Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंजवडी -- परांजपे बिल्डर्सच्या "ब्लू रिज" बद्दल माहिती हवी आहे.

र
रिग पिग
Sun, 07/05/2015 - 07:35
🗣 75 प्रतिसाद
सध्या रहायला नवी मुंबईत आहे. ( कुटुंब - स्वतः बायको, 2 मुली, आई) १ बीएचके चा फ्लॅट विकून तिकडे ३ बीएचके घेण्याचा विचार आहे. राहत्या ठिकाणी ३ बीएचके घेणे माझ्या बजेटच्या बाहेरची बाब आहे. (खूप जास्त गृहकर्ज करायचे नसल्याने) नेटवर तरी प्रोजेक्ट चांगला दिसतोय. शाळा प्रोजेक्टला लागून आहे असे दिसते. १ - २ मूली आहेत शाळेत जाणाऱ्या, शाळा जवळ असणे हि मुख्य अट आहे घरून." जवळ म्हणजे चालत जाण्यायोग्य" २ - सर्व amenities असलेल्या ठिकाणी राहण्याची हौस. ३ - गर्दीपासून सुटका - नोकरी बोटीवर असल्याने रोज कामावर पळायचे नाही. माहिती पाहिजे १. मेंटेनन्स चार्जेस - दरमहा ?? २. छोटी मुले आणि वयस्कर व्यक्ती (आई)असलेल्या कुटुंबासाठी ?? भिती हि कि बहुतांश जनता IT वाले आणि DINK (डबल इन्कम नो किड्‌स) ३ शाळेव्यतिरिक्त इतर छंदवर्गाची उपलब्धता -- भेट देणार आहे पुढील महिन्यात पण त्यात फ्लॅट बघणे होईल. प्रत्यक्ष राहणाऱ्याकडुन / त्या भागातल्या जाणकारांकडुन कळावे हि अपेक्षा. --- धन्यवाद रिग पिग

प्रतिक्रिया द्या
13297 वाचन

💬 प्रतिसाद (75)
स
सतिश गावडे Mon, 07/06/2015 - 06:49 नवीन
८) नदीच्या चित्रावर जाऊ नका.. एव्हढी निळी नाहीये ती... :)
आजच्या घडीला ही नदी पुर्णपणे पान-वनस्पतींनी आच्छादलेली आहे. हिरवे हिरवे गार गालिचे पाण-वनस्पतींच्या मखमालीचे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
ज
जडभरत Mon, 07/06/2015 - 18:45 नवीन
हीः हीः हीः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चिनार Mon, 07/06/2015 - 07:49 नवीन
१) हे पुणे नाही, नदीपलीकडेच पि.चि. सुरू होते.. :)
माझ्या माहितीप्रमाणे हिंजवडीची वेगळी ग्रामपंचायत आहे. हिंजवडी पुण्यातही येत नाही आणि पिंपरी-चिंचवडमध्येही येत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
क
क्रेझी Mon, 07/06/2015 - 08:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
संग्राम Wed, 07/08/2015 - 15:18 नवीन
शाळा फक्त ब्लू रिजपुरती नाही पण प्रथम प्राधान्य ब्लू रिज मधील लोकांना आहे, >> रात्रभर लाईन लावून फार्म मिळतो आजकाल सोडत (लॉटरी) पद्धतीने प्रवेश देतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
र
रेवती Wed, 07/08/2015 - 16:10 नवीन
मग ज्या मुलांना तिथे प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी दुसरी चांगली शाळा जवळपास आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
स
संग्राम गुरुवार, 07/09/2015 - 08:38 नवीन
"ब्लू रिज" हिंजवडी फेज १ मध्ये आहे ... जवळपास "ट्री हाऊस", "पवार पब्लिक स्कूल" आणि थोडे दूर "इंदिरा", "अक्षरा इंटरनॅशनल", "युरो स्कूल", "माऊंट लिट्रा", "विझ्डम वल्ड स्कूल" इत्यादी शाळा आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 07/09/2015 - 14:35 नवीन
नावावरून तरी या शाळा पावरबाज दिसतायत. फ्ल्याटच्या किमतीपेक्षा जास्त पैशे मुलांच्या शिक्षणाला लागणार असं दिसतय. माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
क
कपिलमुनी गुरुवार, 07/09/2015 - 14:42 नवीन
नायतर आमच्या समर्थ विद्यालय , आदर्श विद्यालय नूतन मराठीला काय ग्लॅमर नाय बगा :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 07/09/2015 - 14:51 नवीन
अगदी हेच मनात आलं. देणगीदरांमुळे दिलेली वत्सलाबाई विद्यालय, आण्णासाहेब महाविद्यालय अशी नावे साधी वाटतात पण आईवडिलांना फी भरण्याचे टेन्शन कितपत असेल त्यावेळी? माझी दहावीच्या परिक्षेची फी ७० रुपये होती तर आई म्हणत होती की महागाई झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/09/2015 - 16:22 नवीन
त्यावेळेस, मेथीची जुडी आणि दूधाचा प्रति लिटर दर काय होता म्हणतो मी.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 07/09/2015 - 19:58 नवीन
ही ही ही. तेही आहेच की! पण आजकाल मेथी पेरून उगवेपर्यंत भाव वाढलेले असतात.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
प
प्रसाद१९७१ Mon, 07/06/2015 - 07:10 नवीन
तुम्ही जर बोटीवर असणार असाल आणि बायको/आई वडिल घरातच असणार असतील तर कोथरुड/बाणेर परीसरात जागा चांगल्या मिळतील. आणि माणसात रहातो आहोत असे वाटेल. ब्ल्यु रीज ला घरातुन सोसायटीच्या गेट पर्यंत चालत पोचायलाच १० मिनीटे लागतात. तुमच्या घरच्यांना आठवड्याची भाजी ( महीन्याचा किराणा ) एका दिवशी आणुन ठेवण्याची सवय आहे का? मी नक्की सांगतो, तुमचे आईवडीलांना नैराश्य येइल अश्या सोसायटीत रहायला जावुन. जुल्या बिल्डींग मधल्या खोल्या मोठ्या आहेत. नविन बिल्डींग मधे खुराडी आहेत.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 07/06/2015 - 07:35 नवीन
भाडे किती असेल? इंटरनेटवर २० हजारापासून ते ३६ हजारापर्यंत भाडे दाखवित आहे.
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 07/06/2015 - 07:53 नवीन
पुण्यात घर घेण्याआधी अस्मादिकांचा खालील लेख जरूर वाचवा http://www.misalpav.com/node/29925 प्रस्तुत लेख लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाला आहे. http://epaper.lokprabha.com/528943/Lokprabha/03-07-2015#dual/46/1
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 07/06/2015 - 08:11 नवीन
परांजपे पूर्वी मध्यमवर्गाला परवडतील अशी घरे बांधण्याबद्दल प्रसिद्ध होते.पण सध्याची परिस्थिती खूपच बदललेली दिसतेय. आसपसच कुमार बिल्डर्सचे बांधकाम चालु आहे असेही वाचले होते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 07/06/2015 - 09:42 नवीन
मै आल्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सूड Mon, 07/06/2015 - 13:28 नवीन
माई आहेत, मी एव्हाना वड्यांचं पीठ गिरणीत द्यायचा विचार करत होतो. ऐन श्राद्धाच्या दिवशी गडबड नको म्हणून!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
नाखु Mon, 07/06/2015 - 08:25 नवीन
मामो ऑन "अरे चिनार्‍या बराच लब्बाड आहेस की मासीकात लेख बि़ख छापून आले, तसे घर घ्यायचे म्हणजे खायची गोष्ट नाही असं आमचे हे श्री गुरुजी भावजींना म्हणताना ग्रेट्थिंकर्नी ऐकले असे हितेसभाई दादरकरला सांगत होता अशी कुजबुज कुमठेकर आणि सचिन मध्ये चालली होती असा आप्ला दमामीला वाटते खरे खोटे टक्याला माहीती असेल" मामो ऑफ
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 07/06/2015 - 08:43 नवीन
हा हा हा .. स्वत:चे लेख कुठल्यातरी हिंदुत्ववादी मासिकात छापून आणायचे आणि स्वत:चा व हिंदुत्वाचा उदो उदो करायचा. हिंदूंची ही जुनी खोड आहे ...! -- कुठला मोड ते सांगायची गरज नसेलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
D
dadadarekar Mon, 07/06/2015 - 09:34 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
उ
उगा काहितरीच Wed, 07/08/2015 - 17:44 नवीन
कुमठेकर आणि सचिन मध्ये चालली होती
सचीन होते ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ह
होबासराव Mon, 07/06/2015 - 12:04 नवीन
ते हितेस 'द'रेकर हायेत
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 07/06/2015 - 12:31 नवीन
रेकून र फार उडाला याची नोंद घ्यावी. पुढच्या वेळी प्रूफे तपासाओनच छापली जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
भ
भुमन्यु Mon, 07/06/2015 - 13:03 नवीन
डोंबिवलीत पलावा सिटीचा विचार करु शकता. २ बी. एच. के. ६० ते ७० लाखांपर्यन्त जातो. मेंटेनन्स साधारणतः ३००० आहे. गोल्फ क्लब मेंबरशिप ऑप्शनल आहे. महत्वाचे फ्लॅट घेणार असाल तर रिसेल घ्या. लोढा वेळेवर पझेशन देत नाही. (मी ब्रोकर नाही.) अजुन माहिती हवी असल्यास व्य. नि. करा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा