पाककृती

पिकल्या आंब्याची भाजी / कढी

Primary tabs

साहित्य .

चार आंबे .. साल काढुन गराच्या बारीक फोडी कापून घ्याव्यात. थोडा गर क्रश करून आमरस करुन ठेवावा.

अर्धा नारळ किसून घ्यावा. वाटीभर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेऊन कुसकरुन त्याचे दूध काढून घ्यावे.

फोडणीसाठी .. एक चमचा तेल, एक चमचा तूप, जिरे , मोहरी , हिंग ,हळद

तिखट , मीठ

दोन चमचे चिंचेचा कोळ , दोन चमचे गूळ

............

एक चमचा तेलात फोडणी करून घ्यावी. मग फोडणी करून झाली की चमचाभर तूप टाकावे.

त्यात आमरस , आंब्याच्या फोडी व नारळाचे दूध घालून शिजवावे.

मग तिखट , मीठ घालावे.

शेवटी कोळ व गूळ घालून पुन्हा शिजवावे.

foto

dadadarekar

पाककृती विभागाची लिंक चालत नाही. कृपया त्या विभागात हा धागा हलवावा.

dadadarekar

फोडीऐवजी डायरेक्ट रसच फोडणीला घातला तरी चालतो... रादर , भाजी जास्त चविष्ट होइइल असा अंदाज आहे. एकदा करणार आहे.

तुम्ही दिलेली पाक विभागाची लिंक चालत नाहे.

याला कोकणात सासम की असेच काहीतरी नाव आहे.

पैसा

मिपावर इतकी वर्षे झाली अजून फोटो टाकायला दर वेळी कसे चुकता हो?

पाकृ चांगली आहे पण सासव म्हणतात ते हे नव्हे.

dadadarekar

मिपा औघड आहे.

सासवात मोहरी जास्त असते का ?

खरी गोष्ट....

पण ते फक्त काही लोकांच्या बाबतीत..म्हणजे अवतारी जनतेसाठी....

(एकच आय.डी. असणारा) मुवि

पैसा

हो, जास्त म्हणजे फक्त ओले खोबरे, मिरे, मोहरीच असते. बाकी काही मसाले नसतात. हळद, चिंच हे पण नसते. फोडणी नसते. हे रायते किंवा तत्सम प्रकारात येते.

आंब्याची कढी आम्ही तुम्ही दिलीय तशी पण जरा वेगळी करतो

dadadarekar

इथेच किंवा आंबे आहेत तोवर पटकन करुन नवीन धागा लिहा.

पैसा

एक वाटीचे ओले खोबरे, १ चमचा धने, ४-५ मिरी, ३ सुक्या मिरच्या, १ चमचा हळद वाटून ठेवा. ४-५ रायवळ आंबे सोलून रसासहित ठेवा. एका पातेल्यात तेल मोहरी हिंग कढ़ीपत्ता याची फोडणी करा. त्यात वाटलेला मसाला, आंबे घाला. चवी प्रमाणे मीठ गूळ घाला. हवे तितके पाणी घाला आणि शिजवा.

सुनील

पैसातैंनी रेसिपी दिलेलीच आहे.

आंब्याच्या सासवाप्रमाणे (ह्याचा सासम असाही एक उच्चारी पाठभेद आहे) अननसाचाही वापर करून ही रेसिपी करता येते!

बाकी, तुमची रेसिपी सासवापेक्षा निराळी असली तरी छान दिसतेय. करून पहायला हवे.

अजया

दरवेळी अाधी फोटो टाकता न येणारी पाकृ!आता पुढच्या अवतारात नविन काहीतरी ट्राय करा!