शरदातला स्वित्झर्लंड : ०२ : स्विस पर्यटनव्यवस्थापनाची झलक
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
त्यानंतर मात्र काही गडबड न होता एमिरेट्स एअरलाईन्सने दुबईमार्गे शिशिरातल्या एका प्रसन्न गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास झ्युरिकच्या हॉटेलवर पोहोचलो.
हॉटेलवर पोहोचल्यावर सर्वप्रथम गरमागरम शॉवर घेऊन दोन तास ताणून दिली. साडेबाराच्या आसपास रिसेप्शनवर पोहोचून चौकश्या करायला सुरुवात केली. हॉटेल आणि महाविद्यालय झ्युरिकच्या टेक्नोपार्कमध्ये एकमेकाजवळच होते, किंबहुना ते तसे आहे हे पाहूनच हॉटेल नक्की केले होते. त्यामुळे आणि अभ्यासक्रम सुरू व्हायला अजून साडेतीन दिवस असल्याने ती काळजी नव्हती.
पोटात कावळे कोकलत होते, तेव्हा सर्वप्रथम पोटोबाची व्यवस्था विचारली. टेक्नोपार्कमध्येच साध्या कबाब-चिकन-चिनी खाद्यांपासून ते इटालियन गुर्मेपर्यंत अनेक रेस्तराँ आणि एक सुपरमार्केट असल्याची अमूल्य माहिती मिळाली आणि धन्य झालो! थोडक्यात रोजमर्राच्या गरजांसाठी धावपळ करण्याची गरज नसल्याने सर्व मोकळा वेळ भटकंतीत घालवायला मिळणार होता, अजून काय पाहिजे?
दुसरी महत्त्वाची चौकशी म्हणजे देशात हिंडाफिरायचे कसे ते. सर्वसाधारणपणे सर्व विकसित देशांत हॉटेलच्या लॉबीत नको तेवढी... आणि बऱ्याचदा गोंधळ निर्माण करू शकतील इतकी... पर्यटनासंबंधी पत्रके ठेवलेली असतात. नवख्या माणसाला त्यांच्या महापुरातून खरेच काय पाहण्यासारखे आहे आणि काय भरताड आहे हे कळणे कठीण होते. स्वागतकाने एका कोपऱ्यात भिंतीवर लावलेली काही पत्रके दाखवली आणि त्याबरोबरच, "पत्रके पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी इथूनच एक रेल्वेस्टेशन दूर असलेल्या झ्युरिक हौप्टबाsनहोफ (Zürich Hauptbahnhof) उर्फ झ्युरिकच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर जाऊन पर्यटन केंद्रात माहिती घ्या" असे सांगितले. हे सगळे मला काटविण्यासाठी तो बोलतो आहे की काय असा संशय नक्कीच आला. इथपर्यंत पोटातल्या कावळ्यांचा गलबला बराच वाढला होता आणि रिसेप्शनवरही बरीच गर्दी होती. तेव्हा प्रथम पोटोबा मग टुरोबा असे म्हणत शेजारच्या रेस्तराँकडे होरा वळवला. टेक्नोपार्कमध्ये एका बाजूला अनेक (स्विस किंमतींच्या तुलनेने) मितव्ययी पण चटकदार रेस्तराँची रांग होती. गुर्मे रेस्तराँ त्यांच्यापासून थोडे हुच्च अंतर राखून आणि एकमेकापासूनही जरा दूर दूर होती. रांगेतले एक छानसे रेस्तराँ निवडून पोटोबा आटोपला आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवरून हौप्टबाsनहोफकडे जाणारी रेल्वे पकडली. हौप्टबाsनहोफ पुढचाच थांबा असल्याने तिकडे जाणारी कोणतीही संथ अथवा वेगवान गाडी पकडली तरी चालेल हे रिसेप्शनवर समजले होते. कोणतीही समस्या न येता हौप्टबाsनहोफला पोहोचलो. झ्युरिक हौप्टबाsनहोफ हे स्वित्झर्लंडमधले सर्वात मोठे आणि युरोपमधल्या मोठ्या रेल्वेस्टेशन्सपैकी एक आहे. याच्या नावाचे लघुरूप "झ्युरिक HB" असे आहे.
झ्युरिक हौप्टबाsनहोफ ०१
झ्युरिक हौप्टबाsनहोफ ०२
फाsरप्लानाऊसकुंफ्ट : पाच दिवसांच्या सर्व प्रवास-जोडप्रवासां(connections)ची पर्यटकाला देण्यासाठी छापलेली "वैयक्तिक वेळापत्रके"
पाच दिवसांचा स्विस फ्लेक्सी पास
शरद ऋतूमधल्या स्वित्झर्लंडच्या भटकंतीचा मार्ग
मायस्वित्झर्लंड.कॉम : स्विस पर्यटन खात्याचे अधिकृत संस्थळ
स्विस पासची माहिती व विक्री करणारे रेल्वेचे अधिकृत संस्थळ
भारतीय चलनात स्विस पासची विक्री करणारे एक संस्थळ
.
अश्या तर्हेने, स्वित्झर्लंडच्या सफरीसाठी आवश्यक त्या आयुधांनी सज्ज होऊन मी झ्युरिकमधली पहिली संध्याकाळ आनंदाने साजरी करण्यास निघालो.
आखीवरेखीव, बर्यापैकी गजबजलेले तरीही स्वच्छ, सुंदर, मोकळ्या-ढाकळ्या झ्युरिकचे प्रथमदर्शन मनाला भावलं. तिथेच माझ्या झ्युरिकबरोबरच्या प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणाची सुरुवात झाली ! पण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी. तास दोन तास झ्युरिकच्या पाय नेतील त्या रस्त्यावरून आणि गल्लीबोळांतून वाट फुटेल तसे हिंडत होतो...
झ्युरिक हौप्टबाsनहोफचा दर्शनी भाग ०१
झ्युरिक हौप्टबाsनहोफ ०२
झ्युरिक ०१
झ्युरिक ०२
झ्युरिक ०३
झ्युरिक ०४
झ्युरिक ०५
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai