Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

स — सटक, Wed, 06/24/2015 - 16:36
रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे ! निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !! सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे ! अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !! जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे ! लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !! बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे ! धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !! या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे ! जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!

प्रतिक्रिया द्या
1677 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
पैसा Wed, 06/24/2015 - 18:41 नवीन
पाऊस कविता आवडली!
  • Log in or register to post comments
स
सटक Wed, 06/24/2015 - 20:02 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/24/2015 - 20:06 नवीन
कवितेच्या मांडणी मधला आवेग अवडला. आणि त्यामुळेच शब्द मनाला स्पर्शुन गेले.
  • Log in or register to post comments
स
सटक Wed, 06/24/2015 - 20:18 नवीन
धन्यवाद. आवेग हा पावसाचा आत्मा आहे असे माझे मत आहे. सुरुवातीला सतत जाणवणारा आवेग त्रुप्तीकडे जाताना शांत, संयत होताना बघायला फार छान वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/25/2015 - 03:37 नवीन
स्पष्टीकरणा बद्दल, धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक
च
चुकलामाकला गुरुवार, 06/25/2015 - 09:10 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/25/2015 - 09:17 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 06/25/2015 - 09:35 नवीन
ज्जे ब्बात ! जियो...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 06/25/2015 - 11:54 नवीन
क्या बात ! नुसताच आवेग नाही, वेग आहे कवितेला. सहीच.
  • Log in or register to post comments
स
सटक गुरुवार, 06/25/2015 - 14:24 नवीन
सर्वांना धन्यवाद! हुरूप आला!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा