रानी
नथं नाकातं खुलली
लाली गालात फुलली
कई होटातं ऊलली
कोन्या जगातं भुलली
खाली झुकली नजर
कायं दिसलं गोजरं
मले पाऊनं खरचं
तूह्यं हासनं लाजरं
तुले कोनाची कदरं
डोई घेतला पदरं
चालू नकोसं तर्तरं
जीवं उळते वधरं
पापन्याची फळंफळं
पदराची सळंसळ
कायं मनी गळंबळं
सांग मले घळंघळं
डूलं डुलतातं कानी
मानं सुरई च्या वानी
मोठ्या मोठ्या डोयातनी
रूपं साकारलं रानी
💬 प्रतिसाद
(6)
श
श्रीरंग_जोशी
Mon, 06/22/2015 - 20:43
नवीन
रचना आवडली. हे प्रेमकाव्य आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे
Mon, 06/22/2015 - 20:55
नवीन
सिं...सिं...सिं...सिर्रंग भाऊ...
त...त...त...तसं काही नाही
प...प...प...पण
क...क...क...कसं?...
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 06/22/2015 - 21:00
नवीन
कवितेचा अर्थ कोणता तर जो वाचणार्याला भावेल तसा असं कुणीतरी मिपावर लिहिलं होतं.
असो, इतरांच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो. अर्थाबद्दल आताच चर्चा करून इतरांचा रसभंग करणे योग्य होणार नाही.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 06/23/2015 - 04:40
नवीन
थोडी चर्चा करून रसभंग करतोच-जळगाव ,अमळनेर ,नंदुरबार भागातली अहिराणी बोली आहे का ?लग्न न झालेल्या मुली नाकात नथ घालतात का ?कोणता दागिना घालतात?
- Log in or register to post comments
र
रुपी
Tue, 06/23/2015 - 22:58
नवीन
पापन्याची फळंफळं
आणि
मानं सुरई च्या वानी
या दोन ओळी तर खूपच आवडल्या.
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Tue, 06/23/2015 - 23:00
नवीन
सुंदर!!
- Log in or register to post comments