पाऊस.... .वेगवेगळा •○●¤°
खेड्यातला जाणता पाऊस
जबाबदारीनं गाव रान भिजवणारा,
म्हातार्या कोतार्यांची अलाबला
नी पिकांची दुवा घेणारा ....!!
शहरातला अप टु डेट पाऊस
ऑफीस शाळांच्या वेळेत हमखास येणारा
नौकरीदारांच्या शिव्या नी पालकांची बोलणी
गप गुमानपणे ऐकणारा...!!
घाटातला धटिंगन पाऊस
निर्वस्त्र, निर्लज्ज कसाही कोसळणारा ,
धबधब्यांना जागं करून
आनंदानं नाचविणारा....!!
बागेतला खट्याळ पाऊस
रेंगाळलत गुलाबी होवून पडणारा ,
प्रेमीकांची भिड चेपायला
सजल हस्ते मदत करणारा...!!
फ्लॅट मधला मुका पाऊस
बंद दाराआड गपगुमान पडणारा ,
रेन रेन गो अवे ऐकुन
खिन्नपणे परतणारा ...!!
चाळीतला मनमोकळा पाऊस
आस्थेने चौकशी करणारा,
कांदाभजींचा वास घेत
कागदी होड्यांवर आनंदाने डोलणारा ...!!
मनातला झिम्माड पाऊस
मनातल्या मनात पडणारा,
अन् सर ओसरल्यावरही
चिंब आठवांत उरणारा....!!!
💬 प्रतिसाद
(7)
प
पैसा
Sat, 06/20/2015 - 15:40
नवीन
छान आहे पाऊस कविता!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sat, 06/20/2015 - 16:28
नवीन
मनातला झिम्माड पाऊस
मनातल्या मनात पडणारा,
अन् सर ओसरल्यावरही
चिंब आठवांत उरणारा....!!!
सुंदरच ...
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 06/20/2015 - 18:43
नवीन
Classssss
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 06/20/2015 - 19:13
नवीन
मस्स्स्स्स्स्स्स्त!
- Log in or register to post comments
ग
गोल्या
Sat, 06/20/2015 - 19:27
नवीन
धन्यवाद ☔
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sun, 06/21/2015 - 20:14
नवीन
फॅन्न्न्न्न्टास्टिक !
क्या बात है राव क्य बात है !
आहा ! आहा !
खलास. पुन्हा वाचतो.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 06/21/2015 - 22:12
नवीन
छान सोपे शब्द त्यामुळे पटकन क्लिक झाली.
- Log in or register to post comments