Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'मुक्त सांस्कृतिक काम' (अनुवादात तपासण्यात साहाय्य हवे)

म
माहितगार
Wed, 07/01/2015 - 16:04
🗣 11 प्रतिसाद
मुक्त सांस्कृतिक काम कशास म्हणावे या संबंधाने असलेल्या खालील दस्तएवज लेखाचे मूळ इंग्रजी लेखन Erik Möller या ज्रर्मन व्यक्तीनेhttp://freedomdefined.org/Definition या संस्थळावर केले आहे त्याचा हा मराठी अनुवाद. *या मराठीत अनुवादीत दस्तएवजाची आकलन सुलभता वाढावी म्हणून सूचना हव्या आहेत.: "सारांश ज्यांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मोकळेपणाने (मुक्तपणे) अभ्यास करता येईल, उपयोजन[श 1] करता येईल, प्रति काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेचे काम[टिप 1] किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतीक काम'[श 2]अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्यांचे संरक्षण करणाऱ्या अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना जोपासणाऱ्या, विशीष्ट परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.[प 1] मुक्त कामाचे कायदेशीर संरक्षण करणारे मुक्त उपयोगाचे परवाने[श 3], आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते.[प 2][1] मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना "मुक्त" म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते केवळ एक साधन आहे. उपोदघात कलाकृती, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती देणारे काम– थोडक्यात: डिजिटल स्वरुपात सादर करता येऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट – वाढत्या लोकसंख्येस पहावयास मिळणे, ते निर्माण करणे, त्यात सुधारणा करणे, ते प्रकाशित करणे आणि ते वितरीत करणे, हे सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाने शक्य केले आहे. अशा तऱ्हेच्या (काम करण्याच्या) शक्यता अनेक समाजगटांनी हाताळल्या आहेत आणि ज्यांचा पुनःपुन्हा उपयोग करता येईल अशा सामुहिक समृद्धीची निर्मिती केली आहे. बहुतेक लेखक, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, त्यांचा दर्जा व्यावसायिक असो अथवा हौशी असो, त्यांना काम सर्वदूर पोहोचेल, ते पुनःपुन्हा वापरता येईल आणि नव्याने निष्पादित (derive) करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्जक निर्मिती[श 4] करणाऱ्या एका नैसर्गीक व्यवस्थेत अस्सल रुची आहे. काम पुनःपुन्हा वापरणे आणि नव्याने निष्पादित[श 5] करता येणे, हे जितक्या प्रमाणात शक्य होईल, तितक्या कमाल पातळीवर आपल्या संस्कृति समृद्ध होत जातील. अशी नैसर्गीक व्यवस्था सुविहीतपणे कार्यरत राहण्यासाठी, (कोणत्याही) कामांची निर्मिती[श 6] मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे आणि याबाबतीत आपल्याला अभिप्रेत स्वातंत्र्य म्हणजे: कामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे[श 7] कामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या उपयोजनाचे स्वातंत्र्य असले पाहिजे कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रति काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे कामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादित काम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे. (मुक्त सांस्कृतीक कामात सहभाग देणाऱ्या कोणत्याही) लेखकाने (अशी सुधारणा करणारी) कोणतीही कृती न केल्यास त्यांचे सर्व काम, ज्यामुळे इतर माणसे काय करू शकतात आणि करू शकत नाहीत, हे गांभीर्याने निश्चित करणाऱ्या विद्यमान प्रताधिकार कायद्याखाली येईल.[प 3] ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथे सुचवलेल्या प्रमाणे) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. लेखकांनी, प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार, आपले काम केले असले तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) वरील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो. महत्वाचे हे आहे की, "मुक्त काम असल्याचा दावा करणारे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम" व्यवहारतः आणि कोणत्याही जोखीमेशिवाय उपरोल्लेखित स्वातंत्र्य देते. आणि म्हणून (येथून पुढे), (मुक्त) परवान्यांच्या आणि लेखक कामांच्या स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या आम्ही देत आहोत. मुक्त सांस्कृतीक कामाची ओळख ही मुक्त सांस्कृतिक कामांची व्याख्या आहे आणि जेंव्हा तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन कराल तेंव्हा “मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार हे (प्रताधिकार)मुक्त परवाना देणारे काम आहे” असा संदर्भ तुम्ही द्यावा, असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्हाला “मुक्त सांस्कृतिक काम”[श 8] हा शब्द मान्य नसेल तर तुम्ही “मुक्त मजकुर”[श 9] असा सामान्य शब्दप्रयोग करू शकता किंवा अधिक विशिष्ट संदर्भात असे समान मुक्ताधिकार व्यक्त करणाऱ्या विद्यमान चळवळीतील एकाचा संदर्भ देऊ शकता. या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या मुक्त सांस्कृतिक कामाचे मानचिन्ह आणि बटन यांचा वापर मनमोकळेपणाने करण्याचे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत. तथापि कृपया हे लक्षात घ्या की अशा प्रकारचे तादात्मीकरण[श 10]हे काही या व्याख्येत वर्णन केल्यानुसारचे हक्क बहाल करीत नाही; तुमचे काम हे यथार्थतेने स्वतंत्र होण्याकरिता ते मुक्त संस्कृती परवान्यांपैकी एक परवाना वापरला पाहिजे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असले पाहिजे. मात्र, स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्टपणे संप्रेषित[श 11] न करणारे ‘खुला मजकुर/आशय”[श 12] आणि “खुली उपलब्धता/प्रवेश”[श 13] सारखे शब्दप्रयोग मुक्त सांस्कृतिक कामांचा परिचय देण्याकरिता वापरण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. (कारण) असे शब्दप्रयोग विद्यमान कायद्यांनुसार (प्रताधिकारमुक्त) न ठरता, “कमी बंधनकारक’’ शब्दांच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या आशयासाठी किंवा केवळ “आंतरजालावर उपलब्ध” असणाऱ्या कामाचा निर्देश करण्यासाठी म्हणून वापरले जातात. मुक्त सांस्कृतीक परवान्यांची व्याख्या परवाने हे अशी कायदेशीर साधने आहेत की ज्यांच्या मार्फत निश्चित कायदेशीर हक्कांचा मालक (आपल्या) या हक्कांचे हस्तांतरण तिसऱ्या पक्षाला करू शकतो. मुक्त सांस्कृतिक परवाने (कोणाचेही) कोणतेही हक्क हिरावून घेत नाहीत- ते स्वीकारावेत की नाही, हे ऐच्छिक असते, आणि एकदा स्वीकारले तर, केवळ प्रताधिकारहक्क कायद्याने उपलब्ध होणार नाहीत, अशी (अधिक व्यापक) स्वातंत्र्ये ते (परवाने) बहाल करतात. स्वीकारले गेल्यानंतर प्रताधिकारहक्क कायद्यातील विद्यमान अपवाद कमीही करीत नाहीत अथवा त्यांना मर्यादाही घालत नाहीत. अनिवार्य स्वातंत्र्य या व्याखेत स्पष्ट केल्यानुसार (परवाना) “मुक्त” आहे, हे ओळखण्याची खुण, म्हणजे त्या परवान्याने खालिल स्वातंत्र्ये कोणत्याही मर्यादा न घालता बहाल केली पाहिजेत : ते'काम' वापरण्याचे आणि सादर करण्याचे स्वातंत्र्य : परवानाधारकास त्या कामाचा कसाही उपयोग - खासगी असो वा सार्वजनिक- करण्यास, मुभा असली पाहिजे. जेथे जेथे अशा प्रकारच्या कामाचा संदर्भ येईल तिथे तिथे ही कामे सादर[श 14] करणे किंवा त्यांचे अर्थनिर्णयन[श 15] करणे, यासारख्या निष्पादित उपयोगाचा ( म्हणजे त्या “संबंधित हक्कांचा”) समावेश या स्वातंत्र्यात निहित असला पाहिजे. उदाहरणार्थ राजकीय, धार्मिक अथवा (इतर)हेतुने कोणतेही अपवाद असता कामानयेत. कामाच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि माहितीचे उपयोजन करण्याचे स्वातंत्र्य: कामाची चिकित्सा[श 16] करणे आणि कामापासून लाभलेल्या ज्ञानाचा कोणत्याही मार्गाने वापर करण्यास परवानाधारकास[श 17] परवानगी असली पाहिजे. उदाहरणार्थ परवाने "व्युत्क्रम अभियांत्रिकी"[श 18] (reverse engineering)वर निर्बंध घालू शकणार नाहीत. ('कामा'च्या) प्रतिंचे पुनर्वितरण करण्याचे स्वातंत्र्य: एखाद्या मोठ्या कामाचा हिस्सा म्हणून, त्या कामाचा साठा[श 19] करून ठेवण्याचा भाग म्हणून किंवा (हे हेतू न ठेवता) अगदी स्वतंत्रपणे सुद्धा या प्रतिंची विक्री होऊ शकते, देवाणघेवाण[श 20] होऊ शकते किंवा त्या मोफतही दिल्या जाऊ शकतात. खेरीज किती प्रमाणात माहितीच्या प्रती केल्या जाऊ शकतील, त्यावर मर्यादा असणार नाही. ही माहिती कोण प्रतिमुद्रित[श 21] करेल किंवा कुठे या माहितीचे प्रतिमुद्रण होईल यावरही मर्यादा असणार नाही. मूळ कामावर बेतलेले निष्पादित काम वितरीत करण्याचे स्वातंत्र्य:(येथे सुचवलेल्या प्रमाणे) कामात सुधारणा करण्याची क्षमता प्रत्येकास प्रदान करता यावी, या करिता,(एखाद्याकडे सुधारणा करण्याची इच्छा आणि हेतू असो वा नसो पण त्या) सुधारित आवृत्तीचे (किंवा भौतिक कामाचे, म्हणजे मूळ कामावर बेतलेले कोणत्याही मार्गाने निष्पादित होणारे) काम, वितरण होण्यावर परवाना बंधन घालू शकणार नाही. तथापि उपरोल्लेखित अनिवार्य स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा लेखकांचे श्रेय सुनिश्चित करण्यासाठी काही बंधने मात्र लागू राहतील. (खाली पाहा) परवानगी असलेले निर्बंध कामाच्या प्रतिंच्या वितरणावर अथवा उपयोगावर असलेली सर्व बंधने काही अनिवार्य स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. खास करून प्रताधिकारांचे श्रेय देणे[श 22], परस्परावलंबी सहकार्य[श 23] करणे (उदाहरणार्थ "प्रतसोड(कॉपीलेफ्ट)[श 24]") आणि अनिवार्य स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, यासाठी काही बंधने ही परवानगीयोग्य बंधने म्हणून स्वीकारली गेली आहेत. मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या ‘काम’ (प्रताधिकार) मुक्त म्हणून स्वीकारता यावे, यासाठी (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम मुक्त सांस्कृतिक परवाना अंतर्गत समाविष्ट असावे किंवा त्याचा कायदेशीर दर्जा हा वर स्पष्ट केल्यानुसारची नेमकी तीच अनिवार्य स्वातंत्र्ये बहाल करणारा असावा. अर्थात ही काही पुरेशी अट नाही. एखादे विशिष्ट काम क्वचित अमुक्तही असू शकेल की जे वेगळ्या अर्थाने अनिवार्य स्वातंत्र्यांवर बंधने टाकूही शकेल. (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम मुक्त म्हणून स्वीकारण्यासाठी या काही अधिकच्या अटी आहेत (एवढेच): स्रोत-विदेची[श 25] उपलब्धता: जेथे अंतिम स्वरूपाचे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम प्राप्त माहितीचे एकत्रीकरण करणे किंवा स्रोत फाईल[श 26] किंवा अनेक स्रोत फाईल्स यांच्यावर (संपादकीय) प्रकिया करून मिळविले असल्यास, त्या कामाच्या मूळाशी असलेल्या स्रोत-विदा तशा कामा सोबत सारख्याच अटीं अतर्गत उपलब्ध असली पाहीजे. एखादी सांगीतिक रचना, थ्री डी दृश्यात वापरल्या गेलेल्या प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकाशनातील माहिती, संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत[श 27] किंवा अशी कोणतीही माहिती ही मूलस्रोताताबरोबरच उपलब्ध असली पाहिजे. मुक्त प्रारुप-साच्यांचा उपयोग: डिजिटल फायलींसाठी उपयोगीले गेलेले प्रारुप-साचे[श 28];(पेटंटचा उपयोग प्रयुक्त झाला असेल तर अशा पेटंट आरक्षित तंत्रज्ञानास जगभरात अमर्याद आणि बिनापरतीच्या मानधन देण्यातून मुक्त केले असल्याच्या बोलीवर नसल्यास,) पेटंटने आरक्षित केलेले नसावेत. व्यावहारीक कारणांसाठी काहीवेळा अमुक्त प्रारुप-साचे वापरावे लागल्यास, काम मुक्त स्वरुपाचे समजले जाण्यासाठी, मुक्त प्रारुप-साचातील एक प्रत उपलब्ध असणे अत्यावश्यक असेल. तांत्रिक बंधने नको: (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम अशा स्थितीत उपलब्ध असावे की, ज्यात वर उल्लेख केलेली स्वातंत्र्ये मर्यादित करणारी कोणतीही तंत्रज्ञानात्मक क्लृप्ती वापरलेली नसावीत. इतर बंधने अथवा मर्यादा नसाव्यात: (येथे सुचवलेल्या प्रमाणे) काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले (जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल. (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम, प्रताधिकारास अस्तित्वात असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) त्या प्रताधिकारास निःसंदिग्धपणे मुक्त करणाऱ्या काही हिश्यामुळे संपूर्ण काम मुक्त करीत असेल; तर त्यांचा वापर करून घेऊ शकेल.[प 4] वेगळ्या शब्दात, कामाचा वापरकर्ता (पुरुष किंवा स्त्री अथवा अन्य कुणी माणूस) त्याचा किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही, तेंव्हा असे काम “मुक्त” म्हणून स्वीकारले जाऊ शकणार नाही किंवा “मुक्त” म्हणता येणार नाही.[प 5] अधिक वाचन पाहा Licenses (एकएकट्या परवान्यांबद्दल चर्चा आणि ते विशीष्ट परवाने या व्याख्येच्या कसोटीस उतरतात अथवा नाही. पाहा History (या व्याख्येची पार्श्वभूमी आणि acknowledgments-मराठी शब्द सुचवा- जाणून घेण्यासाठी). पाहा FAQ (नित्याच्या निवडक प्रश्नोत्तरांसाठी). पाहा Portal:Index (मुक्त सांस्कृतिक कामा बद्दल विशीष्ट विषयवार पानांसाठी). आवृत्ती सदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्ती प्रकाशित केल्या जातील." ***दस्तएवज समाप्त*** * मूळ इंग्रजी दस्तएवज या दुव्यावर आहे त्यानुसार वरील अनुवाद तपासून सुधारणा सुचवून हवा आहे. * हा दस्तएवज अनुवादानंतर त्याच संस्थळावर http://freedomdefined.org/Definition/Mr या दुव्यावर आणि मराठी विकिपीडिया तसेच इतरत्र संदर्भासाठी वापरावयाचा आहे. त्यामुळे या लेखास आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. * या अनुवादाची आवश्यकता काय आहे ? विकिमिडीया फाऊंडेशनच्या इंग्रजी विकिपिडीया असो अथवा मराठी विकिपीडिया असो, किंवा इतर प्रकल्प असोत, प्रकल्पातील लेखन छायाचित्रे इत्यादी ज्या परवान्यांन्वये काम मुक्त घोषीत करावयाचे ते परवाने freedomdefined.org ने नमुद केलेल्या खालील दस्तएवजास अनुसरून असणे अभिप्रेत असते. इतर (FAQ) इतर वेळीही तुम्हाला तुमचा मजकुर 'अधिकतम मुक्त स्वरुपात' प्रकाशित करावयाचा असेल तर अशी मुक्तता किमान विशीष्ट स्तराची होते आहे का याची काळजी घेण्यास हा दस्तएवज कदाचित अंशतः मार्गदर्शक शकावा. *उत्तरदायकत्वास नकार लागू प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
भाषांतर
मुक्त सांस्कृतिक काम

प्रतिक्रिया द्या
4101 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
माहितगार Fri, 09/25/2015 - 05:59 नवीन
मंडळी, उपरोक्त दस्तएवजाच्या अनुवादात एका मिपाकर-विकिमित्रांचे साहाय्य लाभले आहे. अर्थात इतरांनीही अनुवादात सहभाग घेतल्यास विकिपीडियावर काम करणार्‍या व्यक्तींचा वेळ वाचून तोच वेळ विकिपीडियावरील इतर लेखांवर वापरला जाऊ शकेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 11/02/2015 - 08:02 नवीन
अनुवाद तपासून सुधारणा सुचवण्यात साहाय्य हवे आहे म्हणून धागा वर काढत आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 11/04/2015 - 14:45 नवीन
*It also describes certain permissible restrictions that respect or protect these essential freedoms. या वाक्याचा सध्याचा अनुवाद: या अत्यावश्यक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना दाखविण्याची परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो. * कुणी अजून काही सुधारणा अथवा पर्यायी अनुवाद सुचवू शकेल ?
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 11/06/2015 - 04:49 नवीन
या अत्यावश्यक मोकळिकीला वाचवण्यासाठी किंवा तिला आदर दाखवण्यासाठी म्हणून जी बंधने घालणे शक्य आहे, त्यांचे वर्णनही हा लेख करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Wed, 11/04/2015 - 16:03 नवीन
*The definition distinguishes between free works, and free licenses which can be used to legally protect the status of a free work. उपरोक्त वाक्यात 'which' शब्द नेमका कशाचे वर्णन करतो केवळ free licenses चे की free works, and free licenses चे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 11/06/2015 - 04:56 नवीन
माझ्या मते The definition हा वाक्याचा कर्ता असल्याने 'which' त्याच्यासाठी वापरले जात आहे. (स्वैर अनुवाद) या व्याख्येमुळे फ्री वर्क व फ्री लायसंस यातला फरक स्पष्ट होऊन फ्री वर्कचे संरक्षण करणे शक्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
असंका Fri, 11/06/2015 - 05:01 नवीन
अच्छा, असा पण अर्थ शक्य आहे म्हणून प्रश्न विचारला होता होय! श्या! माझ्या लक्षातच नै आलं.. तुमचं म्हणणं जास्ती बरोबर वाटतंय खरं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
स्रुजा Fri, 11/06/2015 - 05:05 नवीन
+१ , व्याख्येसाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
म
माहितगार Sat, 11/07/2015 - 16:35 नवीन
श्रीरंग आणि अकौंटंट प्रतिसादांसाठी धन्यवाद. शाळेत असताना इंग्रजी व्याकरण बरं होत त्याला विसर पडल्याला बरीच वर्ष झाली, झाल एवढच की अनुवाद पडताळणी करताना, मी स्वतः सॉलीड कन्फ्यूज झालो. आपले दोघांचेही प्रतिसाद वाचून शेवटी Erik Möller नावाच्या दस्ताएवजाच्या मूळ लेखकास संपर्क केला आणि त्यानेही तातडीने उत्तर दिले. whichसाठी त्यांना अपेक्षीत अर्थ 'फ्री लायसंस' एवढाच असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. इंग्रजी ही त्यांची सुद्धा मातृभाषा नसल्यामुळे कदाचित स्थिती साशंकीत होते आहे हे त्यांनाही लक्षात आले नसावे. असो. या धागा लेखातील व्याख्येत, परवान्यांच्या माध्यमातून अधिकारांचे स्थांनातर होऊन 'सांस्कृतिक काम' मुक्त होते. त्यामुळे मुक्त आणि स्वातंत्र्य शब्दात मुक्ततेचा अथवा स्वातंत्र्याचा अधिकार ही अर्थछटा गृहीत असावी असे वाटते.( किंवा माझे सध्याचे तसे परसेप्श्न असावे) केवळ मोकळे किंवा खुले हे शब्द चांगले आहेत, -मोकळिक शब्द वाचताना वाचक म्हणून मोकळे वाटते हे खरेच- अकौंटंट यांच्या प्रतिसादा नंतर दोन ठिकाणी मोकळे शब्द वापरला स्वांतंत्र्य शब्दाच्याही काही उपयोगात वापरता येईल असे वाटते. अशाच इतर शब्दांबाबतही सूचना असल्यास अवश्य कळवाव्यात. आपणा सर्वांना प्रतिसादांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
असंका Fri, 11/06/2015 - 04:56 नवीन
कोडी घालताय का? ;-) विच हा शब्द फ्री लायसेन्सेस चे वर्णन करतोय. कसले फ्री लायसन्सेस- तर असे 'फ्री लायसन्सेस' की जे 'फ्री वर्क' चे कायदेशीर स्थान सुरक्षित ठेवतात. अ‍ॅण्ड नंतर येणारे सगळे शब्द मिळून एकच कल्पना आहे. "फ्री लायसेन्सेस विच कॅन बी युज्ड टु लिगली प्रोटेक्ट द स्टेटस ऑफ अ फ्री वर्क".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 11/07/2015 - 16:39 नवीन
सध्या वापरलेले काही शब्द खालील प्रमाणे आहेत धागालेखाची अचूकता कायम ठेऊन आकलन सुलभता वाढवण्याच्या दृष्टीने उपयूक्त सूचना कराव्यात ही विनंती English:applied → मराठी:उपयोजन English:"Free Cultural Works" → मराठी:'मुक्त सांस्कृतीक काम' free license→ मुक्त उपयोगाचा परवाना English:"creative ways" → मराठी:'सर्जक निर्मिती' "derived Work" → 'निष्पादित काम',बेतलेले, मिळवलेले, व्युत्पन्न, साधीत works of authorship should be free → (कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे English:"Free Cultural Works" → मराठी:'मुक्त सांस्कृतीक काम' English:"Free content" → मराठी:'मुक्त मजकुर' English:identification → मराठी:तादात्मीकरण/ओळख/परिचय English:convey → मराठी:संप्रेषित/व्यक्त English:"Free content" → मराठी:'मुक्त मजकुर' English:"Open Access" → मराठी:'खुली उपलब्धता' performing → सादर interpreting → अर्थनिर्णयन to examine → चिकित्सा licensee → परवानाधारक reverse engineering → व्युत्क्रम अभियांत्रिकी collection → साठा,संग्रह,संचय swapped → देवाणघेवाण copy → प्रतिमुद्रित attribution → श्रेय देणे, लेखकाचा संदर्भ नमुदकरणे symmetric collaboration → परस्परावलंबी सहकार्य copyleft → प्रतसोड(कॉपीलेफ्ट) source data→स्रोत-विदा source-file→स्रोत-संचिका source code of a computer application→संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत format→प्रारुप-साचा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा