Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संध्याकाळ

स — सूड, गुरुवार, 06/25/2015 - 14:10
ती आणि ही, दोघीही एकाच वयाच्या...जवळपास. तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. तिची नेहमीची लगबग, ही निवांत बसलेली. आजचा दिवस? जरा वेगळा, ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप, हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!! पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं. ती आज थोडी जास्त लगबगीत ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली. ती पुढे गेलेली मागे आली, कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली... पुन्हा लगबगीत निघाली.. नातवाच्या वाढदिवसाला काय करावं, हा विचार तिच्या डोक्यात, ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल या विचारात गढून गेली दुसर्‍या दिवशी तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं!!

प्रतिक्रिया द्या
3942 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ए
एस गुरुवार, 06/25/2015 - 14:16 नवीन
चांगली कविता. तो 'ढिम्म' हा शब्द कवितेच्या एकूण संवेदनशील स्वभावाला थोडासा खटकणारा वाटला. ती ओळ जरा वेगळ्या पद्धतीने लिहून पहा.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 06/25/2015 - 14:33 नवीन
सेम हिअर. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्यारे१ Fri, 06/26/2015 - 15:44 नवीन
-1. ढिम्म शब्द बरोबर आहे. चुकीचा तरी नक्कीच वाटत नाही. दोघीन्च्या परिस्थितीतली तफावत आणि त्याचं कारण कदाचित त्याच ढिम्म बसण्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/25/2015 - 14:35 नवीन
:(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/25/2015 - 15:02 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/25/2015 - 15:03 नवीन
......
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/25/2015 - 15:41 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 06/25/2015 - 16:50 नवीन
छान आहे. "ढिम्म" खटकलं नाही, राहू द्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/25/2015 - 17:56 नवीन
हां मलापण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 06/25/2015 - 16:57 नवीन
:(
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 06/25/2015 - 21:20 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 06/26/2015 - 04:26 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
प
पथिक Fri, 06/26/2015 - 06:18 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 06/26/2015 - 14:19 नवीन
छानच...मुक्तक आवडले. ... तेच नेहमीचं पाहून न पाहणं, नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं........... हे फारच छान लिहिलय.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 06/26/2015 - 17:55 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 06/26/2015 - 18:21 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 06/26/2015 - 22:00 नवीन
छानचं......
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/27/2015 - 05:39 नवीन
सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 06/27/2015 - 06:08 नवीन
वाह..
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 06/27/2015 - 11:43 नवीन
चांगली आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 06/27/2015 - 11:48 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
K
karan_143 Mon, 06/29/2015 - 17:53 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/29/2015 - 18:13 नवीन
हाण तेज्यामारी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/29/2015 - 19:21 नवीन
छान आहे कविता ! जळजळीत वास्तव !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा