तुम्ही सर्व गाड्यांचा चढता क्रम तुमच्या कल्पनाशक्तीने लिहून काढा. मग तुम्ही ज्यावेळी ज्या वाहनातून प्रवास करणार आहात त्यापेक्षा लहान वाहनांच्या वाटेला जाऊ नका. मंत्र २ : आपला आणि बाहेरचा उदा. जर तुम्ही पुण्यात असाल आणि मुंबईच्या गाडीबरोबर अपघात झाला तर चुक मुंबईच्या गाडीवाल्याची असते. हाच नियम इतर ठिकाणी लागू होतो. याच न्यायाने जर बाहेरच्या राज्याची गाडी असेल तर त्याची चूक ही घोडचूक समजली जाते. मंत्र ३ : झेब्रा क्रॉसींग हे झेब्र्याला रस्ता क्रॉस करायचा असतील तेव्हा वापरायचे असतात. सबब माणसे त्यावरुन रस्ता ओलांडत नाही. झेब्रा क्रॉसींग आणि पादचारी पूल सोडून ते कोठूनही रस्ता ओलांडू शकतात. मंत्र ४ : मानवी जीवन क्षणभंगूर आहे आणि आत्ता गेलेला क्षण परत येत नाही. त्यामुळे जे बोलायचे ते आत्ता लग्गेच. नाहीतर फार मोठा अनर्थ ओढवेल ह्या नियमाप्रमाणे पादचारी, गाडी चालवणारे मोबाईलवर बोलत असतात. त्यामुळे त्यांना दोष देऊ नयेत. मंत्र ५ : बॉलीवूड संदर्भग्रंथाप्रमाणे 'कानून होते ही तोडने के लिये' या वचनानूसार सिग्नल तोडणे हे अनिवार्य आहे. जर सिग्नलच्या पुढे पोलीसमामा उभे असतील तरच सिग्नलचे पालन केले जाते. यात काही अपवाद असतात व ते बहुधा शहरी भागातलेच असतात. वाढत्या यांत्रिकीकरणात व वाढत्या गोंगाटामुळे शहरी लोक आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू शकत नाहीत त्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींपासून मार्गदर्शन करावे लागते. उदा. वाहतुकीची चिन्हे दर्शविलेले बोर्ड. ग्रामिण जनता अजूनही बर्‍याच प्रमाणात मन की आवाज ऐकू शकते त्यामुळे त्यांना अशा मार्गदर्शनाची गरज पडत नाही. त्यामुळे ते उलट्या दिशेने गाड्या चालवू शकतात, डावा, उजवा सिग्नल न देता बरोबर हव्या त्या दिशेला जाऊ शकतात. ज्या रस्त्यांवर कोणतेही नियम पाळले जात नाहित तेथे तुम्ही नियमांचे पालन करुन गाडी चालविली की तुमचा अपघात ठरलेलाच. असो. अजून बरेच मंत्र लिहिता येतील पण विस्तारभयास्तव थांबतो. वरील मंत्रांची प्रिंटआऊट काढून तिचे १०८ वेळा पठण करा. नंतर तीचा तावीज बनबून काळ्या धाग्यात बांधून गळ्यात किंवा दंडावर बांधा. देव तुमचे रक्षण करो.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 06/24/2015 - 11:07 नवीन
स्कार्पियो मंत्र , खादी- घड्याळ मंत्र यांची सुद्धा दीक्षा द्यावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 06/24/2015 - 11:12 नवीन
स्कार्पियो मंत्र , खादी- घड्याळ मंत्र यांची सुद्धा दीक्षा द्यावी
ते सर्व विकत घेण्याइतका पैका असला की मंत्र त्यासोबत आपोआप म्हणता येतात. वेगळी दीक्षा घ्यायची गरज नाही. तरीपण कुणाला गरज वाटत असेल तर ती व्यक्ती त्या सुविधा वापरण्याच्या लायक नाही असे म्हणता येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 11:14 नवीन
कॉर्पियो म्हनत्येत त्येला...ती पनं व्हाईट्टच हवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
त
तिमा Wed, 06/24/2015 - 11:32 नवीन
खास करुन मुंबईसारख्या शहरांसाठी: तुम्ही कारने जात आहात, आरशांत बाईकवाला दिसला, तर त्याला लगेचच पुढे जाऊ द्यावे. नाहीतर तो आणखी चारजण गोळा करुन तुमचा पाठलाग करेल. नंतर होणारा कारच्या टपावरचा डान्स, विंडशिल्ड फोडणे, मारहाण होणे इत्यादि प्रकारास केवळ तुम्ही जबाबदार असाल. पोलिस कोणतीही मदत करणार नाहीत. फारतर दुसर्‍या दिवशी टाईम्समधे तुमची बातमी प्रसिद्ध होईल, हीच काय ती जमेची बाजू!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा