Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस म्हणजे?

य — यल्लप्पा सट्वजी कोकणे, Mon, 06/22/2015 - 20:19
पाऊस म्हणजे? पाऊस म्हणजे उल्हास मनी दाटलेला, निसर्गाच्या सानिध्यात मन वेडा फुललेला। पाऊस म्हणजे चौफेरे दाटलेली हिरवळ, क्षणात दूर करते मनात आलेली मरगळ। पाऊस म्हणजे उत्साह शरीरात दाटलेला, रखडलेली कामे करण्यास बोनस वेळ मिळालेला। पाऊस म्हणजे उगाच सुट्टी मिळालेली, विसरून चिंता कामाची कुटूंबासोबत घालवलेली। पाऊस म्हणजे चिखलाचाच राडा सारा, उग्रट दर्प हवेत अन् वाटेभर कचरा पसारा । पाऊस म्हणजे नदिला आलेला पूर, घरात साचलेलं पाणी अन् मुलांच्या रक्षणाची हुरहुर। पाऊस म्हणजे फक्त पाऊसच आहे, जितके लिहावं त्यावर तितके कमीच आहे। पाऊस म्हणजे शब्दांची सरच बरसते, खोलवर मनात रूतलेली सहजच कविता खुलते। यल्लप्पा सटवाजी कोकणे २१ जून २०१५ ९८९२५६७२६४

प्रतिक्रिया द्या
931 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ट
टवाळ कार्टा Tue, 06/23/2015 - 07:27 नवीन
७-८ धागे एकत्रच टाकले कै? :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/23/2015 - 07:37 नवीन
छान. आवडली अवांतरः बाकी आम्हाला दिसलेला पाऊस असा होता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/23/2015 - 07:47 नवीन
तांब्या कढई लागलेली आहे काही वाचकांना भावालेली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा