शनिवार वाड्याला जातोय..तरी काही माहिती हवी आहे
(प्रेरणा http://www.misalpav.com/node/31872)
ह्या जुलै मध्ये मित्र-मैत्रिणी सोबत शनिवार वाड्याला जातोय. ६ मुलं आणि एक २.५ वर्ष (मानसिक वय) मुल सोबत आहे. आमचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. तरी काही माहिती हवी आहे आणि ती मिळेल ह्याची खात्री आहे. आम्ही कसबा पेठ मध्ये दत्त लॉज मध्ये राहणार आहोत. आमच्या ६ तासाच्या ट्रीप मध्ये पहिले ३ तास sightseeing (चालते फिरते प्रेक्षणीय स्थळे) आहेत आणि बाकी चे ३ तास मोकळे जे आम्ही आमच्या सोयीनुसार घालवायचे. ह्या ट्रीप संधर्भात काही प्रश्न आहेत, जसे:
१. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? कुठल्याही हॉटेलचा कुठलाही प्लान घेतला नाही. म्हणुन दुपारच्या जेवणाची सोय बाहेरच करावी लागणार .
२. घरुनच सुटे पैसे न्यावेत ? कि तिथेच बदलावे? कोणत्या नोटात बदलावे? १०-१० , कि ५०-५० ? साधारण किती १-१,५-५ असे सुटे जवळ ठेवावे?
३. बर्याच फोरम्स मधेय वाचतेय कि "शनिवार वाड्याला पिण्याच्या पाण्याचे आबाळ आहे. म्हणजे हॉटेलात जसे आपल्या इथे सर्रास आणि मुबलक पाणी असते तसे तिथे मिळत नहि."
४. शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.?
५. ह्या activities चे साधारण काही packages असतात का? आणि ते कुठून बुक करू शकतो?
६. शनिवार वाड्याच्या बाहेर खरेदी करण्या जोगे असे काही आहे का?
७. साधारण या पुणे दौर्याला काय काय सोबत घ्यावे ?
मी इथे विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त अजून काही अवांतर माहिती मिळाल्यास उत्तम.
💬 प्रतिसाद
(76)
क
काळा पहाड
गुरुवार, 07/02/2015 - 12:35
नवीन
किती करायच्यात? १००?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/02/2015 - 13:23
नवीन
हाहाहाहाहा!
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 07/02/2015 - 14:28
नवीन
दिली सुपारी .
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 07/02/2015 - 13:02
नवीन
उगा काहितरीच
- Log in or register to post comments
न
नन्दादीप
गुरुवार, 07/02/2015 - 13:10
नवीन
काsss हीssss हीssss हा काहीतरीच...तुमच आपल उगा काहीतरीच ब्वा...
- Log in or register to post comments
क
कर्ण-२
गुरुवार, 07/02/2015 - 13:12
नवीन
पहिला पेश्वेचा माहित पाहिजे (खास करून नारायणराव पेशवे चा ), जास्त खर्च येत नाही असं समजा आठवडी बाजार ला चालला आहे. ६ तास कमीच पडतील पुणे फिरण्यासाठी. प्रवास PMT बस मधूनच करा (बघा कशा बसेस हाकतात), खरेदी करायची आहे तर जयहिंद किंवा मेन्स avenue जा चांगले branded कपडे स्वस्तात भेटतात, july मध्ये discount सुद्धा असतात. पुस्तके ABC चौक मध्ये खरेदी करू शकता (शालेय सुद्धा ) तेही discount मध्ये. खाण्यासाठी शनिवार वाड्याच्या पुढे corporation आहे न तेथे 'भारती वडेवाले' आहेत, एक नंबर वडापाव , त्याच्या बाजूला एक दाबेली वाला सुद्धा आहे तेही खूप छान आहे. तहान लागली तर हॉटेलात चहा प्या म्हणजे पाणी free मिळेल . कात्रज चा पार्क बघायला विसरू नका. वेळ मिळाला तर सिंहगड ला सुद्धा जा.
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
गुरुवार, 07/02/2015 - 15:13
नवीन
पुण्यात कपडे अथवा वस्तु भेटत नाहीत हो, मिळतात. लोक भेटतात. हां आता कसे लोक भेटतात हे ज्याचे त्याने अनुभवायला हवे. ;)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 07/02/2015 - 16:27
नवीन
एम एच ३०/एम एच ३१
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
गुरुवार, 07/02/2015 - 21:02
नवीन
?? कळले नाही.
मी यापैकी कुठल्या गावातली असे विचारत असाल तर उत्तर नाही.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 07/02/2015 - 21:40
नवीन
नै हो.
"भेटलं" बोलणारे नॉर्मली एम एच ३० किंवा ३१ चे असतात.
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
गुरुवार, 07/02/2015 - 22:02
नवीन
हां ते होय. फक्त एम एच ३० किंवा ३१ वाले नाही, इतरही बर्याच ठिकाणी ;)
- Log in or register to post comments
उ
उदय के'सागर
Fri, 07/03/2015 - 09:40
नवीन
एम.एच-१५ मधील काही भागातले लोकही असेच बोलतात (बहुत करून खानदेशी). 'जॉब भेटला का रे?' 'भाड्याचं घर भेटलं का' आणि काय काय... कम्माल्ल गम्मत!!!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/03/2015 - 11:32
नवीन
पवन मावळामध्ये पण बस भेटते , लोकल भेटते .
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Fri, 07/03/2015 - 06:46
नवीन
एम एच १६ आणी एम एच १७ (नगर) पण आहेत.
मराठवाडा, खानदेश (आमच्या आत्ताच्या प्रोजेक्ट मधे ३ जण आहेत) आणी कोकणातल्या मित्रांना पण असंच बोलतांना ऐकलंय. हा शब्द इतका सर्रास वापरला जातो की त्यात काही चूक आहे हे तुम्हाला जसं वाटतं तसं त्या लोकांना अजिबात वाटणार नाही.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 07/03/2015 - 07:33
नवीन
त्यांना पुढे - समोर, कापने - चिरणे, पाहुणे - नातेवाईक व सगळ्यात महत्त्वाचे पुने - पुणे हा पण फरक स्पष्ट करून सांगावा लागेल बहुतेक .
- Log in or register to post comments
क
कर्ण-२
गुरुवार, 07/02/2015 - 13:18
नवीन
उगा काहितरीच म्हणून टाकला आहे का हा लेख, असा असेल तर तुमच्या 'ह्य फाल्तु लेखाचि' कीव येईल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 07/02/2015 - 14:09
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
आ
आनंदराव
गुरुवार, 07/02/2015 - 14:12
नवीन
अ
एबीसी चौक नाही ओ
अप्पा बळवंत चौक म्हणा .
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 07/03/2015 - 16:26
नवीन
एफ सी कॉलेज रोड...!! पिवळं पितांबर...
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 07/03/2015 - 16:39
नवीन
हिरवा पाचू, लेडिज बायका, कंजूस सदाशिवपेठी इत्यादि!! ;)
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 07/03/2015 - 16:58
नवीन
हे लै जब्राट !
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 07/03/2015 - 17:16
नवीन
एफ.सी. कॉलेज इसर्ला का भौ!!
- Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न
गुरुवार, 07/02/2015 - 14:44
नवीन
शनिवार वाड्यासमोर एक कारंजे पण त्या तिथे तुम्हाला फोटो काढता येतील. मागच्या ट्रीपला मी काढल होते. पण आधी कारंजे चालु व्हायच्या तारखेची माहिती तुमच्या टुर गाईडकडुन घ्या. तो महानगरपलीकेतुन माहिती काढुन तुम्हाला देवु शकतो. फारच सुवर्णक्षण असतो तो, वर्षातुन एकदाच चालु करतात म्हणे ते कारंजे!!
तुमची सहल आनंददायी होवो !!!
- Log in or register to post comments
व
वगिश
गुरुवार, 07/02/2015 - 14:51
नवीन
हायला
- Log in or register to post comments
न
निरन्जनदास
Wed, 07/08/2015 - 10:08
नवीन
हे बेष्टच !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/02/2015 - 15:02
नवीन
आधी तुम्ही मंडैत या, म बघू! ;-)
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 07/02/2015 - 16:11
नवीन
@ अतृप्तजी , तुम्ही येणार का सोबत (व ८ डोकी होतील! )?
@पैसाताई मांजर नाही सोबत , अशोक समर्थ घेऊन गेले सगळ्या मांजरी.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 07/02/2015 - 15:05
नवीन
मांजर सोबत आहे का?
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 07/02/2015 - 15:19
नवीन
अश्लील अश्लील
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/02/2015 - 17:13
नवीन
famous activities नक्कीच worth doing असाव्यात असा अंदाज आहे, पण सहा मुलांत तुम्ही काय काय आणि कसं म्यानेज कराल हा प्रश्न पडलाय.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 07/02/2015 - 18:16
नवीन
हात आवरलेला दिसतोय =))
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/02/2015 - 19:16
नवीन
होय, बैजवार लिहीलं तर सगळ्यांना कळणार!! मग मजा काय नै का? ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 07/03/2015 - 07:46
नवीन
घ.लं. चा उगम आत्ता समजला =))
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 07/03/2015 - 12:14
नवीन
समजंला मरेऽऽऽऽ? आँऽऽ!!
-प्रोफेसर खोंड
- Log in or register to post comments
अ
अरवीन्द नरहर जोशि.
गुरुवार, 07/02/2015 - 17:28
नवीन
वाडा जळालेला असून त्यांत काहिच नाहि उगाच मुलांचे हाल करु नका.हितचिंतक .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/02/2015 - 17:34
नवीन
शनिवारवाड्यात बघण्यासारखे काहीही नाही. बाहेरून तटबंदी असली तरी तटबंदीच्या आत थोडिशी हिरवळ व काही झाडे आहेत. गेलात तर वेळ फुकट वाया जाईल. त्याऐवजी राजा केळकर वस्तुसंग्रहालय किंवा पु.ल. देशपांडे उद्यान बघा.
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 07/02/2015 - 17:59
नवीन
शनिवारवाड्याच्या बाहेर एक मशीद कि दर्गदर्गा. तिकडे तोंड करून उजव्या हाताने बाहेर पडलात की नवग्रनमंदीर आहे. तिथे जेवणाची सोय होते. ताट घरून घ्यावे लागते. जुम्मा चुम्मा या गाण्यातील पोर्सेलिनचा मग सोबत असल्यास मज्जाच मज्जा. तिथेच एक पुणेकर आडनावाचे गृहस्थ कवींंची संघटना चालवतात. तिथे जाऊन पुस्तके विकायला आहेत का अशी चौकशी करावी. तीन तासाचा वेळ असल्यास मला कविता आवडतात एव्हढे तरी नक्कीच म्हणावे. तुमच्या मोकळ्या वेळेचा प्रश्न सुटेल.
सोबत पुरूष माणसे असतील तर शनिवारवाड्याच्या बाहेर कान कोरणे, दाढी आणि कटींग अत्यंत स्वस्तात करून मिळेल. पाणीपुरीवर एक मसाला पुरी फ्री तसं गालावरून तुरटी मिप्रवण्यात येईल, वरून अंग रगडून देतात. पुण्यात आलात आणि फ्री सोडलंत तर दौरा वाया जाईल.
जाऊ द्या, आम्ही सांगायाचो कळकळीने आणि तुम्ही नंतर टिंगल करणार. कुणाला काही वाटत नाही हो पुण्याबद्दल. जळके कुकडे मेले ,मासेखाऊ सगळे !
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 07/02/2015 - 18:36
नवीन
गूगल मधे अक्षरमिसळ होतेय. गूगलचं नाव बेडेकर ठेवावं का ?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/02/2015 - 23:57
नवीन
जळके कुकडे मेले ,मासेखाऊ सगळे ! >> हे वाचून निर्वाण पावले आहे!
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 07/03/2015 - 07:38
नवीन
नाही करणार हो टिंगल टवाळी , रच्याकने मासे खायची इच्छा आहे , पण कुणीतरी शिकवायला पाहिजे . त्यात काटे वगैरे असतात ना !
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 07/03/2015 - 08:51
नवीन
सुरवात कोळंबीने करा, एकही काटा नसतो. मग सुरमय किंवा पॉम्प्रेट (पापलेट्)खाउन बघा. कर्ली शक्यतो टाळा.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 07/02/2015 - 18:32
नवीन
एकादशीला आलात आणि वृत्तीने धार्मिक असाल तर अजिबात खर्च येणार नाही.
शक्यतो पुण्यामधे सुट्टे पैसे घेउनचं सगळीकडे फिरावे. साधारण १२-१२ रुपयाची किमान ४३ नाणी, २५०-२५० रुपयांच्या १० नोटा अश्या स्वरुपात असु द्यावेत. त्यावर नवा व्यापारचा शिक्का असेल तर फुकटात व्याख्यान ऐकायची सोय पण होते. बाकी ग्रीस च्या चलनाला पुण्यामधे फाट्यावर मारलं जातं.
सत्यवचन. प्यायचं आणि वापरायचं पाणी माणशी ९० लिटरच्या बादल्यांमधुन घेउन यावं. तांब्याची सोय करुन मिळेल. फुलपात्र दोघात मिळुन एकचं मिळेल
बैठ्या अॅक्टिव्हिटी करणार का मैदानी त्यावर खर्च अवलंबुन आहे. मैदानी अॅक्टिव्हिटी शनिवारवाड्याऐवजी बाहेरच्या रस्त्यावर करा. बेशिस्त वाहतुकीमधुन खो-खो खेळत रस्ता ओलांडणे. समोरच्याच्या गाडीच्या मागच्या बाजुला आपल्या गाडीच्या पुढच्या टायरनी चुंबन देणे हा खेळ हल्ली विशेष लोकप्रिय होतो आहे.
बैठ्या अॅक्टिव्हिटी म्हणाल तर त्याविषयी नुकतेचं बैठी अॅक्टीव्हिटी करुन गेलेले श्री. शोनुटक्का साहेब उर्फ लाडोबा अधिक माहिती देउ शकतील. तांबीय अॅक्टीव्हिटीला पर्मिशण णाही. पोकळ बांबु घेउन लोकं जागोजागी बसलेले असतात. (नुसते. तांबे घेउन नाही).
शनिवार वाड्याच्या शेजारी हल्ली बर्याचं सर्व्हिस इंडस्ट्रीज उघडलेल्या आहेत. कानातला मळ काढुन देणे, अत्तरं विकणे, चुना लावणे वगैरे वगैरे. आपला अ-नुभव हिच्चं खात्री.
चितळ्यांसाठी तुमच्या गावची/शहरातली फेमस बाकरवडी आणा. शिवाय सहनशक्ती पण आणा.
तुमच्या काल-पनिक पिक-निकला सुबेच्छा!! पुस्प्गुच्च देउन स्वागत.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/02/2015 - 18:36
नवीन
निर्वाण पावलो आहे.
__/\__.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 07/03/2015 - 07:46
नवीन
अग्गाग्गा
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 07/03/2015 - 08:03
नवीन
जहाज योग्य मार्गे चालले आहे.
प्रवासास शुभेच्छा !!!
मौजे : कोपच्घेणे (बुदृक)
ता: तास(ण) गांव
जि: पु(र्)णे
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 07/03/2015 - 16:29
नवीन
:-))
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 07/02/2015 - 19:35
नवीन
तरी दोन जेनुईन ग्राहक सापडले की...
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 07/02/2015 - 19:50
नवीन
सगळ्यात स्वस्त हवं असेल तर जोशी वडेवालें कडला वडा खा. तो पुण्याबाहेरच्या लोकांमध्येच जास्त फेमस आहे. असले प्रश्न विचारणार्यांना तो खायला लावला की पुन्हा असे लोक पुण्यात येत नाहीत. वैशाली रुपाली नावाच्या दोन बालिका उगाचच अतिमहागड्या आहेत आणि उभ्या उभ्या पायावर वारुळं जमायला लागली की जागा मिळते हे लक्षात ठेवा. बाकी पुण्यवान लोकांच्या पेठेत गेलात तर बर्याच ठिकाणी थाळी मिळते ती स्वस्त असते. पण पानात टाकलंत तर दुप्पट पैसे भरावे लागतात (आणि त्यामुळेच थाळी स्वस्त असते, नावालाच फक्त गरीब लोकांची काळजी हे बाहेर पडताना तुमच्या लक्षात येईलच). बाकी जेवण झाल्यावर तोंड धुताना वॅक वॅक, खॉक क्वॅक सारखे आवाज काढत तोंड धुणार्याचा सत्कार केला जातो हे लक्षात ठेवा (अर्थात हे आधी सांगतच नाहीत, त्यामुळे त्यांना सरप्राईज दिलंत तर उत्तम, त्यातून तुमच्या कुटुंबसंख्येमुळे हा ध्वनी हॉटेलच्या बाहेर सुद्धा जाईल त्यामुळे ते सत्कार करतीलच करतील याची काळजी बाळगा).
२. घरुनच सुटे पैसे न्यावेत ? कि तिथेच बदलावे? कोणत्या नोटात बदलावे? १०-१० , कि ५०-५० ? साधारण किती १-१,५-५ असे सुटे जवळ ठेवावे?
पुण्यातल्या बसच्या कंडक्टर्स जवळ भरपूर मोड असते आणि ती कुणाला द्यावी या काळजीत असल्याने ते वैतागलेले असतात. ५००-१००० च्या नोटा फक्त ठेवा.
४. शनिवार वाड्या मध्ये करण्यासारख्या बर्याच famous activities आहेत, पण त्याच्या साधारण किमती सांगू शकाल का कुणी? आणि कोणत्या activities worth doing आहेत.?
पक्षीदर्शन ही सगळ्यात चांगली अॅक्टिव्हिटी. वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे पक्षी दिसतात. काही पक्षी भारताबाहेरून सुद्धा आलेले असतात. दुसरी महत्वाची अॅक्टीव्हिटी म्हणजे 'काका मला वाचवा' चा आवाज कुठून येतोय का याचा शोध घेणं. यासाठी अमावस्येच्या रात्री जाणं आवश्यक आहे म्हणतात. एक लाईट शो पण सुरू झाला आहे. त्यात मराठ्यांचा इतिहास वगैरे बोरिंग गोष्टी सांगतात (नुस्तं सांगतातच आणि मग घरी जायला सांगतात). ती टाळली तर बरंच. तो बघणार असलाच तर डास मारायसाठीचं रॅकेट घेवून जा. टाईम पास चांगला होईल.
५. ह्या activities चे साधारण काही packages असतात का? आणि ते कुठून बुक करू शकतो?
ते बुक करता येत नाहीत. आम्ही अशा गोष्टी सुलभ, सरळ करण्याच्या विरुद्ध आहे. उगीच माणसांचा लोंढा येवून सगळी तिकटं विकली गेली तर उगीच पुण्याची बदनामी व्हायची. तिकीट तिथंच विकत घ्यायचं.
६. शनिवार वाड्याच्या बाहेर खरेदी करण्या जोगे असे काही आहे का?
आहे तर. बाहेर परकार आणि आयोडेक्स मिळतो.
७. साधारण या पुणे दौर्याला काय काय सोबत घ्यावे ?
१. मराठी डिक्शनरी (जर तुम्ही विदर्भ साईडचे असाल तर)
२. एक सुईदोरा
३. एक उदबत्ती
४. दोन बटाटे
५. एक ताडपत्री
६. पाँड्स पावडरीचे २ मोठे डबे
७. व्हिक्स इन्हेलर
सध्या एवढं पुरे.
मी इथे विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त अजून काही अवांतर माहिती मिळाल्यास उत्तम.
अवांतर माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाकडे किंवा चितळेंच्या मंडई शाखेकडे चौकशी करावी.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 07/03/2015 - 06:23
नवीन
एकापेक्षा एक मौल्यवान सल्ले वाचून जीव धन्य झाला, डोळे पाणावले आणि पुणेकर असल्याचा मनापासून अभिमान वाटला :)
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 07/03/2015 - 07:20
नवीन
तिथे संध्याकाळी शनिवार वाड्यावर आधारीत ध्वनी-चित्र-प्रकाश कार्यक्रम असतो .
रात्री फार उशीरा थांबु नये . कारण 'काका मला वाचवा' असे शब्द कानी येतात .
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »