Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबासाहेब पुरंदरे,महाराष्ट्रभुषण आणि वाद!!

ग
ग्रेटथिंकर
Wed, 06/24/2015 - 10:15
🗣 148 प्रतिसाद
सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत 1.हा आक्षेप योग्य आहे का ? 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?

प्रतिक्रिया द्या
41427 वाचन

💬 प्रतिसाद (148)
स
सौंदाळा Wed, 06/24/2015 - 10:21 नवीन
तुम्ही अजुन आहे होय मला वाटले हितेशबरोबर तुमच्या आयडीला पण देवाज्ञा झाली.
पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही
तेंडुलकरसुध्दा म्हणायचा मी अजुन फलंदाजी शिकतोय, त्यालापण उगीच भारतरत्न दिले.
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Wed, 06/24/2015 - 10:47 नवीन
तेंडुलकरचे उदाहरण इथे योग्य ठरत नाही.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 06/24/2015 - 10:55 नवीन
मला या धाग्यावर एकच बोलण्यासारखे आहे: तो महाराष्ट्रभुषण नसून महाराष्ट्रभूषण पुरस्कार आहे !
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 06/24/2015 - 11:09 नवीन
हा विषय सद्ध्या संपला आहे. ब्रिगेडी बेडकांनी रान उठवण्याचा प्रयत्न करूनही सरकारने शष्प लक्ष न देता त्यांना फाट्यावर मारल्याने हा विषय पाताळात गाडला गेलेला आहे. तरी, सद्ध्या हाफिसात वेळ असल्याने आणि बोलायची खाज असल्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. 1.हा आक्षेप योग्य आहे का ? अजिबात नाही. 2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का? बाबासाहेबांनी कोणताही कल्पनाविलास, मनाच्या घटना शिवचरीत्रात घुसडलेल्या नाहीत. बाबासाहेब शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक आहेत ह्यात चुकीचे काहीच नाही. अभ्यास आहेच त्यांचा ह्या बाबत वाद नाही. मांडणी बखर सदॄष नसून ललीत असल्याने अनेक मठ्ठ लोकांना तो कल्पनाविलास वाटतो. स्वतः बाबासाहेबांनी त्यांनी लिहिलेला चरित्रात चुका आढळल्यास त्या सुधारण्याची कायमच तयारी दाखवलेली आहे. 3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का? मुळात हे विरोधक राजकीय हेतूने प्रेरीत असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. ब्राह्मण विरोधाची कावीळ झालेल्यांच्या विरोधाचा हेतू बाबासाहेब ब्राह्मण आहेत हा असल्याने विरोधकांना फाट्यावर मारण्यात यावे.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 06/24/2015 - 12:40 नवीन
नाटककार अथवा शाहीर यांना महाराष्ट्रभूषण देणे अयोग्य आहे का ??
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Wed, 06/24/2015 - 12:51 नवीन
नाटककार अथवा शाहीर यांना महाराष्ट्रभूषण देणे अयोग्य आहे का ??>>>>>>>>>>नाटककार किंवा शाहीर यांना पुरस्कार देण्यात काहिच अडचन नाही,पन त्यांना इतिहासकार म्हनुन पुरस्कार देण्यावर आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 06/24/2015 - 13:00 नवीन
त्यांना इतिहासकार म्हणून पुरस्कार दिला आहे असे कुठे नमूद केले आहे ? कृपया लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
स
संदीप डांगे Wed, 06/24/2015 - 13:35 नवीन
काही लोकांना वेगळाच महाराष्ट्र काढून द्यावा का लोकसंख्येच्या प्रमाणात? म्हणजे त्यांचा इतिहास, इतिहासकार, शाहिर, नाटककार, भूषणं वेगळी राहून वाद होणार नाहीत. (जाउ दे.. खूप तुकडे पडतील आणि कुठल्याही तुकड्यात कायम रहिवासी कधीच मिळणार नाहीत)
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Wed, 06/24/2015 - 18:48 नवीन
पुरस्काराने काल्पनिक/ बायस्ड ईतिहास अधिक्रूत होइल. तस्मात्त पुरस्कार न देणे योग्य रहील. तसेही रयतेने या विरोधात रान उथवल्यामुले सरकार सध्यातरी शान्त आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/24/2015 - 19:01 नवीन
त्यांना इतिहासकार म्हणून पुरस्कार दिला तर कुठे बिघडले. अर्ध्या महाराष्ट्राला शिवरायाच्या इतिहासाची गोडी लावली हे त्यांचे ऋण काय कमी आहेत का? आइन्स्ताइन ला सुद्धा सापेक्षतावादाच्या सिद्धांतासाठी नोबेल मिळाले नाही तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी मिळाला होता त्यामुळे आईन्स्टाइंनची थोरवी कमी होत नाही. हि ब्रिगेडी मनोवृत्ती सोडून द्या. एखाद्याला त्याच्या जातीमुळे श्रेय मिळू न देणे हि वृत्ती कोती आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/24/2015 - 19:02 नवीन
चिमणराव कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/25/2015 - 03:32 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मितभाषी Wed, 06/24/2015 - 19:11 नवीन
Vaicharik mat matantare ahet mhanun vaiyaktik halle chadvinyachi hi sanatani pratha samajik pragatis badhak aahet. Vicharanchi ladhai vicharanech ladhali pahije n ki ekhadyachi hatya karun.
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Wed, 06/24/2015 - 19:20 नवीन
पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. इतिहासकार शब्दाची काही सर्कारी व्याख्य असेल तर माहीत नाही. पण सर्वसाधारण अर्थाने ते इतिहासकारही आहेत. 'राजा शिवछत्रपती' हे पुस्तक अगदी कादंबरी आहे असे धरले (आणि ती बरीचशी आहे, हे नक्की) तरी त्याने पुरंदरे इतिहासतज्ञ नाहीत असा अर्थ कसा निघू शकतो? त्यांनी इतिहासाचा अभ्यास करतात तसाच तो केला, पण त्यावरून लिहीले ते लोकांना सहज आवडेल असे. ते पुस्तक म्हणजे ऐतिहासिकरीत्या सिद्ध झालेल्याच गोष्टींचे आहे की नाही हा वाद वेगळा आहे. तो काळ लोकांपुढे आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेले आहे. केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून द्यायचा नसेल तर गोष्ट वेगळी. बहुसंख्य लोक त्यांच्या मताला पुष्टी देणारी पुस्तके वाचतात. त्यात जे लिहीले आहे तोच इतिहास समजतात, त्याकरता सर्कारी अ‍ॅप्रूवल कोणी बघत नाही, ते मिळाले म्हणून हे बदलत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 19:22 नवीन
साहेब ते परिक्षणांचे बघा की जरा...खूप वाट बघायला लावता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
फ
फारएन्ड Wed, 06/24/2015 - 20:29 नवीन
प्रयत्न चालू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मितभाषी Wed, 06/24/2015 - 20:04 नवीन
पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. इतिहासकार शब्दाची काही सर्कारी व्याख्य असेल तर माहीत नाही. पण सर्वसाधारण अर्थाने ते इतिहासकारही आहेत. '^^^^^^^^^^^^ hich dharna pakki asel tar pudhil charches kahich arth urat nahi. mobile varun typt asalyane problem yet aahe
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
फ
फारएन्ड Wed, 06/24/2015 - 20:28 नवीन
ते इतिहासाचे अभ्यासक नक्कीच आहेत, इतिहासतज्ञही नक्कीच आहेत. 'इतिहासकार' आहेत की नाही माहीत नाही कारण त्याला काही ठराविक व्याख्या असेल तर कल्पना नाही - इतर काही इतिहासकार जसे फक्त ऐतिहासिक कागदपत्रांवरून सिद्ध होऊ शकणारीच माहिती लिहीतात व त्यात इतर काही लिहीत नाही तसे एखादे पुस्तक त्यांनी लिहीले आहे की नाही कल्पना नाही. आता ब्रिगेड चा विरोध नक्की कशाला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
क
काळा पहाड Wed, 06/24/2015 - 20:36 नवीन
ते ब्राम्हण आहेत त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/25/2015 - 04:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 06/25/2015 - 09:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/25/2015 - 11:39 नवीन
इतिहाससंशोधन करणारा तो इतिहासकार असे म्हणायचे असेल तर पुरंदरे नक्कीच इतिहासकार आहेत. काही पुस्तकांसाठी प्रख्यात इतिहासकार ग.ह.खरे यांच्या असिस्टंटचे काम पुरंदर्‍यांनी केलेले आहे. नक्की पुस्तकांची नावं जरा पाहून सांगतो. पण पहिल्या धारेचे संशोधन पुरंदर्‍यांनी थोडे का होईना, केलेय हे महत्त्वाचे आहे. भलेही त्यांचं मुख्य काम ते नसलं तरीही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
ह
होबासराव गुरुवार, 06/25/2015 - 11:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माहितगार गुरुवार, 06/25/2015 - 14:08 नवीन
मराठी शाब्दबंधात "इतिहासाचा अभ्यास करणारी किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी करणारी इतिहासाची जाणकार व्यक्ती" अशी इतिहासकार शब्दाची व्याख्या दिली आहे (संदर्भ). मराठी पारिभाषिक शब्दकोशात Historian या शब्दास इतिहासकार हा शब्द वापरला आहे.(संदर्भ). ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची Historian शब्दाची व्याख्या "An expert in or student of history, especially that of a particular period, geographical region, or social phenomenon:" अशी आहे. इंग्रजी विकिपीडियात historian ची ओळख "A historian is a person who researches, studies and writes about the past, and is regarded as an authority on it. Historians are concerned with the continuous, methodical narrative and research of past events as relating to the human race; as well as the study of all history in time." अशी दिली आहे. (संदर्भ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/24/2015 - 19:59 नवीन
या मंबाजि ब्रिगेडचि लायकी तरी आहे का कुणावर आरोप करायची?
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले गुरुवार, 06/25/2015 - 01:41 नवीन
"3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?" जेम्स लेन याने त्याच्या शिवाजी वरच्या पुस्तकात पुरंदरे यांचा नेमका कसा उल्लेख केला आहे आणि त्या वरून आक्षेप घेण्या सारखे काय आहे हे कोणी सांगू शकेल का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/25/2015 - 06:29 नवीन
कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/25/2015 - 06:33 नवीन
खेडेकर आणि साळुंखे+कोकाटे यांना सलग ५ वर्षे हा पुरस्कार द्यावा म्हणून उपोषण करणार आहेत असे आम्चा ओसाडवाडीचा वार्ताहर कळवितो. दै तुणतुणे खुस्पटवाडी ता:आग्लाव जि: नसती भान्गड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/25/2015 - 06:48 नवीन
@ दै तुणतुणे खुस्पटवाडी ता:आग्लाव जि: नसती भान्गड>> :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/25/2015 - 08:06 नवीन
त्यांनी सध्या मितभाषी राहण्याचा निर्णय घेतला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
वटवट गुरुवार, 06/25/2015 - 08:27 नवीन
बाबासाहेब पुरंदरेंवर प्रश्न उपस्थित करणार्यांनी आधी स्वतःला आरश्यात बघावं… स्वच्छ….
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/25/2015 - 11:47 नवीन
लेखक हेवनवासी झालाय...हा धागा हवाच का फुटबॉल खेळायला???
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 06/25/2015 - 13:23 नवीन
'जन्नत' वासी कशावरून झाला नसावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/25/2015 - 14:12 नवीन
कमाल आहे, आयडी पुण्यात्मा होता अशी तुमच्या दोघांची खात्री होती असे दिसते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/25/2015 - 14:37 नवीन
खिक्क...कारण आपल्यात व त्याच्यात फरक आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
त
तुडतुडी Mon, 06/29/2015 - 12:14 नवीन
संभाजी ब्रिगेडने "तुकाराम महाराजांना मारण्यात आलं होतं. पण ब्राह्मणांनी हि गोष्ट लपवून ठेवली " असा शोध लावलाय
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 12:21 नवीन
ते काय, काहीही शोध लावतील. एकीकडे ब्राह्मण सर्वशक्तिमान होते असे म्हणायचे (खूनबीन करणारे इ.) तर दुसरीकडे त्यांच्या पौरुषावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, नक्की केहना क्या चाहते हो तेच कळत नै त्यांचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
D
dadadarekar Mon, 06/29/2015 - 14:23 नवीन
मग तुकोबा विमानातून गेले की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पैसा Mon, 06/29/2015 - 14:26 नवीन
तुम्ही बघितलंय का? आमच्या माईसाहेबांनी बघितलंय आणि मला तसं सांगितलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 14:41 नवीन
जर विमानातून गेले नसतील तर खूनच झाला हे तरी कशावरून? ब्रिगेडी म्हणतात म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
आ
आनन्दा Mon, 06/29/2015 - 15:05 नवीन
असू द्या हो. त्यांना सुन्दर उत्तर यापूर्वीच दिले गेले आहे. समजा तुकोबांचा खून ब्राह्मणांनी केला, हे एका क्षणासाठी खरे मानले, तर मग पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज तुकोबांना गुरू मानत होते, त्यांच्या गुरुंचा खून झाला आणि महाराजांना कळले पण नाही? तस्मात तुम्हाला नेमके काय सिद्ध करायचे आहे ते ठरवा, ब्राह्मण खूनी होते आणि शिवाजी महाराज त्यांना सामील होते, की ब्राम्हण एव्हढे हुशार होते की त्यांनी तुकोबांचा खून केला आणि शिवाजी महाराजांना "बनवले"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 15:19 नवीन
हा हा हा, मग तर ब्राह्मण भलतेच चतुर दिसतात. साक्षात् शिवाजी महाराजांना बनवले म्हणजे हाईटच झाली, नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
य
यसवायजी Mon, 06/29/2015 - 16:13 नवीन
फक्त तुकाराम महाराज नाही कै. मोठ्ठी लिष्ट आहे. अगदी आंबेडकर, खुद्द शिवाजी महाराजसुद्धा आहेत त्या संशोधकांच्या लिष्टीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 16:26 नवीन
हम्म..म्हणजे मग ब्राह्मणांपासून ब्रिगेडवाल्यांनी दबकूनच असले पाहिजे, नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
काळा पहाड Mon, 06/29/2015 - 16:40 नवीन
आणि आरोप करणारा कोण? तर 'दिल्लं दान घेतलं दान, पुढ्ल्या जन्मी मुस्सल्मान' वाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
D
dadadarekar Mon, 06/29/2015 - 19:34 नवीन
विमानातून गेले हे तरी कशावरून ? तिकिटाची क्षेरॉक्स आहे की काय तुमच्याकडे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चिनार Tue, 06/30/2015 - 07:01 नवीन
संत तुकारामांचा खून केलेल्या लोकांच्या हाताचे ठसे सुऱ्यावर किंवा तलवारीवर किंवा तुकारामांच्या गळ्यावर सापडले असतीलच नाही का बिग्रेडला ? तुमच्याजवळ संत शिरोमणी, राष्ट्रपुरुष, श्री श्री खेडेकर यांनी फोरेन्सिक रिपोर्ट ची झेरोक्स पाठवली असेलच ! कृपया शेयर करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
म
मुक्त विहारि Tue, 06/30/2015 - 07:16 नवीन
"कृपया शेयर करा." ह्या वाक्याला सहमती. दादा दरेकर, हे अतिशय ज्ञानी आणि उदार मनाचे असल्याने, आपले ज्ञान वाटायला ते नहमीच तयार असावेत, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
अ
अनुप ढेरे Mon, 06/29/2015 - 15:20 नवीन
तुकोबा सन्यास घेउन एकांतवासात गेले असं अभ्यासक म्हणतात. त्यांच्या शेवटल्या काही अभंगांवरून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 15:25 नवीन
येस, हे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा