Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पेटीएम

स
सर्वसाक्षी
गुरुवार, 07/02/2015 - 12:42
🗣 17 प्रतिसाद
आजकाल क्रेडिट/ डेबीट कार्डाऐवजी पर्याय म्हणुन पेटीएम सारखी आर्थिक व्यवहारसाधने आढळतात. माझा बाळ्बोध समज असा की ह्या नव्या पाकिटात आपण लागतील त्यानुसार काही पैसे ठेवायचे व खर्च करायचे. यात सकृतदर्शनी फायदा असा की पाकिट कुणी उडवले तर त्यात अस्लेली रक्कमच जाइल. खात्यातली सर्व रक्कम वा क्रेडीट कार्ड मर्यादे इतकी रक्कम जाणार नाही. पाकिटात पैसे आपणच भरणार. मग ते पैसे खात्यातुन पाकिटात ठेवताना जालचोर हेरु शकतात का? पेटीएम वा तत्सम पर्याय किती सुरक्षित आहेत? हे व्यवहार संगणकावर करता येतात की अ‍ॅपच वापरावे लागते? (जो उठतोय तो अ‍ॅप उतरवुन घ्याय्चा आग्रह धरतोय. किती अ‍ॅप उतरवुन घेणार? एक दिवस बोलायला/ वाचायला एक हस्तसंच आणि अ‍ॅपसाठी एक स्वतंत्र हस्तसंच ठेवायची वेळ येईल)

प्रतिक्रिया द्या
6944 वाचन

💬 प्रतिसाद (17)
स
सव्यसाची गुरुवार, 07/02/2015 - 12:56 नवीन
भ्रमणध्वनी वर app उतरवून त्यावरती काही करणे थोडे (मलातरी) धोक्याचेच वाटते. त्यामुळे मोबाइल वरून पेमेंट शक्यतो मी करत नाही. पेटीएम बद्दल एवढेच माहिती आहे कि उबेर साठी पेटीएम चे अकौंट लागते. पण त्यावातीरिक्त त्या अकौंट कधीच उपयोग केला नाही. बाकी प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.. !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/02/2015 - 14:08 नवीन
>>>> भ्रमणध्वनी वर app उतरवून त्यावरती काही करणे थोडे (मलातरी) धोक्याचेच वाटते. बँक ऑफ महाराष्ट्राने तर भ्रमनध्वनीवर अ‍ॅप उतरवून घेणे कंपलसरी केलंय. काही बील पेड करायचे असले एक कोड क्रमांक त्यावरच येतो यात काय धोका आहे ? Paytm वर मी खरेदी केली आहे पण डिबिट कार्डावरुन त्यात काही अजून धोका वाटला नाही. erecharge या अ‍ॅप्लीकेशनवरुनही मी प्रिपेअर कार्ड रिचार्ज केले आहेत सेम प्रोसेस. अजुन काही तरी धोका वाटला नाही ? काय धोके होऊ शकतात ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची गुरुवार, 07/02/2015 - 15:27 नवीन
सर, खरेतर त्या वाक्यामध्ये मला काय म्हणायचे ते नीट लिहिता आले नाही. 'काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो असे मला वाटत राहते म्हणून apps वरून payment मी टाळतो' असे मला म्हणायचे होते. कदाचित ते सेफ असेलही, कदाचित नसेलही. त्याबद्दल मला तितकीशी कल्पना नाही. मलाही वाचायला आवडेल जर कुणी इथे या विषयावर लिहिणारे असतील तर. जेव्हा ऑनलाइन पेमेंट ची वेळ येते तेव्हा संगणकावरूनच करतो. तेही नेट कॅफे किंवा तत्सम ठिकाणी कधीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अद्द्या गुरुवार, 07/02/2015 - 13:28 नवीन
पेटीएम गेली ३-४ वर्षे मि वापरतोय . वेबसाईट / अ‍ॅप कसंहि वापरु शकता . अजुन तरी मला काहि प्रोब्लेम आलेला नाही. .
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/02/2015 - 13:48 नवीन
पेटीएम वरून जास्तीत जास्त फ्रॉड होतात.त्यांच्याकडची माहिती तेवढी सुरक्षित रहात नाही असे ऐकले. खरे खोटे माहीत नाही. आंतरजालीय पेमेंटसाठी मी मुद्दाम एक कमी लिमिट असलेले क्रेडिट कार्ड वापरते. त्याला डबल सिक्युरिटी असते. डेबिट कार्ड सुद्धा कधीच वापरत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/02/2015 - 14:13 नवीन
>>> पेटीएम वरून जास्तीत जास्त फ्रॉड होतात.त्यांच्याकडची माहिती तेवढी सुरक्षित रहात नाही असे ऐकले. विदा नसल्यामुळे अफवा अशाच जास्त पसरतात आणि आपण सामान्य ग्राहक धोका नको म्हणुन व्यवहारच टाळतो. असेच होत राहीले तर, भविष्यात डिजीटल क्रांती किती विश्वासु असेल देवास ठाऊक ? आता आपल्याच प्रतिसादामुळे पेटीएम मधुन कोणाचा काही खरेदी करायचा विचार करायचा असल्यास झालाचा ना त्यांचा कॉन्फीडन्स लुज. ( पेटीएम मधे माझे कोणतेही हितसंबंध नाही) वाईट अनुभव अगदी खात्रीने कोणी सांगितल्याशिवाय अशा अ‍ॅप बद्दल काही मतं व्यक्त करणे जरा धाडसाचेच ठरते, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 07/02/2015 - 14:55 नवीन
पेटीएमचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. पण माझा भाऊ अ‍ॅक्सिस बँकेत मंनेजर होता. त्याच्या काही कस्टमर्सकडून पेटीएम कडून अशी माहिती लीक झाल्याचे त्याने ऐकले आहे. एअरटेल मनी वाल्यांचा मला वाईट अनुभव आहे. माझ्या आयसीआयसीआय क्रेडिट कार्डाचे नंबर सकट डिटेल्स घेऊन त्यानी मला फोन केला होता. व्हेरिफिकेशनच्या नावावर. मी चुकून जन्मतारीख सांगितली आणि मेसेज आला की पिन बदलला. ५ मिनिटात हे फ्रॉड आहे असे लक्षात आले तोपर्यंत त्यानी ४५०० ट्रान्सफर करून घेतले होते. लगेच कार्ड ब्लॉक केले. बिल डेस्कवाल्यानी ताबडतोब त्यावेळचा आयपी घेऊन ट्रान्झॅक्शन एअरटेल च्या उत्तर प्रदेशातील एका ऑफिसमधून झाल्याचे सांगितले. मात्र रक्कम छोटी असल्याने त्याचा जास्त पाठपुरावा कोणीच केला नाही. असे किती लोकांना गंडा घालत असतील देवजाणे. असल्या उचल्या लोकांकडे जाण्यापेक्षा बँकेच्या क्रेडिट कार्डाने व्यवहार करावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आनंदराव गुरुवार, 07/02/2015 - 13:59 नवीन
madhyantari ashi batami vachali hoti ki ratan tata ni paytm madhe investment keli ahe
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 07/02/2015 - 14:41 नवीन
हो. अश्या १० स्टार्टअप मधे त्यांनी इन्वेस्टमेंट केलीय. http://www.loksatta.com/arthasatta-news/ratan-tata-picks-up-stake-in-olacabs-1118888/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव
D
dadadarekar गुरुवार, 07/02/2015 - 14:53 नवीन
ऑनलाइन , व्हर्चुअल पेमेंटवर विश्वास नाही. क्याश व चेक हेच बेस्ट आहेत. लहान सहान रकमेला डेबिट कार्ड वापरतो. पण वर खाली कुठे क्यामेरा नाही ना ? कीपॅडवर दुसरा हात झाकून वगैरे करतो.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 07/02/2015 - 16:29 नवीन
मुळात मला असा प्रश्न पडतो कि , समांतर चलन निर्माण करण्याचा अधिकार कंपन्यांना आहे का ? (उदाहरणार्थ सोडेक्सो कुपन. पेटीएम, एअरटेल मनी, तत्सम ). चलन निर्माण करण्याचा अधिकार केवळ सरकारकडेच असतो ना , मग हे असे समांतर चलनाला सरकार परवानगी कशी देते?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/02/2015 - 17:02 नवीन
या प्रकारास समांतर चलन असे म्हणण्याबाबत असहमत. हे सर्व प्रकार वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आहेत. प्रत्येक वेळी रोख चलन बाळगणे व वापरणे सोयीचे नसू शकते. प्रिपेड कॅश कार्ड पण असेच असते. या चर्चेत ज्यांचा उल्लेख आहेत ते फोनवरून किंवा जालावरून वापरण्याचे प्रकार आहेत. बिटकॉईन हे समांतर चलनाचे उत्तम उदाहरण आहे. ज्यावर भारतासकट अनेक देशांत बंदी आहे. अवांतरः रोख चलन का वापरू नये (माझे विचार).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
अ
अभिजित - १ Sat, 07/11/2015 - 15:38 नवीन
इथे मिसळ पाव वर एका मुलीने टाकला होता आपला अनुभव . पेटीम ने कसे मूर्ख बनवले ते. आठवा !! अकौंट खाली केला तिच्या वडिलांचा ..
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 07/11/2015 - 17:09 नवीन
हा तो लेख - Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत.... याबाबतचा उल्लेख तुम्ही ज्याप्रकारे केला ते जरा अनुचित वाटले. मी तेच खालील वाक्यात लिहिले असते. पेटीएमच्या वापरातून झालेल्या आर्थिक फसवणूकीबाबतचं अनुभवकथन पूर्वी मिपावर येऊन गेलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sat, 07/11/2015 - 19:43 नवीन
काय आहे भारतातील system ची अव्यवस्था, तिच्या कडून होणारी फसवणूक. कोणताही प्रश्न सोडवण्य पेक्षा तो दाबून टाकून सगळे काही स्वच्छ आहे हे दाखवण्याची टिपिकल प्रवूत्ती याचा मला भयंकर राग येतो. त्या मुळे माझी भाषा पण अशा ठिकाणी नको इतकी harsh होते. त्याला माझा नाईलाज आहे. पेटीम हि पैसे खाणारी कंपनी आहे याबाबत काहीच शंका नाही. खालील ५६८ review वाचा. ७० टक्के लोकांनी १ star दिलाय . फक्त १० टक्के लोक ५ star देत आहेत. http://www.mouthshut.com/websites/PayTm-com-reviews-925631912#allreviews May 2, 2015 - Police told media that Paytm's directors Vijay Shekar Sharma and Harendra Pal Singh have been named in the FIR under sections of forgery and IT Act. http://timesofindia.indiatimes.com/india/Madhya-Pradesh-police-books-Paytm-directors-in-fraud-case/articleshow/47134081.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 07/12/2015 - 15:11 नवीन
माझ्या प्रतिसादाचा रोख तुमच्या विधानातील दुसर्‍या मिपाकराबाबतच्या रोखाकडे होता. त्यांच्याबद्दल नकळतपणे अनादर व्यक्त झाल्यासारखे वाटले. स्वतःच्या झालेल्या फसवणुकीबद्द्ल सार्वजनिक व्यासपीठावर लिहिणे ही धैर्याची बाब आहे. संभाव्य धोक्याबाबत इतरांना जागरूक करण्याचे काम यातून होत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Sun, 07/12/2015 - 15:33 नवीन
तिने खरेच खूप चांगले काम केले. तिचे मी पण आभार मानतोच. तसे काही वाटत असेल तर माझा खरेच तो उद्देश नव्हता. फक्त लोकांना पेटीम विषयी कडक feedback देणे , जेणे करून त्यांचे डोळे उघडतील इतकाच माझा उद्देश होता आणि म्हणून मी तशी भाषा वापरली. कारण इथे बरेच लोक पेटीम विषयी सहानुभूती बाळगून आहेत असे दिसले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा