एक काम करण्याची परवानगी दे फक्त
रागाने झिडकारशील
स्वतःपासून दूर करशील
पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त
मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी
तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी
ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
केसांच्या बटांची ती रेशीमडोर
लटक्याने येईल डोळ्यांसमोर
ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
घाईत कधी हळूवार
फसेल कुठेसा पदर
तो सोडवण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
रात्री एकांती कधी चमकेल वीज
दचकून अचानक तुटेल नीज
कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
तुजवीन सखे काय ठाव
कधी अर्ध्यावर मोडेल डाव
आठवणीत येण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त
(भावानुवाद / प्रेरणा : गुलजार - मुझको_इतने_से_काम_पे_रख_लो)
💬 प्रतिसाद
(7)
स
संदीप डांगे
Tue, 06/30/2015 - 10:55
नवीन
सुंदर...!!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/30/2015 - 11:08
नवीन
चायला परवानगी?? बायको स्वतःची अस्ताना? =))
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 06/30/2015 - 11:10
नवीन
तुमचे लग्न झालाय का ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/30/2015 - 11:12
नवीन
खिक्क...कै संबंध
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 06/30/2015 - 11:24
नवीन
लग्न झाल्यावर कोणत्या कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात(स्वतःच्या बायकोच्या) ते सुज्ञ (आणि विवाहित ) मिपाकरांना विचारावे
हुकुमावरून
कहर ;) ;)
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 06/30/2015 - 11:34
नवीन
टक्या लग्न कर..
- Log in or register to post comments
उ
उदय के'सागर
Tue, 06/30/2015 - 11:13
नवीन
'विवाह' शिणेमातल्या 'मुझे हक है' ची आठवण झाली.... :P
- Log in or register to post comments