हिंजवडी -- परांजपे बिल्डर्सच्या "ब्लू रिज" बद्दल माहिती हवी आहे.
सध्या रहायला नवी मुंबईत आहे. ( कुटुंब - स्वतः बायको, 2 मुली, आई)
१ बीएचके चा फ्लॅट विकून तिकडे ३ बीएचके घेण्याचा विचार आहे. राहत्या ठिकाणी ३ बीएचके घेणे माझ्या बजेटच्या बाहेरची बाब आहे. (खूप जास्त गृहकर्ज करायचे नसल्याने)
नेटवर तरी प्रोजेक्ट चांगला दिसतोय. शाळा प्रोजेक्टला लागून आहे असे दिसते.
१ - २ मूली आहेत शाळेत जाणाऱ्या, शाळा जवळ असणे हि मुख्य अट आहे घरून." जवळ म्हणजे चालत जाण्यायोग्य"
२ - सर्व amenities असलेल्या ठिकाणी राहण्याची हौस.
३ - गर्दीपासून सुटका - नोकरी बोटीवर असल्याने रोज कामावर पळायचे नाही.
माहिती पाहिजे
१. मेंटेनन्स चार्जेस - दरमहा ??
२. छोटी मुले आणि वयस्कर व्यक्ती (आई)असलेल्या कुटुंबासाठी ??
भिती हि कि बहुतांश जनता IT वाले आणि DINK (डबल इन्कम नो किड्स)
३ शाळेव्यतिरिक्त इतर छंदवर्गाची उपलब्धता
-- भेट देणार आहे पुढील महिन्यात पण त्यात फ्लॅट बघणे होईल.
प्रत्यक्ष राहणाऱ्याकडुन / त्या भागातल्या जाणकारांकडुन कळावे हि अपेक्षा.
--- धन्यवाद
रिग पिग
💬 प्रतिसाद
(75)
प
प्रसाद गोडबोले
Sun, 07/05/2015 - 07:39
नवीन
गूगल बंद पडले आहे का हो आजकाल ?
- Log in or register to post comments
म
मनिष
Sun, 07/05/2015 - 08:13
नवीन
हिंजवडी म्हणतात त्या भागाला, हिंजेवाडी नाही. हिंजेवाडी मुख्यतः बाहेरच्यांनी केलेला अपभ्रंश आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग
Sun, 07/05/2015 - 15:38
नवीन
बरोब्बर
हिंजवडी - हिंजेवाडी
औंध - आँध
येरवडा - येरवाडा
चतु:शॄंगी - चतुरशिंगी
असले अपभ्रंश वाचून तिडिक जाते डोक्यात.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sun, 07/05/2015 - 15:48
नवीन
बाकी उदाहरणांचे ठाऊक नाही पण हिंजवडीचा उच्चार हिंजेवाडी असा केला जाण्याचा दोष त्या गावाचे स्पेलिंग Hinjewadi असे असण्यालाही जातो.
काही ठिकाणी Hinjawadi असंही पाहिलं आहे. परंतु Hinjewadi अधिक पाहिलं आहे.
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 12:34
नवीन
चालायचंच भाऊ अडाणी जनता भरपूर आहे भारतात! जिथं आपल्या देशाची ओळख अजून तथाकथित उच्चभ्रू राजकारणी धर्मनिरपेक्षतावाले इंडीया च करून देतात, तिथं या अडाणी जनतेचा तरी राग का धरता?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 07/06/2015 - 13:21
नवीन
खडकी चा स्पेलिंग kirkee असे ज्या महाभागाने केले तो एक मूर्ख !
आणि तेच स्पेलिंग पुढची कित्येक वर्षे संभाळणारी नोकरशाही शतमूर्ख
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 07/06/2015 - 13:28
नवीन
ब्रिटिशांच्या उच्चारपद्धतीप्रमाणे ते स्पेलिंग फार चूक नाही. पण आपण इंग्लिश शिकू लागल्यावर आपल्या उच्चारपद्धतीप्रमाणे स्पेलिंग्ज नीट बदलली पाहिजेत, नायतर मथुरेचे muttra पाहून भारतीय डोळ्यांना कसंसंच होतं. छत्रपती या शब्दाचे ब्रिटिशांनी केलेले अनेक स्पेलिंगपैकी एक स्पेलिंग पाहिले, ते इथे लिहवत नाही. तो कै त्यांचा दोष नाही, ते उच्चार ठीकठाकच करत - पण आपली उच्चारपद्धती तशी नसल्याने आपल्याला ते बघवत नाही सबब तशी स्पेलिंग्स बदललीच पाहिजेत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 07/06/2015 - 15:57
नवीन
ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळाल्यावरसुध्धा "भारत" आणि "India" अशी दोन्ही नावे २ वेगळ्या भाषांत ठेवली त्यांच्याकडून वरची अपेक्षा ठेवणे जरा जास्तच नै होत?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 07/06/2015 - 16:13
नवीन
अगदी अगदी...पण लै नाही तरी थोडं तरी...
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 07/06/2015 - 16:38
नवीन
टक्याने मांडलेल्या मुद्द्याबरोबर सहमत.
तसेच भारतातल्या (महाराष्ट्रात नसलेल्या) कितीतरी ठिकाणांचे मराठीतले उच्चार तेथील स्थानिक भाषांपेक्ष खूप वेगळे आहे. हा मुद्दा सोयिस्करपणे विसरला जातो.
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 16:51
नवीन
बरोबर आहे जोशीसाहेब. इतर भाषांतील नावे, शहरे यांचा आपण पण आपल्याला वाटेल तसा उच्चार करतोच की. उदा. बिसी बेळे हुळे अन्न या कानडी पदार्थाचा उच्चार मी ग्रामीण भागात "भिशी बिळी अण्णा" असा भयंकर ऐकलाय.अशी विविधता आहे म्हणून गंमत पण आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/06/2015 - 17:24
नवीन
आणि वानवडीचं Wanowrie, घोरपडीचं Ghorapurie !! ;)
उत्तरेतल्या लोकांचं एक पाह्यलंय. नावांचे सत्यानाश शिकावे तर त्यांच्याकडून!!
आणि बोललं की आपल्याच लोकांना राग येतो. मध्यंतरी हिंजेवाडीवरनं चेपुवर कमेंट टाकली तर एक महाभाग म्हणून गेला शीव चं नाय का Sion झालं. अरे झालं ठीकाय, म्हणून हे पण होऊ द्यायचं का? मूर्ख लेकाचे!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 07/06/2015 - 17:40
नवीन
विक्रोळी चं बिकरौली. एका उप्र ने असंच दादर स्टेशनवर विचारलं. ये बिकरौली कितना लंबा है? मला दोन मीणीट कळलेच नाय बाबा काय म्हंतोय...
तसंच. कोपरखैरना, तुर्बा, सन्पाडा, रबाला,
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/06/2015 - 17:44
नवीन
वशाडी येवो!! असं बोलणार्या कर्मचार्यांकडून मी तिथल्या तिथे बरोबर उच्चार करवून घेतो. वाईटपणा येतो, पण मुंबैकरांनी आपल्या भाषेची शरम वाटून घेऊन आधीच अवलक्षण ओढवून घेतलंय तेवढं पुरे!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 07/06/2015 - 18:02
नवीन
मी पण तेच केलं.
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 18:33
नवीन
मराठी डोकी प्रचंड तापलेली आहेत. अहो पण या उपसंग्रामात रिग पिग साहेबांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? एक अकेला इस शहर में
मला रिग पिग साहेब अमोल पालेकर सारखं उदाह बसलेले डोळ्यासमोर तरळून गेले.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 07/06/2015 - 18:47
नवीन
काय राव? आपल्या गावाच्या नावाची वाट लागली की सगळ्यांची डोकी अशीच तापलेली असतात. न्यु यॉर्क ला नेवार, लंडन ला लंटन, पॅरीसला फ्यारेस, सिडनेला शेदनी, कॅलिफोर्निया ला कलफुनिया, असं काय म्हटलं तर चालंल का तितल्या भूमिपुत्रांना?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 07/06/2015 - 18:57
नवीन
इंग्रजांनी पारि चे पॅरिस केले म्हणून फ्रेंचांनी लंडनचे लॉन्द्रे केले असे वाचले आहे.
मूळ फ्रेंच उच्चार देवनागरी लिपित लिहिण्याचा माझा प्रयत्न गोड मानून घ्यावा.
- Log in or register to post comments
ज
जुइ
Mon, 07/06/2015 - 18:57
नवीन
चिकागो राहिले या यादित.
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 19:02
नवीन
नावं डांगेसाहेब फिक्स झालीच पाहिजेत. माझं त्या बाबतीत काही म्हणणे नाही. पण एखाद्या अडाणी मेंदूला त्याचा उच्चार जमतंच नसेल तर आपण हलके घ्या. एवढंच म्हणायचंय मला. बाकी कायदे करणारे मराठी पुढारी निवांत आहेत. आणि आम्ही थंड घ्या म्हटलं तर चक्क शिव्या! तुम्ही नाही! थोडंसं वर बघा. एवढ्या स्पष्ट भाषेत आपण राज्यकर्त्याना जाब विचारला असता तर मराठीची दैना झालीच नसती.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/06/2015 - 19:14
नवीन
जाब विचारायचा म्हणजे काय करायचं ते सांगा बरं!!
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 19:23
नवीन
सूड साहेब, हा प्रश्न अपेक्षितच होता. पण तुमची एकंदरीत भाषाशैली बघून तुमच्याशी वाद वाढवत नाही. कारण संगणकाची बटने दाबून ना तुम्ही बदल घडवू शकता ना मी. अनामिक आयडीच्या आवरणाखाली लपून केलेल्या या वादाला काय अर्थ आहे. गुडबाय.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Mon, 07/06/2015 - 19:46
नवीन
म्हणजे ओळखीच्या लोकांनी समोरासमोर एकमे़कांचे गळे पकडून केलेल्या भांडणांना काही अर्थ असतो वगैरे म्हणायचे आहे काय? "आयडीच्या" हा एकवचनी शब्दप्रयोग असल्याने नेमक्या कुणाच्या अनामिकतेकडे अङ्गुलीनिर्देश आहे? त्यांच्या, की स्वतःच्या? ;)
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 20:24
नवीन
ताई अहो माझ्यासाठी हा विषय केव्हाच संपलाय. का तुम्ही त्रास करून घेताय स्वतःला. मी इथे फक्त कथा काव्य पाककृती यांचा आनंद घ्यायला येतो. शिवीगाळ वादविवाद यासाठी नाही. आपणांस अशा गोष्टींची फार आवड असल्यास आपण समविचारी मंडळी शोधावीत.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/06/2015 - 20:28
नवीन
शिवीगाळ कोणी आणि कुठे केलीय ते दाखवून दिलीत तर बरं होईल.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 07/07/2015 - 03:11
नवीन
समोरच्याने मुद्दा धरुन बोललं की काही लोकांना अपमान झाल्यासारखं वाटतं. त्यांना शिवीगाळ केल्यासारखं वाटतं असावं. रच्याकने तु आयडीमागे लपुन का बोलतोस रे आँ? पुढच्या वेळी स्वतःचं पुर्ण नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान, शिक्षण, सद्ध्याची नोकरीची जागा (वाद टकाशी घालत असशील तर बाकी काही गोष्टीही हाताशी ठेव ;) ) वगैरे सगळ्या डीट्टेल दे बरं. अशी लपवाछपवी बरी नव्हे हो सूडपंत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 06:15
नवीन
संदर्भासहित स्पष्टीकरण dene
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 07/07/2015 - 11:11
नवीन
Entropomentry.
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/06/2015 - 20:29
नवीन
आणि हो यावर सुद्धा काही प्रतिक्रिया टाकणार असाल तर माफ करा. मी काही परत वाचायला या धाग्यावर येणार नाही. तेव्हा वाटेल ते लिहा. आपणांस लखलाभ.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 07/06/2015 - 21:06
नवीन
एवढ्यातच संपलात ? मग कसं ओ व्हायच
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 07/07/2015 - 11:14
नवीन
एशियन पेंट्स वापरायला अजिबातच वाव न मिळाल्याने हळवे झाले असतील बिचारे. आपण दोन मिनीट शांतता पाळूया त्यांच्यासाठी.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 07/07/2015 - 11:28
नवीन
या ग्लोबलाईझ्ड जमान्यात एशियन पेण्टवर अडून कशाला बसायचं म्हणतो मी. आफ्रिकन नैतर युरोपियन नैतर अमेरिकन नैतर आष्ट्रेलियन पेण्टदेखील उपलब्ध असतीलच की (ते सगळे मेडिन्चाय्ना नसले म्हणजे मिळवली).
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 07/07/2015 - 11:46
नवीन
आफ्रिकेत (अल्जीरिया मध्ये तरी) बराचसा माल 'मेड इन चीन' आहे. चीनची मुसंडी जोरदार आहे. भारतानं निव्वळ वल्गना कराव्यात.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 07/07/2015 - 12:35
नवीन
खरंच की !! पेंट कोणताही असो, रंग महत्त्वाचा!! ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 07/08/2015 - 13:52
नवीन
पेंट कोणताही असो, रंग महत्त्वाचा!!
>>>
सत्यवचन !
हे घ्या आमच्या तर्फे तुम्हाला भेट : 'मी'चित्र

- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 15:46
नवीन
वा वा वा वा....
सर्व विभक्त्या आणि सर्व वचने दिसली. =))
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
गुरुवार, 07/09/2015 - 05:38
नवीन
धाग्याचा ग्रीस केला राव मंडळीने ... :)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 07/05/2015 - 09:08
नवीन
मी काम करत असलेल्या कंपनीचे गेस्ट हाउस याच संकुलात आहे. आणि गेले दोन आठवडे याच गेस्ट हाउस मधे रहातोय. जबरद्स्त वेगाने वाहणारे वारे आहेत. एसीची गरज नाही. उन्हाळ्यात बघावे लागेल. संपूर्ण स़कूलाच्या मधोमध गोल्फ मैदान आहे. गोल्फ मैदानाच्या देखभालीचा खर्च अफाट असतो. पण संकूलातील रहीवासी कधी गोल्फ मैदानात दिसले नाहीत. शाळा जवळ आहे. चालत जाउ शकतो एवढ्या जवळ. लीफ्ट कोने कंपनीची आहे. सुरक्षा उच्च दर्जाची आहे. सुरक्षारक्षक बायोमेट्रीक प्रणालीने दरवाजा उघडून देतात. सदनीका प्रशस्त आहेत. मुंबईच्या विकासकांसारखी कंजूषी करुन खूराडी बांधलेली नाहीत. बाजूलाच बारमाही पाणी असलेली नदी आहे. त्या नदीवर अवलंबून असलेली बागायती शेती आहे. संकूलातील रस्ते आणि बाकीचे इन्फ्रस्ट्रक्चर उच्च दर्जाचे आहे.
बाकी तुम्ही प्रत्यक्ष पहालच...
राहता राहीला प्रश्न मेंटेनन्स चार्जेसचा, ते मी विचारुन सांगतो.
अधिक माहीतीसाठी आपला भ्रमणध्वनी मल व्यनी करा..
- Log in or register to post comments
र
रिग पिग
Fri, 07/10/2015 - 06:41
नवीन
व्यनी केला आहे.
धन्यवाद
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sun, 07/05/2015 - 12:54
नवीन
खोल्या छोट्या आहेत. मी गेलो होतो बघायला. दोन वर्षापूर्वी. नाही आवडलं.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 07/05/2015 - 13:33
नवीन
मलाही ब्लू रिजबद्दल वाचायला आवडेल. जालावरून घरांच्या किमतीची कल्पना आली आहे. खटपट्या यांचा प्रतिसाद वाचून काय ते समजले. खोल्यांचे आकार जरा लहान वाटले, तरी बाकी गोष्टी आवडल्यात पण किंमत बघून गप्प बसण्यात आले आहे. उगीच फ्ल्याट घ्यायचा नाही तरी कशाला चौकश्या करतेस असे नवरा म्हणेलच! ;) पण आता बाकी माहिती झालीये तर मेंटेनन्सचा आकडा समजला तर बरे होईल. आमच्या आत्ताच्या सोसायटीचा मेंटेनन्स एकदम दुप्पट केलाय, यावर्षीपासून.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sun, 07/05/2015 - 15:19
नवीन
मी काही काळ राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज १ मध्ये काम केले आहे. माझ्या हापिसच्या बाल्कनीवजा ब्रेक घेण्याच्या जागेतून काढलेला हा ब्लू रिज प्रकल्पाचा फोटो (नोव्हे २००७). त्या काळात सरकारी प्रकल्पाला लाजवेल इतक्या कूर्मगतीने काम सुरू होते. तेव्हा ऐकलेली किमान किंमत ₹५५ लक्ष होती. म्हणजे आता कदाचित ₹१.२५ कोटी वगैरे असावी (अंदाज)
माझे दोन प्रश्न
- ब्लू रिजमध्ये राहणार्या रहिवाशांना राजीव गांधी इन्फोटेक पार्कातून बाहेर पडण्यासाठी व परत येण्यासाठी वेगळा रस्ता आहे का? की जो रस्ता तिथे काम करणारे वापरतात तोच वापरावा लागतो?
- इथे शाळा असली तरी नव्याने सुरु झालेल्या शाळेत (प्राथमिक शिक्षण वगळता) शिक्षणाच्या दर्जाबाबत काय परिस्थिती आहे.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Sun, 07/05/2015 - 16:43
नवीन
५० लाख कशाचे ? प्लॉट की फ्लॅट ?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sun, 07/05/2015 - 16:51
नवीन
तेव्हाच्या ऐकीव माहितीनुसार ब्लू रिज प्रकल्पातील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत ₹५५ लक्ष होती.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 07/05/2015 - 17:15
नवीन
सध्या बांधकाम व्यावसायिकांची कोटीच्या कोटी उड्डाणे असल्यामुळे हे दर परवडणार नाहीत. लाखाच्या किमतीत घर उपल्ब्ध असलेले एवढ्यात पाहण्यात नाही. अर्थात मी पहात असलेली ठिकाणे त्याला कारणीभूत असतील. पुण्यापासून लांब म्हणजे किती लांब जायचे? उगीच कारण नसताना घरे का घेऊन ठेवायची? असे प्रश्न आहेत, जे बरोबरही आहेत पण मला ब्लू रिज फोटूमध्ये बघून तरी आवडले होते म्हणून नस्त्या चौकश्या करतीये. ;)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 07/06/2015 - 06:46
नवीन
वडगांव धायरी परिसरार चाळीस लाखाच्या आसपास किंमतीत १ बीएचके फ्लॅट मिळतात की.
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 07/06/2015 - 12:09
नवीन
ओक्के.
- Log in or register to post comments
ग
गणेश माळी
Sun, 07/05/2015 - 19:36
नवीन
ही टाउनशीप आहे पुर्ण.९५% आयटी जणता...हिंजवडी अजुणहि गावच आहे.अजूण ५ वर्ष लागतील पुर्ण विकसीत व्हायला
मी १ वर्षापासून जातो हपीसला....
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Sun, 07/05/2015 - 20:18
नवीन
नवीन मुम्बै सोडुन पुण्यात कशाला जायचे ?
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
Mon, 07/06/2015 - 06:38
नवीन
हिंजेवाडी (हिंजवडी त्याला कूणीसुद्धा म्हणत नाही) मध्ये येताय, तर काही गोष्टींचा विचार नक्की करा.
१) हे पुणे नाही, नदीपलीकडेच पि.चि. सुरू होते.. :)
२) या रस्त्याने घरी जाणे त्रासदायकच राहणार आहे. रोडवर नेहमीच कोंडी असते, शनीवार - रवीवार सोडून.
३) घरातच राहणार असाल तर ठिक, कारण आजूबाजुचा परीसर एकदम भकास आहे तसा, म्हणजे पाच दिवस लोक असतात आजुबाजुला, पण विकांतला फक्त आजुबाजुची गुण्ठामंत्रीच. काही खरेदी करायची असल्यास औंध, पिंपरी हेच पर्याय आहेत, अर्थात डी-मार्ट व तत्सम दुकाने आहे या भागात.
४) घरे बघितली होती सुरवातीला, नुसते रेल्वेचे डबे आहेत. छोट्या खोल्या आणि लम्बुळके डिझाईन.. विशेष आवडले नव्हते. फक्त उंच टावर आहेत, आणि दोन बिल्डींगनधली जागा कमी वाटली.
५) एकीव माहितीनुसार शाळा फक्त ब्लू रिजपुरती नाही, म्हणजे तुम्ही तिथे राहता, म्हणून मिळेलच याची शाश्वती नाही. रात्रभर लाईन लावून फार्म मिळतो, मग दाखला, एकदा तपासून बघा..
६) जायचा रस्ता छोटा आहे, जो मोठा रस्ता बनवलाय, तो थोडा वळुन जातो.
७) अजून एका मिळालेल्या माहीतीनुसार, हिंजेवाडी ते बालेवाडी हा एक प्रकल्प रखडला आहे. बालेवाडीला जाणारा रस्ता हा ब्लू रिज ने जो आपला म्हंटलाय तोच रस्ता आहे, असे असेल तर पुढे हा आम रस्ता होणार, मग तर मज्जाच बघा... :)
८) नदीच्या चित्रावर जाऊ नका.. एव्हढी निळी नाहीये ती... :)
९) बाकी बांधकाम उच्च दर्जाचे आहे...व सुरक्षा छान आहे. पण एव्हढा मोठा परीसर म्हणजे खर्च असनारच...
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »