Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भटकंती- ८ तदाओ आंदो

इ
इन्ना
Mon, 06/29/2015 - 12:57
💬 14
भटकंती - ८ तदाओ आन्दो . आर्किटेक्चर्ला असताना कॉलेज ला दांडी मारून केलेले उद्योग पण समृद्ध करणारे होते. उगाच एम८० वर डेक्कन वरून , मुळशी, कोंढवा, बाणेर वगैरे उन्हात भटकून तथाकथीत कंटेपररी ( पुण्यात चुकार एखाद दोनचार उदाहरण वगळता दुष्काळ होता तेव्हा ) आर्किटेक्चर चा अभ्यास! कंटेम्पररी , समकालीन हा शब्द आवडायला लागला होता. एक प्रकारच सबकल्चर/ कल्ट होउ घातलेले आम्ही काही बॅक बेंचर्स! पुण्यात काहीही नाही ह्यावर शिक्कामोर्तब करून, जगात इतर आर्किटेक्ट कसे विचार करतात , व्यक्त होतात , रुढ पायंडे मोडताना काय आणि कसा संघर्ष करतात. हे समकालीन नमुने बाकी कुठे कुठे काय आहे? ह्याचा शोध चालू झाला. हे असले प्रकार बॅक्बेन्चर्स च करू जाणतात. हाहा . नाहीतर कंटेम्पररी आर्किटेक्चर नावाच एकही विषय अभ्यासाला नसताना उगा मुर्खासारखी यातायात कोण करेल? नव्वदच्या दशकात पुण्यात आर्किटेक्चर कॉलेज २ आणि तिथल्या लायब्ररीज अत्यंत बेसिक. मग सापडली ब्रिटिश काउंसिल ची लायब्ररी. ( फक्त ब्रिटिश कॉलेजला दांडी मारून , रेफरन्स सेक्शन च्या गार हवेत , चार्ल्स जेन्क्स आणि त्यांची पोस्ट मॉडर्निझम बद्दलची पुस्तकं , लॅन्ड्स्केप्स बद्दलची पुस्तकं , बॅनिस्टर फ्लेचर चा ठोकळा, फोटोग्राफीबद्दलची पुस्तकं ,असंख्य डिझाइन आणि आर्किटेक्चरची मासिक वाचलीत . अजूनही एखादा रेफरन्स आठवताना रेफरन्स सेक्शन मधिइल शांतता, गार हवा , कारपेटवर आवाज न करता सरकणार्या निळ्या खुर्च्या , अन सुशेगात वाचलेल ते पुस्तक असच आठवतं . अश्याच एका निरुद्देश वाचनात अवचित सापडला तदाओ आन्दो नावाचा आर्किटेक्ट . ( तडाओ आन्डो अस म्हणायचे मी तेव्हा) हैला हे भारीये ! अस मनातल्या मनात म्हणायच्या ऐवजी आवाजी बाहेर पडल्याने लायब्ररियन ने डोळे वटारले. मग मी रुपाली अन अतूल टपरीच्या चहाबरोबर आन्डो सान ना घेउन बसलो. चर्च ऑफ लाइट नावाच सुबक लहानस स्ट्रक्चर! तिथुन ह्याच्या डिझाइन्स्च्या प्रेमात पडण सुरु झाल. नन्तर कामानिमित्त केलेल्या जपान प्रवासात, आवर्जून पाहिली त्यांची डिझाइन्स. वाचलेल अनुभवण तितकच मस्त. जपान ला जायची पहिली संधी मिळाली तेव्हाच काय काय नक्की पहायच ह्याची लिस्ट करून ठेवली होती. काम फक्त तोक्यो मधे असणार होतं, त्यामुळे आन्डो सानची २१-२१ डिझाइन साईट पहायच ठरवल. जपान मधल्या दहा पैकी आठ जण तोक्योत अस गमतीनी म्हटल जातं. जगातली सर्वात घनदाट लोकवस्ती असलेल महानगर. आकाशाला गवसणी घालणार्या इमारती अन दिवसाच्या कोणत्याही प्रहरी ओसंडून वाहणारे रस्ते. ह्यातल एक हॅपनिंग उपनगर आहे रोप्पोन्गी. बरेचसे ठिपके जुळत जुळत ही इमारत उभी राहिली. डिफेन्स च्या ताब्यातली एक मोकळी जागा होती. समकालीन कलाकाराना तथाकथीत अंगावर येणार्या विकासात जपानीपण हरवतय अशी खंत होती . एस्थेटिक्स /सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणार व्यासपीठ असाव ही मागणी होती. इसे मियाके नावाच्या अंतरराष्ट्रीय किर्तीच्या फॅशन डिझायनर नी आन्डो च्या सहाय्याने पहिला प्रस्ताव मांडला अन सगळे टिपके जुळायला सुरवात झाली. २००२ पासून सलग २- २.५ वर्ष एकामागोमाग एक संकल्पना सादर केल्या गेल्या. अन अखेर २००५ मधे कामाला सुरवात झाली . बर्याच अडचणी होत्या. जागा मैदान अथवा खुली जागा म्हणून आरक्षित होती. त्यामुळे बहुतांश भाग जमिनी खाली असण अपेक्षित होतं .आजूबाजूच्या उंच इमारतींच्या गर्दीत ही पिटुकली इमारत हरवण्याची भिती होती. संकल्पना होती पिस ऑफ क्लॉथ , कापडी रुमाल. ओरिगामीच्या घडीची आठवण करून देणारा . मियकी इसे यांच्या संकल्पने प्रमाणे एक साध कापड जरुरीप्रमाणे अन ते कापड वागवणार्या माणसाच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे वेगवेगळी रुपडी धारण करतं. दोन चौकोन डायगोनली दुमडून उंच सखल मैदानावर, मावतील तसे ठेवले , इतक सोप आणि सहज .clothवास्तुविशारदाच्या पुढे बरिच आव्हान असतात , एखाद्या शिल्पकारानी शिल्प घडवाव तशीच वास्तू विशारद इमारत घडवत असतो, पण संकल्पनेच्या पुढे जाउन त्या संकल्पने ला तांत्रीक चौकटीत बसवणे , नगरविकासाच्या जटिल आकडेमोडीत बसवणे , एक कंपोझिशन म्हणून आसपासच्या इमारती ,निसर्गाला पुरक असणे , त्या पलीकडे जाउन संकल्पने तली सहजता न हरवता ती इमारत म्हणून प्रत्यक्षात आणणे. ह्या सगळ्या आघाड्यांवर आन्दोसान पुर्णपणे यश्स्वी होतात. एखाद्या वास्तुविशारदाच काम सुरु होतं ते जागेच्या वापराच नियोजन करण्यापासून. मग नियोजन आतलया जागेच, त्यांच्या एकमेकांशी संबंधाच , छायाप्रकाशाच. त्या बिल्ट अन्बिल्ट च्या गोफ विणत ,बांधकाम साहित्य कोणत ? त्याचा पट मांडणे, त्यांचे पोत , रंग कंपोज करणे . ह्या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ती वास्तू वापरणार्या , तीच्या असण्यानी ज्याना , किंवा तस असण्यानी कोणाकोणाला कसा कसा फरक पडतो त्याचा विचार , अभ्यास. ह्या सगळ्या मुद्द्याना अत्यंत समर्थ पणे पेलत २१-२१ डिझाइन साईट साकारली आहे . नियोजीत इमारती मागे उंच झाडांची रांग योजल्यामुळे , काँक्रीट अन काचेच्या टोलेजंग इमारतींच्या गर्दीच्या स्कायलाइन ऐवजी हा हिरवा बॅक्ड्रॉप बहार आणतो. skyscrapers pathaway signage अत्यंत काळजीपुर्वक जोपासलेल्या हिरवळीच्या मैदानातून एका पायवाट आपल्याला ह्या सुबक ठेंगणीच्या दिशेनी नेते . इमारतीचा बहुतांश भाग जमिनी खाली असल्यानी सामोर्‍या येतात त्या दोन मोठ्या स्टीलच्या त्रीकोणी प्लेट्स. roof हे रूफ! अलगद उतरत हिरवळीला येउन भिडणारं. आत प्रवेश केला की एक लहानसा स्वागत कक्ष आणि खाली उतरणा र्‍या पायर्‍या. staircase to basementखालचा उलगडलेला मजला अनपेक्षित मोठा हॉल आहे. ज्यात दोन गॅलरीज ( कक्ष म्हणा हव तर) आहेत. एक त्रिकोणी कोर्टयार्ड खाली उजेड पोचवत . आणि तळघरातल्या हॉल्स मधे असल तरी बंदिस्त वाटत नाही. stairs मी दोनदा जाउन आले तिथे, प्रत्येक वेळी गॅलरीज मधे कॉन्टेपररी आर्ट , स्कल्पचर्स , पेंटिंग्स ची फिरती प्रदर्शने होती, होतकरू कलाकार आवर्जून हिरीरीने चर्चा करत होते . सर्व वयोगटातील, हौशी , व्यावसायीक , कलाकार समिक्षक , स्टुडन्ट्स चा सहभाग जाणवला मला अगदी युटोपिअन वाटाल हे सगळ. exhibition तिथे स्वागत कक्षामधे अन्दो सान च एक पत्र वजा निरोप आहे. हा प्रोजेक्ट का अन कसा केला ह्यबद्दलच . त्याचा थोडक्यात सारांश असा, "माझी अशी ठाम समजूत आहे की जपान हे अस एक राष्ट्र आहे की त्याचा र्‍हास होण उर्वरीत जगालाही घातक होइल. ह्याचाच अर्थ जपानच जपानीपण , एस्थेटिक्स जतन केलं पाहिजे. इथे एस्थेटिक्स म्हणजे जबाबदारीची जाणीव, न्यायाची जाणीव, सभोवतालच्या वातावरणा बद्दल , लोकांबद्दल संस्कॄती बद्दल आदर हे सगळ आल . पर्यावरणाबद्दल , जगण्याबद्दल , जिवनाबद्दल कृतज्ञता आली. आणि हे सगळ जपानीपण जतन करायचय आपल्याला १९६० नंतरच्या वाढत्या आर्थिक सुबत्तेबरोबर , नफेखोरी हे सुत्र बनत चालल आहे. ह्या नव्या जिवन शैलीत सुबत्ता , पैसा असणे हे महत्वाचे बनत चालले आहे, जिवनाची जुनी मुल्य नाहीशी होतायत, तोक्यो मधल्या कोणत्याही रस्त्यावर उभ्या टोलेजंग काचेच्या इमारती जपानी आहेत का? सुंदर आहेत का? आपल्या पुढच्या पिढीला आपण जपानीपण म्हणून काय देणार? मला अशी सुंदर वास्तू रचायची आहे, ज्यात जपानी पण काय आहे , सौदर्य, त्याची समज , नवे विचार ह्यावर चर्चा होइल, हा प्रोजेक्ट म्हणजे माझ्या त्या स्वप्नाचे मुर्त रूप आहे. सहज सरल जपानी समकालीन सौंदर्यवृत्तीच उदाहरण म्हणून आपण. आणि सभोवतालच्या सवंग प्रदर्शन करणार्‍या देखण्या फसाडस् वर उतारा पण. " - तदाओ आन्दो. एक राष्ट्र म्हणून आपली ओळख , एस्थेटिक्स जपल पाहिजे, आणि तेवढच नाही तर ते जपणं म्हणजे जुनं ते राखून म्युझियम्स बनवणे नसून , समकालीन विचारानी ते समृद्ध करणे. आहे हे जाणणे, चळवळ बांधून त्यात नव्या पिढीलाही ओवणे हे महत्वाच काम आन्दो सान करतात. मला विद्यार्थी असताना भावलेले आन्दो सान , आता मी स्वतः प्रॅक्टीस करताना अजून मोठे भासतात !!

Book traversal links for भटकंती- ८ तदाओ आंदो

  • ‹ भटकंती ७
  • Up
  • भटकंती ८ १/२ - तदाओ आन्दो ›

प्रतिक्रिया द्या
4864 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
सौंदाळा Mon, 06/29/2015 - 13:55 नवीन
वेगळ्या विषयावरचा आणि वेगळ्या धाटणीचा लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 06/29/2015 - 14:26 नवीन
अन्दो-सान आणि या उत्कृष्ठ इमारतीची ओळख करून दिल्याबदद्ल तुमचे धन्यवाद. ही कल्पनाशक्ती, ही स्पेस मॅनेज्मेंट फक्त एक जपानीच करू जाणे. अन्दो-सान चं पत्रं/ निरोप पण अतिशय छान.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/29/2015 - 14:36 नवीन
छान लिहिलं आहेस इन्ना. आवडलं.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 06/29/2015 - 15:52 नवीन
तुमचं हे वास्तुशास्त्र ललित कम भटकंती फार आवडते वाचायला. पुलेशु.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 06/30/2015 - 09:42 नवीन
असेच म्हणते. आवडली ही भटकंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 16:43 नवीन
फार छान लिहीत आहात. वास्तू-शास्त्रा बद्दल अजून वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/29/2015 - 17:07 नवीन
माझ्या आवडीचा विषय.इथे आणल्याने बरं वाटलं.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 06/29/2015 - 21:42 नवीन
तदाओ आन्दो आणि त्यांनी निर्माण केलेल्या या इमारतीची ओळख चांगली करून दिली आहे.
  • Log in or register to post comments
इ
इन्ना Tue, 06/30/2015 - 06:53 नवीन
धन्यवाद. :) त्यांनीच डिझाइन केलेल्या अजून एका इमारतीबद्दल लिहिइन आता.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 06/30/2015 - 09:00 नवीन
छान माहिती . "उगाच एम८० वर डेक्कन वरून , मुळशी, कोंढवा, बाणेर वगैरे उन्हात भटकून तथाकथीत कंटेपररी ( पुण्यात चुकार एखाद दोनचार उदाहरण वगळता दुष्काळ होता तेव्हा ) आर्किटेक्चर चा अभ्यास! " "नव्वदच्या दशकात पुण्यात आर्किटेक्चर कॉलेज २ आणि तिथल्या लायब्ररीज अत्यंत बेसिक. मग सापडली ब्रिटिश काउंसिल ची लायब्ररी. ( फक्त ब्रिटिश कॉलेजला दांडी मारून , रेफरन्स सेक्शन च्या गार हवेत , चार्ल्स जेन्क्स आणि त्यांची पोस्ट मॉडर्निझम बद्दलची पुस्तकं , लॅन्ड्स्केप्स बद्दलची पुस्तकं , बॅनिस्टर फ्लेचर चा ठोकळा, फोटोग्राफीबद्दलची पुस्तकं ,असंख्य डिझाइन आणि आर्किटेक्चरची मासिक वाचलीत . अजूनही एखादा रेफरन्स आठवताना रेफरन्स सेक्शन मधिइल शांतता, गार हवा , कारपेटवर आवाज न करता सरकणार्या निळ्या खुर्च्या , अन सुशेगात वाचलेल ते पुस्तक असच आठवतं " मस्त.. यांनी खरं पुणे एन्जॉय केले ..
  • Log in or register to post comments
इ
इन्ना Tue, 06/30/2015 - 09:18 नवीन
केल खर एन्जॉय. लकडी पुलावरून दुचाक्या नेता यायच्या त्या दिवसात अन फर्ग्युसन कॉलेज रोडवर दुतर्फा झाडांच्या कमानीत असायच्या . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
स्वाती दिनेश Tue, 06/30/2015 - 09:48 नवीन
लेख आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/30/2015 - 17:13 नवीन
सुंदरच लिहिलंय! लेख आरामात वाचू म्हणून ठेवला होता. त्याचं चीज झालं!
  • Log in or register to post comments
म
मनोज श्रीनिवास जोशी Tue, 06/30/2015 - 18:54 नवीन
लेख आवडला. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा