Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पैंजणे

स — सटक, Fri, 06/26/2015 - 07:50
कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे ! उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे ! आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे ! पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !

प्रतिक्रिया द्या
2632 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ए
एक एकटा एकटाच Fri, 06/26/2015 - 09:05 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
स
सटक Fri, 06/26/2015 - 15:49 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/27/2015 - 12:02 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
स
सटक Sat, 06/27/2015 - 18:37 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/27/2015 - 18:52 नवीन
दर प्रती सादा लागी नाही धन्यवाद म्हणणे! दहा प्रतिसाद होता तोवरी थांबणे थांबणे!!!
  • Log in or register to post comments
स
सटक Sat, 06/27/2015 - 19:08 नवीन
धन्यवादा एक कारण, वरती धागा आणणे ! सूज्ञ तुम्ही येथले बहु, बाकी न लगे सांगणे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/27/2015 - 19:39 नवीन
आवडते का तुम्हासहि, नवनीत चीप होणे न व्हावे इतुकिच इच्छा, बाकी तुमचे तुम्ही जाणणे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक
स
सटक Sat, 06/27/2015 - 20:11 नवीन
येथ आहे नवीन मी, अन अधिक ह्वे ते वाचणे ! चार गोष्टी अधिक कळता, होइल नूतन जाणणे !! आपणासी अगर ठावे, मार्ग नूतन जोखणे ! सांगता मज निश्चयाने, त्याच पंथी चालणे !! जे मी लिहितो आहे त्याचे बरे-वाईट परिक्शण व्हावे ही इच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मदनबाण Sun, 06/28/2015 - 06:40 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा