Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नंगा नाचेन मी एक दिवस

प — पथिक, Fri, 06/26/2015 - 11:38
हाता पायातील बेड्या तोडून अंगावरील लक्तरं वाऱ्यावर भिरकावून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत अंधाराची होळी करून प्रकाशानं मनाची झोळी भरून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत नाव गाव पाण्याखाली बुडवून स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून नंगा नाचेन मी एक दिवस या संत औलीयांच्या भूमीत

प्रतिक्रिया द्या
12162 वाचन

💬 प्रतिसाद (56)
भ
भिंगरी Fri, 06/26/2015 - 11:40 नवीन
नाच बाबा तुला वाटेल तिथे.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 06/26/2015 - 15:34 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
व
वेल्लाभट Fri, 06/26/2015 - 11:47 नवीन
नाही पोचली बुआ.
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 06/26/2015 - 11:51 नवीन
ओके. मी चांगली आहे या भ्रमात होतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
सूड Fri, 06/26/2015 - 12:03 नवीन
सगळ्याचा नंगा नाचण्याशी काय संबंध आहे ते कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक
प
पथिक Fri, 06/26/2015 - 12:58 नवीन
सगळे विकार, वासना, बंधने, इ. (आत्म्याची वस्त्रे या अर्थाने) चा त्याग केल्यावर नंगाच असणार ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 06/26/2015 - 13:10 नवीन
आत्म्याची वस्त्रे
यावरुन नंगा हे देहासंदर्भात आलं असं समजतो. जर आत्म्याचे वस्त्र, म्हणजे देहच नसेल तर नंगा होण्याचा संबंध कुठे येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक
प
पथिक Mon, 06/29/2015 - 10:42 नवीन
देह रुपी वस्त्र तर फार सहज गळून जाते आणि नाही गेले तरीही फारसे नुकसान नाही त्यापासून. आत्मा जी प्रतिष्ठेची, लज्जेची, संकोचाची, इ. लक्तरे नेसून असतो ते इथे अभिप्रेत आहे. 'सर्व बंधनांतून मुक्त होऊन ' त्या आनंदात नंगा नाचेन असा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मोहनराव Fri, 06/26/2015 - 11:51 नवीन
नाचो जी भरके!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 06/26/2015 - 11:55 नवीन
क भौ ? काहून नाचू राह्यला बे ?
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 06/26/2015 - 12:02 नवीन
देखिये जी इस तरह धमकि देने से तो काम नहि होगा..जंतर मंतर हमारी वजह से हि आज दुनिया मे जाना जाता है! अगली पांच साल का हमारा अ‍ॅडव्हांस बुकिंग हय. आप अगर इस तरह से नाचने कि धमकि दोगे तो यार हमारे लिये क्या काम रह जायेगा.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 06/26/2015 - 12:10 नवीन
नाचायचंच तर नच बलिये वा आजा नच ले, अशा कार्यक्रमात नाचा, म्हणजे टी.व्ही. वरुन सगळ्यांनाच दिसेल.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 06/26/2015 - 12:15 नवीन
त्यांना तुमचा नंगा नाच आवडला तर बक्षिस पण मिळेल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 06/26/2015 - 12:42 नवीन
नगरशेव्हक, आमदार किंवा खासदार होउन, अंगावरती खादिची झूल पांघरुन, पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस, या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत, न्याय नितीची होळी करुन, टेंडर साठी बड्या अधिकार्‍यांची झोळी भरुन, पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस, या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत टगेगिरी करत धरणाचे पाणी पळवून, जमिनी लुबाडून टोलेजंग इमारती बांधून, पैशांच्या राशीत लोळेन मी एकदिवस, या सुरेश, लालु, जया आणि मायाच्या भूमीत, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 06/26/2015 - 12:51 नवीन
पैजारबुवा, मस्तच एकदम. तदुपरि नगरशेव्हक म्हणजे अख्ख्या गावाची भादरणारा, बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ह
होबासराव Fri, 06/26/2015 - 12:57 नवीन
हा म्हणजे खरच कळस आहे :) नगर- शेव्हक :) अर्रारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/26/2015 - 14:58 नवीन
शब्दखाटूक या पदवीला साजेसा प्रतिसाद. =)) आणि टाळ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/27/2015 - 05:53 नवीन
अख्ख्या गावाची भादरणारा = ग्रामशेव्हक अख्ख्या नगराची भादरणारा = नगरशेव्हक अख्ख्या देशाची भादरणारा = प्रधानशेव्हक पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अविनाश पांढरकर Fri, 06/26/2015 - 13:31 नवीन
जबराट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/26/2015 - 14:59 नवीन
लै भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जडभरत Sun, 07/05/2015 - 05:18 नवीन
मस्तच हो बुवा मस्तच! झक्कास विडंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
निरन्जनदास Wed, 07/08/2015 - 10:12 नवीन
पैजारबुवा , तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज बडी है मस्त तू चीज बडी है must must.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 09/26/2015 - 05:49 नवीन
माऊली झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ह
होबासराव Fri, 06/26/2015 - 12:47 नवीन
खतरनाक आणि समर्पक लिहिलय
  • Log in or register to post comments
म
मंदार कुमठेकर Fri, 06/26/2015 - 12:51 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 06/26/2015 - 13:06 नवीन
नाना तर्‍हेच्या डु आयडया काढुन ब्रिगेडि साहित्यसूर्यांचे साहित्य वाचुन नंगा नाचेन मी एक दिवस या द्वेष मत्सराच्या गुर्मित जातिवाचक धागे काढुन त्यांचेच आडनाव उधार घेउन नंगा नाचेन मी एक दिवस या द्वेष मत्सराच्या गुर्मित
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 06/26/2015 - 13:14 नवीन
20 hours 1 min
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 06/26/2015 - 14:45 नवीन
स्वत्त:चीच राख पायाखाली तुडवून
अरे भाई आखीर क्या दिखाना चाहते हो ? हाडुक???
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 06/26/2015 - 15:21 नवीन
बघ तुला जमेल तसं कर.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 06/26/2015 - 15:35 नवीन
(चाल- नाच मेरी जान नाच नाच) - नाच पथिका नाच नाच तुझ्या पाण्याखाली गाव गाव राख पायात तुडव दण दण दण. दं दं दं दण... दं दं दं दण नाच पथिका नाच नाच.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 06/26/2015 - 15:48 नवीन
कल्पना चांगली आहे पण नंगानाचाचा अतिरेक झाल्यामुळे फसलीय. प्रत्येक कडव्यातल्या त्या दोन ओळी काढून शेवटी कनक्लूजनच्या स्वरुपात वापरा. मजा येईल.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/26/2015 - 15:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
पथिक Mon, 06/29/2015 - 09:43 नवीन
धन्यवाद! पुढल्या वेळी कुठे शेअर केली तुमची सूचना अंमलात आणिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
पथिक Mon, 06/29/2015 - 09:43 नवीन
'नंगानाचाचा अतिरेक' :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
श
शशांक कोणो Mon, 06/29/2015 - 09:48 नवीन
मी विकू भाऊ शी सहमत आहे. अति तिथे माती होते. त्यामुळे थोडक्यात गोडी असते असे समजून नाचावे. बघायला येउत..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
द
दमामि Fri, 06/26/2015 - 15:51 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 06/29/2015 - 09:41 नवीन
धन्यवाद! बस्स! आता तुमच्या या पावतीरुपी काडीला घट्ट धरून टीकेच्या या महापुरात तग धरीन मी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/26/2015 - 17:52 नवीन
Image removed. + Image removed. = Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/27/2015 - 16:13 नवीन
स्मायलीबुवा इज ब्याक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मदनबाण Sat, 06/27/2015 - 16:28 नवीन
नारायण ! नारायण ! या घोर कलियुगात नेत्रांवर अजुन कोण कोणत्या प्रकारचा ताण सहन करावा लागेल हे त्या वैकुंठपतीसच ठावुक ! देवा नारायणा... मी यक्ष लोकात एक चक्कर टाकुन आपल्या चरणी लोटांगण घालण्यास परत यावे म्हणतो... कसे ? नारायण ! नारयण ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 06/29/2015 - 07:49 नवीन
नाच बावा ...आम्ही का बोलाव आता
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 06/29/2015 - 09:51 नवीन
कुंभमेळा जवळ आला आहे. कविमहाराज, या वर्षी नाशिक/ त्र्यंब्यकला येणं करा. तुमची इच्छा पुर्ण करण्यासाठी एकदम गोल्डन चांस. बाय द वे, पुनम पांडेंचं काय झालं ? टीप : हा प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं ? (चित्रपट : सामना) या चालीवर वाचावा.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/30/2015 - 06:40 नवीन
नाच नाचुन अति म्या दमले
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 07/05/2015 - 08:54 नवीन
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 07/05/2015 - 09:10 नवीन
एकदम चपखल गाणं या गाण्यातले लोक सुध्दा "अव्वा अव्वा" नाचतात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 07/05/2015 - 09:23 नवीन
[url=http://www.freesmileys.org/smileys.php][img]http://www.freesmileys.org/smileys/smiley-dance001.gif[/img][/url]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कवितानागेश Sun, 07/05/2015 - 15:28 नवीन
चांगलिये की कविता.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sun, 07/05/2015 - 16:58 नवीन
भाऊ कविता चांगलीच आहे. फक्त त्यातला गहन आध्यात्मिक अर्थ लक्षात येत नसावा. पण एक सुधारणा केलीत तर बरे होईल. नंगा नाच याला आपल्या समाजात वाईट हास्यास्पद अर्थ चिकटलेला आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यासमोर वेगळी चित्रे तरळली असतील. त्यापेक्षा "नग्न होईन मी अर्भकापरी" अशी शब्दरचना चालली असती. असो आपले आपले मत!
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sun, 07/05/2015 - 23:54 नवीन
भाऊ कविता चांगलीच आहे. भाऊ नाही माऊ (तै) म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
य
यसवायजी Sun, 07/05/2015 - 23:56 नवीन
सोरी. गल्ली चुकली. ३.३० ला झोपेत प्रतिसाद दिल्याचा पर्णाम. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा