सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग २
आधीच्या धाग्यावर प्रतिक्रिया शंभरच्या आसपास पोहोचल्याने नवीन धागा तिथल्या नव्या बातमीच्या प्रतिसादापासून वेगळा काढून नव्याने सुरु करत आहोत.
- संपादक मंडळ
जेव्हा संवेदना मृत्यू पावतात…
बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना... तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले...
महाराष्ट्र टाईम्समधील ही बातमी
💬 प्रतिसाद
(9)
ग
गवि
Mon, 06/29/2015 - 10:16
नवीन
अशा वेळी फोटो काढणं / व्हिडीओ काढणं याला नेमकं काय म्हणावं किंवा त्याविषयी कसा प्रतिसाद द्यावा ते कळेनासं झालंय. अगदी मृतदेहांचे नव्हे, पण अपघातस्थळाचे किंवा नेहमी जे दिसत नाही ते (उदा ट्रेन घसरणे, ट्रक उलटणे) याचे फोटो शक्य असतील तेव्हा काढणं हा ह्युमन नेचरचा एक भाग झाला असणार. पण ते सर्व अपघात होऊन गेल्यावर काही काळाने तिथे पोचणार्यांबाबत समजून घेता येईल. इथे या केसमधे निरुत्तर व्हायला होत आहे.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Mon, 06/29/2015 - 10:21
नवीन
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 06/29/2015 - 12:31
नवीन
माझ्या मते चित्रपट-मालिकांमधून धक्कादायक चित्रणे वारंवार बघितल्याने मनुष्याची मानसिकता प्रभावित होऊन अशा प्रत्यक्ष घटनांवर खोट्या घटनांप्रमाणेच रीअॅक्ट होण्याचे अजाणतेपणी घडते. म्हणजे खून-बलात्कार-अपघात-रक्त इतकेवेळा बघून त्याबद्दलची फर्स्ट पॉसिबल रीअॅक्शन पार डीफयुज झाली असावी. त्यात आता वृत्तवाहिन्यांनी 'सबसे पेहले आणि सिर्फ इसी चॅनेलपर 'ची जोरदार प्रमोशन्स सुरू केल्यापासून प्रथम बघायला मिळणे आणि ते इतरांना आपण सांगणे हे काहीतरी ग्लॅमरस-एक्सायटींग आहे हे मानल्यामुळे तेच मानवी मनात प्राधान्यक्रम झाले असावेत. त्याचेच पुरावे देता यावे म्हणून विडीओ किंवा फोटो काढून शेअर करणे घडते.
अशा घटनांमधे पुष्कळदा समाज बघ्याची भुमिकाच घेतो याचे कारण आता तो कायम बघ्याच्याच भुमिकेत असतो. पुढे घडत असलेले खरे आहे हे त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचत नसावे त्या विवक्षित क्षणी. परत त्यावर कसे रीअॅक्ट व्हावे याचेही कुणी प्रशिक्षण देत नाही. अशा घटनांपासून शक्यतो दूरच राहावे -इजा टाळण्यासाठी व पोलिसांचा झमेला टाळण्यासाठी- अशी शिकवण घराघरांतून दिली जाते. अशा दोन प्रखर मानसिक प्रभावांमधे असलेल्या माणसांकडून योग्य प्रतिक्रीयेची अपेक्षा फोल आहे.
यावर उपाय म्हणजे शाळेपासूनच मुलांना आपात्कालिन परिस्थितीचे शिक्षण देणे. त्याचा नियमित सराव कंपल्सरी करणे. त्यातून खर्या घटनांमधे अंतर्मनाकडून फर्स्ट पॉसिबल रीअॅक्शन आपोआप अजाणता घडेल आणि मनुष्य पहिल्या प्रतिक्षिप्त क्रियेने मदतकार्यात ओढला जाऊन ते मदत कार्य पुर्ण करेल.
(निराशाजनक टीप्पणी: आपल्याकडे साधं 'स्वत:ला कसं वाचवावं' याचंही प्रशिक्षण कुणी मुलांना देत नाही. इतरांना मदत करण्याचं तर सोडाच)
(आशादायक चित्रः हे आपण आपल्या घरापासून सुरू करून परिस्थिती बदलण्यास मदत करू शकतो)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/30/2015 - 09:18
नवीन
लाख मोलाची बात
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
Mon, 06/29/2015 - 13:28
नवीन
रेस अक्रॉस अमेरीका (RAAM) ह्या प्रतीष्ठेच्या आणी अत्यंत खडतर अश्या सायकलींग रेस मध्ये नाशीकच्या महाजन बंधूंनी बाजी मारली आहे.
विशेष उल्लेखाची बाब म्हणजे रेसच्या ईतीहासात भारताचे पहील्यांदाच प्रतीनीधीत्व असण्यार्या ह्या रेस मधे ह्या डॉक्टर बंधूंनी पहील्यांदाच भाग घेऊन १८-५० वयोगटाती टिम कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
त्यांनी एकूण ३००० माईल्स एवढे अंतर (वेस्ट कोस्ट ते ईस्ट कोस्ट) ८ दि. १४ ता. आणी ५५ मी. हा भीम पराक्रम केला आहे..
साष्टांग दंडवत _/\_
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/29/2015 - 13:42
नवीन
महाजन बंधूंचे हार्दीक अभिनंदन !
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 06/29/2015 - 13:54
नवीन
ग्रेटच, हे दोघेही बंधू ग्रेटच आहेत.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Mon, 06/29/2015 - 14:53
नवीन
अरे वा!अभिनन्दन!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 07/01/2015 - 08:58
नवीन
मतदार याद्या अद्यतन करण्याचे काम १२ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.ठाणे/कल्याण परिसरांत तरी आहे.
- Log in or register to post comments