Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबई-पुणे-मुंबई-१

व
वाचन प्रेमी
गुरुवार, 07/02/2015 - 07:15
💬 64
सर्व मिसळपाव रसिकांना नमस्कार ! प्रथमता मी स्वताची ओळख करून देतो. मी मुंबईचा पण नेहमी प्रमाणे मुंबईकर हे आता मुंबईच्या बाहेर राहू शकतात (ठाणे आणि त्या पुढे ). असाच ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बेत ठरला. बरेच महिने कुठे बाहेर जाण्याचा योग आला नव्हता. बायकोला फोन करून सांगितला आपण शनिवार रविवार पुण्याला जातोय, थोडी आश्चर्य चकितच झाली की अचानक काय मनात आल? बायकोची चुलत बहीण राहते पुण्यातल्या नवी पेठेत म्हटलं त्यांना पण भेटता येइल. नेहमी प्रमाणे माझ्या ऑफिसच्या बॅचमेट्सना whatsapp वर message केला,"शनिवार-रविवार पुणे" कुणी येणार का? २-३ मित्र मैत्रिणी म्हणाले चालेल पण प्लान काय आहे? त्यांना म्हटलं आम्ही मी आणि बायको शनिवारी सकाळी निघतोय,तुम्ही ऑफिस नंतर वाशी वरून बस पकडा किंवा श्रीकांत ची कार आहे. ऐनवेळी गडबड झाली श्रीकांत ने गाडी service centre ला दिलेली आणि बरंच काम निघाल. शेवटी शुक्रवारी सगळे म्हणाले बस ने जाऊयात पण कुणालाच माहित नव्हते कोण कोण येणार आहे? शनिवारी सकाळी ठरल्या प्रमाणे मी आणि माझी बायको पुण्यासाठी निघालो.पनवेल डेपो मधून आपला सरकारी लाल डब्बा मिळाला अर्थात ST महामंडळ पकडली. शिवाजीनगरला उतरा अस मेहुणीने सांगितलेलं. सकाळी १० च्या आसपास आम्ही शिवाजीनगर ला पोहोचलो. बायकोच अधून मधून येणं जाणं होतं पुण्यात; ती म्हणाली मला माहीत आहे कस जायचं. रिक्षावाल्यांना विचारल 'नवी पेठेत जायला किती घेणार?' एक जण म्हणाला '९० रुपये'. आमच्या पत्नी साहेब म्हणाल्या 'आम्हाला नाही जायचं खूपच पैसे सांगता'. थोडं बाहेर गेल्यावर एक जण म्हणाला, '६० रुपये'. बायको थोडी गोंधळली काय कराव तेवढ्यात हुशार रिक्षावाला म्हणाला 'ताई मीटर ने चला!' मुंबईत मीटरने जायची सवय. बायको खुश झाली, मला रस्ते दाखवू लागली. तेवढ्यात तिला मी म्हटलं 'अजून किती लांब आहे?' ती म्हणाली अजून ५-१० मिनिट, तिला मीटर दाखवला मग तिथे आधीच ५५ रु झालेले. तिने ड्रायवर ला विचारलं, 'मीटर एवढं कसं झालं?' शेवटी मी म्हटलं आता जाऊ देत. शेवटी नवी पेठेत पोहोचलो आणि ७० रु झाले. स्वतःवरच हसू येत होतं. सासरे खालीच भेटले, ते म्हणाले ४० रु जास्त होतात. मी म्हटलं जाऊ त्यात आता पुढच्या वेळी लक्ष ठेवू. गम्मत म्हणजे आम्ही दोघे बस मध्ये असताना GPS ने किती अंतर राहील ते पडताळत होतो पण बसमधून उतरल्यावर नवी पेठ किती दूर आहे हे आम्ही पाहीलच नाही ! मेहुणीच्या कुटुंबाशी ओळख वैगरे झाली गप्पा मारल्या. मेहुणी मार्केट मध्ये निघालेली तिने म्हटलं चला फिरून येऊ. चालत मग आम्ही श्रीमंत दगडू शेठ गणपती आणि बाकी सगळ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. तुळशीबागेत पण जाण्याचा योग आला, तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातच पाहिलेली, मुक्ता बर्वे ला दुकानदाराशी भांडताना. तिकडे गेल्यावर मनातल्या मनात विचार आला कि बायकोला खरेदी करायचं मनात नको यायला.थोडा स्वार्थी विचार होता पण मला वाटत प्रत्येक नवऱ्याला असा विचार येतच असणार. मेहुनीने खूपच ट्रेकींग करून घेतली( चालत-चालत पुणे दर्शन), शेवटी परत जाताना पाउस आला म्हणून रिक्षा पडकली आणि घरी आलो. मस्त श्रीखंडाच जेवण झालं. बायको सारखी विचारात होती आपला plan काय आहे आज दिवसभर आणि उद्या आपण काय करणार आहोत. मी म्हटलं मलाच माहित नाही. मित्रच group discussion चालू होत whatsapp वर कोण कोण येतंय कुठून निघणार. श्रीकांत सगळ्यांना जमा करून घेऊन येणार होता पण कोण कोण येणार ते माहित नव्हत. ३च्या आसपास श्रीकांत ला फोन केला त्याने उत्तर नाही दिल, मग सारिका माझी batchmet तिला फोन केला तिने उचलला आणि म्हणाली आम्ही गाडी मध्ये आहोत, श्रीकांत, सारिका आणि विषया. अखेर श्वासात श्वास आला आणि वाटल आता काहीतरी प्लान होणार. ते पोहोचू पर्यंत आम्ही तिघे मूवी ला निघालो 'जुरासिक world ३d' मंगला theater मध्ये तिकीट online मिळत होतं, मग तिकडे निघालो. चित्रपट अप्रतिम होता. मध्ये मध्ये बायको आणि मेहुणी घाबरलेले, पण चित्रपट आवडला त्यांना. चित्रपट संपला आणि आम्ही ५ च्या आसपास रिक्षा पकडून घरी जाण्यासाठी निघालो. श्रीकांत ला फोन केला पुन्हा रिसीव नाही केला, सारिका ला केल्यावर कळाल कि ते वाकड ला पोहोचले आणि कर्वे नगर ला श्रीकांत ची मैत्रीण राहते तिकडे श्रीकांत ने विषय आणि सारिका च्या राहण्याची सोय केली आहे. आणि श्रीकांत त्याच्या मित्राच्या रूमवर राहणार होता. नवी पेठेत पोहोचताच मेहुनीची प्लेजर होती ती घेतली आणि आम्ही निघालो कर्वे नगरला. वाटेत कळाल सगळी मंडळी cummins college जवळ भेटणार आहेत. आम्ही google maps वर navigation चालू ठेवून कर्वे नगर ला पोहोचलो. सगळी मंडळी भेटली आणि गप्पा रंगल्या, श्रीकांत ची मैत्रीण येणार होती जिच्या कडे सारिका आणि विषया राहणार होत्या. Rudra हॉटेल समोर पराठा आणि sandwich restaurants होते तिथेच बसलो. कॉलेजला येणारे मुले मुली पण मोठ्या संखेने तेथील पदार्थ चाखत होते. कुणी पराठे, कुणी sandwich order केली आणि गप्पा रंगल्या तेवढ्यात श्रीकांत ची मैत्रीण आली. तिला पण सगळ्यांनी काहीतरी ओर्डर करायला सांगितलं तिने कॉल्ड कॉफ्फी ऑर्डर केली. गप्पांचा मुद्दा एकच आजचा आणि उद्याचा बेत काय. रात्री hangout आणि रविवारी सिंहगड आणि लवासा ला जायचा प्लान झाला. ६ सीटर XYLO बुक केली. पराठे आलेले पहिले तर बघतो तर नेहमी restaurant मध्ये जेवढ्या आकाराचा पराठा असतो त्या पेक्षा दुप्पट आकाराचा तो पराठा होता पूर्ण संपवण्या साठी खूप मेहनत घ्यावी लागली. क्रमशः

प्रतिक्रिया द्या
11647 वाचन

💬 प्रतिसाद (64)
उ
उगा काहितरीच गुरुवार, 07/02/2015 - 07:23 नवीन
अच्च जालं होय.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/02/2015 - 07:46 नवीन
डेंजरच लिहिताय कि राव! बाकी पुणे आलाय म्हणजे अर्धशतक तरी होऊ शकेल! त्यात पण पुण्यातल्या रिक्षावाल्यांकडून फसवणूक?! कमिन्स कोलेजच्या "आजूबाजूचे" फोटो तरी टाकायला पाहिजे होते! :) क्रमशः लिहायचं राहिलंय का?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 07/02/2015 - 08:35 नवीन
"आजूबाजूच्यां" च्या लक्षात आलं असतं हे फोटो घेतायत म्हणजे मग? कमिन्स कॉलेज-शाश्वत हॉस्पिटल-मुंबई असा नवीन लेख लिहायला लागला असता ना त्यांना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/02/2015 - 08:43 नवीन
अहो मग मिपावर "पुणे सफरीने झालो सफर" असा एखादा थरारक लेख तरी आला असता ना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 07/02/2015 - 08:56 नवीन
आता पुढच्या लेखांची कल्पना मी करू शकतो: - सिंहगडावर स्वारी - मेहुनीची प्लेजर पार्ट २ - लवासा चे रहस्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
क
कपिलमुनी गुरुवार, 07/02/2015 - 09:04 नवीन
हहपुवा ! मराठी भाषा लै वंगाळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
वेल्लाभट गुरुवार, 07/02/2015 - 09:05 नवीन
लौल ! ! ! ! ! ! !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 07/02/2015 - 09:32 नवीन
जोरदार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 07:57 नवीन
पहिल्यांदा लिहतोय आणि पहिल्यांदाच पुणे ट्रीप काही चुका असतील तर सांगा. फोटो टाकायचा प्रयत्न केला पण जमले नाही. attach कसा करयाचा सांगू शकाल ?
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/02/2015 - 08:02 नवीन
फोटो टाकण्यासाठी माहिती येथे मिळेल. तसेच मिपाच्या उजव्या कोपर्यात साहित्य संपादकांची माहिती देखील मिळेल, तेही तुम्हाला मदत करू शकतील. लेखनासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 08:06 नवीन
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 07/02/2015 - 08:11 नवीन
मुपि-मुपि म्हणतात ते हेच्च कै? ;)
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 08:20 नवीन
नक्की कशा बद्दल म्हणत आहात कळाल नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/02/2015 - 08:35 नवीन
पूर्वीच मुपी राहील नाही आता! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड गुरुवार, 07/02/2015 - 08:24 नवीन
काय भयंकर अनुभव तो. माझी वाचतानाच दातखिळ बसली. तुमचं काय झालं असेल! हरहर. कुणावरही येवू नसेल असा प्रसंग. ता.क. सकाळ मुक्तपीठ ला लेख टाकावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 08:51 नवीन
अति भयंकरच समजा !हाहा लहान मुलांची चेष्टा करू नये सर ! lol
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुनील गुरुवार, 07/02/2015 - 08:31 नवीन
१० पैकी ५ मार्क्स. सुवाच्य अक्षरासाठी अर्धा मार्क जादा! - सुनील सर वर्गशिक्षक, ७ वी फ
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 08:49 नवीन
सर असच काही समजा ! शाळेनंतर आता लिहतोय हे तर होणारच होत ! लिह्लाच नाही तर विकास होणार कसा ? मार्गदर्शन केलेलं आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
काळा पहाड गुरुवार, 07/02/2015 - 08:51 नवीन
विकास सर, काय हे !! सांगा जरा त्यांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
स
स्पा गुरुवार, 07/02/2015 - 08:35 नवीन
ऑ, अच्च बोल्ले, वाचन पेमी बाबुला शग्गे, वा कलु हा आपन श्ग्यांना
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 07/02/2015 - 09:15 नवीन
ठीक आहे. काही प्रतिसादांनी लगेच बिचकू नका. तुम्ही इथे जरा रुळलात की तुम्हीपण असा दंगा कराल. लेखन हे नुसते रनिंग कॉमेंट्री वाटायला नको. त्यानुसार लेख लिहून झाल्यावर त्यातले हायलाइट्स परत एकदा वाचून ते जास्त रंगवा, आणि जे किरकोळ, अनावश्यक वाटेल ते वगळा. या तंत्राने तुम्हांला थोडे मुद्देसूद, विस्कळीत नसलेले लेखन करण्याचे अवगत होईल. नंतरच्या टप्प्यात वाचकांची अभिरूची आणि तुमची अभिव्यक्ती यांची सांगड घालायला जमू लागेल. पुढील लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 10:07 नवीन
सल्ला आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करेन ! आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अजया गुरुवार, 07/02/2015 - 09:16 नवीन
उत्साहाने लिहिताय!लिहीत रहा.हे वरचं थोडंसं रॅगिंग समजा!त्यात तुम्ही स्फोटक विषयाला हात घातलाय;) पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 10:03 नवीन
रैगिंग होत आहे ते तर कळालच ! पण वाचकांचे प्रतिसाद मिळाले तरच सुधारणा होईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 07/02/2015 - 09:36 नवीन
तुळशीबागेत पण जाण्याचा योग आला आणि तुम्ही जाऊनही आलात? नमस्कार असो :D बाकी, बाजूच्या चितळ्यांच्या बाकरवड्या घेतल्यात की नाही?
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 09:53 नवीन
चितळेंची भाकरवडी पुण्यावरून निघताना घेतली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 07/02/2015 - 10:00 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
प
प्यारे१ गुरुवार, 07/02/2015 - 10:40 नवीन
भाकर नाही ओ बाकरवडी. ब बडव्यां मधला ब! -वाचनप्रेमींचा लिखाणप्रेमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 11:02 नवीन
भावनांना समझा साहेब ! तुम्ही पुणेकर दिसताय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/02/2015 - 11:15 नवीन
नाही हो ते ठाणेकर आहेत. आणि बाकरवडी चितळ्यांचीच का घेतलीत ? संदर्भासहित स्पष्टीकरण द्या बघु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 11:26 नवीन
गोष्टी बायको म्हणेल म्ह्नुन्न घ्याव्या लागतात ! याच संदर्भासहित स्पष्टीकरण जमेल अस वाटत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्यारे१ गुरुवार, 07/02/2015 - 12:12 नवीन
मी ठाणेकर नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्यारे१ गुरुवार, 07/02/2015 - 12:10 नवीन
समझा नाही समजा. ज ज जाऊ दे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
य
यसवायजी गुरुवार, 07/02/2015 - 09:38 नवीन
श्रीखंड कसं किलो म्हणे?
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 10:00 नवीन
दुर्दैवाने श्रीखंड मी नव्हत आणल ! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 07/02/2015 - 10:09 नवीन
श्रीखंड कसं किलो म्हणे? >> श्रीखंड कसं काय किलो म्हण्णार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सूड गुरुवार, 07/02/2015 - 11:14 नवीन
तसं विचारायची पद्धत असते (पुण्यात)!! उदा: काय झालं म्हणे?/कुठेशिक आहे म्हणे? इत्यादि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
क
कंजूस गुरुवार, 07/02/2015 - 09:53 नवीन
वाचकांनीही आपले पहिले वहिले अनुभव ( पुणे ,ठिकाणे,वगैरे हो) इथेच लिहायचे /लिहिले तरी चालतील का इतर वाचकप्रेमींना/दृष्यप्रेमींना ? बाकी पजेरो एकदम सुसाट बरं का.
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 09:58 नवीन
प्रतिक्रिये प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कल्पना चांगली आहे ! पुण्याबद्दल अजून माहीती मिळेल ! आणि पहिला अनुभव नाही पण पुणे पहिल्यांदा होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 07/02/2015 - 10:01 नवीन
नशीब … पुणे … ठिकाणे वगैरे लिहिले :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/02/2015 - 10:23 नवीन
आजारी वरणात पडला प्लेन पापडिचा चुरा आजारी वरणात पडला प्लेन पापडिचा चुरा याच्यापेक्षा साधा तूप मिठ भात बरा! ;-) °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° आता तो हा येइल हं हे घेऊन! :P
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 07/02/2015 - 10:32 नवीन
प्रा. बारटक्के?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/02/2015 - 11:13 नवीन
मुंबईकर हे आता मुंबईच्या बाहेर राहू शकतात (ठाणे आणि त्या पुढे ). स्वतःला मुंबैकर समजणार्‍या बर्‍याच जणांची विकेट गेली. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/02/2015 - 11:19 नवीन
ओ मृत्युन्जय साहेब ज्यांची जायची आहेत त्यांची विकेट जावु दे आम्ही ठाणेकर समजतो. काय टक्क्या बरोब्र नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ख
खेडूत गुरुवार, 07/02/2015 - 11:41 नवीन
तुळशीबाग मी फक्त मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातच पाहिलेली, मुक्ता बर्वे ला दुकानदाराशी भांडताना.
मुक्ताने भाव केला - ती भांडली असं आठवत नाही!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 07/02/2015 - 12:20 नवीन
ते (तथाकथित) मुंबैकर असल्याने त्यांना ते भांडण वाटलं. ता.क. भांडण काय असतं हे शिकण्यासाठी पुण्यात* येवून शिकवणी लावावी ही सूचना करतो. *= हे कुठं सुरू होतं आणि कुठे संपतं हे कळण्यासाठी** वेगळी शिकवणी ठेवावी लागेल ही उपसूचना. **=कळलं तरी वळतंच असं नाही. कुठल्या बोळातून कुठे गाडी*** वळवली असता कुठला सिग्नल टाळता येईल यासाठी तिसरी शिकवणी ठेवा. ***= याची व्याख्या एम-८० ते डुकाटी आणि मारूती-८०० ते रोडरोलर अशी बृहद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
च
चिनार गुरुवार, 07/02/2015 - 12:18 नवीन
मुंबई वरून पुण्याला आले त्याचं एवढं कौतुक !!!! मुंबईकर तर अश्या गोष्टी फाट्यावर मारतात असं टक्या सांगतो.. असो..लिहित राहा..
  • Log in or register to post comments
व
वाचन प्रेमी गुरुवार, 07/02/2015 - 12:28 नवीन
जवळच्या गोष्टीच राहतात पहायच्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ख
खेडूत गुरुवार, 07/02/2015 - 12:54 नवीन
सहमत ! यावरून आपल्याकडे दूरदृष्टी आहे असे स्पष्ट होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचन प्रेमी
आ
आदिजोशी गुरुवार, 07/02/2015 - 15:03 नवीन
असं टक्या सांगतो.. टक्या मुंबईकर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा