Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

⇆ व्यवहार ⇆

श
शंतनु _०३१
Tue, 06/30/2015 - 14:03
🗣 11 प्रतिसाद
⇆ व्यवहार ⇆ नाण्याला दोन बाजू असतात, त्यातली एक बाजू आपण पाहू शकतो आणि दुसरी बाजू ही थोड्याशा प्रय़त्नाने अभ्यासली जाऊ शकते. माध्यमे , facebook किवा इतर व्यक्त होण्याचा साधनांवर प्रोटागोनीस्ट अेन्तागोनीस्ट हा वाद चालू असतो. कुणी काय केल किवा कुणी कशी हुकुमशाही गाजवली अथवा गाजवतोय या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा ती (सत्तेची ) फेज कुणी अभ्यासत का नाही ? मुळापासून रोगाचा इलाज करण्यापेक्षा त्याच्या लक्षणाची चिकिस्ता करून उथळ पांडित्य प्रदर्शन जास्त चालू आहे. वीट आलाय सगळ्याचा, मुळात नाण्याला दोन बाजू असतात हे मान्य, पण या नाण्याचा व्यवहार कसा होतो या बाबत आपण अनभिज्ञच असतो, सत्ता हातात आल्यावर तत्त्वांपेक्षा (इतर) गोष्टींना प्राधान्य का दिले जाते, अथवा जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत असते तेव्हा (प्रोटागोनीस्ट अेन्तागोनीस्ट) यांच्या भूमिका बदलेल्या असतात. मग ज्याला विरोध आहे तो व्यवहार का अभ्यासला जात नाही ? पण तसं होणार नाही कारण उथळ पांडित्य प्रदर्शन करण्यार्यांची बाजारपेठ सध्या जोरात आहे, आणि त्याचे व्यवहार आपल्या आकलना पलीकडचे आहेत, तिथे फक्त नाण्यांची चर्चाच होत असते
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
5146 वाचन

💬 प्रतिसाद (11)
क
कपिलमुनी Tue, 06/30/2015 - 14:08 नवीन
नवलेखकाचा पैलाच लेख हाये :) मिपाकरांनी ल्हान पोराले समजून घ्यावं.
  • Log in or register to post comments
श
शंतनु _०३१ Tue, 06/30/2015 - 14:30 नवीन
धन्यवाद,…. पुढील लेख विस्ताराने लौकरच लिहितो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आदूबाळ Tue, 06/30/2015 - 14:23 नवीन
कहना क्या चाहते हो? एवढ्या तात्त्विक पातळीवर लिहिण्याच्या ऐवजी उदाहरणं लिहिली असती तर बरं झालं असतं...
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 07/01/2015 - 11:39 नवीन
विरोधक विरोधाची भाषा बोलतेय आन सत्ताधीश सत्तेची भाषा बोलतेत. तिकडंचे हिकडं झाले आणि हिकडंचे तिकडं गेले की तेच करतेत. वगैरे वगैरे.. त्या ऐवजी प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून का पाहित नैत हे लोक्स असा प्रश्न पडलाय वो. कल्लाव काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
शंतनु _०३१ Wed, 07/01/2015 - 14:30 नवीन
कलल्ला हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
व
वडाप Tue, 06/30/2015 - 15:20 नवीन
समजलं.
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 06/30/2015 - 15:49 नवीन
लेखाची लाबी जरा कमी करता आली तर बघा, व नेमक्या शब्दात भावना व्यक्त करा. एकदम इतके सगळे वाचताना नक्किच दमछाक होते आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 06/30/2015 - 15:56 नवीन
शिर्षकामध्ये त्या बाणांचे काही प्रयोजन आहे का ? का माझ्या आयडीसारखं ?
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 06/30/2015 - 16:16 नवीन
कुठली बाजू घेण्यात आपला फायदा आहे, हा विचार करुन कधी 'प्रोटागोनीस्ट' तर कधी 'अेन्तागोनीस्ट' अश्या बाजु (नाण्याच्या) बदलणार्‍या 'व्यवहारी' लोकांचं प्रतिक आहे हो ते.. ;-) हाय की नाय हो, लेखकराव? असो. विचार कळला, पण मांडणी जरा व्यवस्थितपणे करावी, ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
श
शंतनु _०३१ Wed, 07/01/2015 - 11:25 नवीन
आपण सुज्ञ आहात , मी यापेक्षा जास्त जास्त सुचवू इच्छित नव्हतो , मांडणी बाबत लक्षात ठेवीन प्रतिसादा बद्दल आभारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
श
शंतनु _०३१ Wed, 07/01/2015 - 11:26 नवीन
⇆ व्यवहार दर्शवण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा