Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असं काहीतरी...

र — रातराणी, गुरुवार, 07/02/2015 - 10:10
अवघडच आहे हे वळण, चालवतही नाही आणि थांबवतही नाही.. झालंय असं काहीतरी. वेळ काढणंच चालू आहे सध्या, शेवटचाच आहे हा प्रवास नाहीतरी. कणाकणाने मी झालीच आहे जीर्ण, टाकवतही नाही आणि ठेववतही नाही.. झालंय असं काहीतरी. मोडलंस एकदाच तर बरं होईल, तुझी मुळं आता पसरलीत नाहीतरी. तू यावस म्हणून रेंगाळलेय दारात, बंद करवतही नाही आणि उघडतही नाही.. झालंय असं काहीतरी. तोही सोपस्कार करून जा, मनाची दारं बंदच आहेत नाहीतरी. स्वप्नांचे डाव माझ्या रचलेस खरे, खेळवतही नाही आणि मोडवतही नाही.. झालंय असं काहीतरी. जा,कर विजयाचा जल्लोष, हार मानलीच आहे मी नाहीतरी. आयुष्याच्या संध्याकाळी मात्र, आठवतही नाही आणि विसरतही नाही.. होईल असं काहीतरी. डोळे मिटून फक्त एकदा मार हाक, तुझ्याच अंतरात असेन मी नाहीतरी.

प्रतिक्रिया द्या
2233 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/02/2015 - 10:17 नवीन
ज्जे ब्बात !!
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 07/02/2015 - 10:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/02/2015 - 11:28 नवीन
क्लास ! वेगळी आहे. सुरेख!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 07/02/2015 - 12:22 नवीन
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र, आठवतही नाही आणि विसरतही नाही.. होईल असं काहीतरी. डोळे मिटून फक्त एकदा मार हाक, तुझ्याच अंतरात असेन मी नाहीतरी. मस्तच
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/02/2015 - 13:18 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sun, 07/05/2015 - 05:14 नवीन
कविता खूप वेगळी आहे. पण मस्त आहे. झालंय असं काहितरी या ओळीवर जो ब्रेक येतो तो मस्तच वाटतो.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 07/05/2015 - 06:18 नवीन
वेगळी आणि मस्त कविता, आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 07/05/2015 - 07:25 नवीन
फारच सुरेख आणि प्रामाणीक पणे लिहीलेली कविता. अतिशय भावली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 07/06/2015 - 12:26 नवीन
वेगळी आहे. आवडली. पु. ले. शु.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/06/2015 - 21:20 नवीन
धन्यवाद! __/\__ :)
  • Log in or register to post comments
P
palambar Tue, 07/07/2015 - 20:20 नवीन
ट्चिन्ग !
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 07/08/2015 - 07:42 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा