Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझं बाळ

प — पथिक, Tue, 07/07/2015 - 09:38
माझं बाळ अगदीच लहान आहे; अजून कड सुध्दा बदलता येत नाही त्याला. ठेवलं तिथे ते पडून राहतं. भूक लागली कि रडतं; पोट भरलं कि झोपतं, झोपून झालं कि त्याच्या अबोध नजरेने टुकुर टुकुर कुठेतरी बघत राहतं. आत्ता कुठे त्याला वस्तू आणि माणसं यांच्यातला फरक कळू लागला आहे. अगदीच अजाण आहे माझं बाळ. अगदीच निष्पाप. दुनियादारीचा, चांगल्या-वाईटाचा, कश्शाकशाचा त्याला गंध नाही. कशा प्रकारच्या जगात तो आलेला आहे हेही त्याला ठाऊक नाही. आणि या कोवळ्या मनाच्या कोऱ्या पानावर लिहिण्याची, त्याच्यावर संस्कार करण्याची, त्याचं बोट धरून त्याला योग्य वाटेने नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हि जाणीव झाली कि मन थरथरतं. त्या शूभ्र हृदयाला आपल्या मलीन हातांनी स्पर्श करायला संकोचतं. मनावर विकारांची पुटं चढलेला मी, चाचपडत धडपडत स्वत्तःच वाट शोधणारा मी त्या निष्पाप जीवाला काय मार्ग दाखवणार ? खरं तर मीच माझ्या बाळाच्या पायाशी बसून नव्याने जगणं शिकण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या
3728 वाचन

💬 प्रतिसाद (7)
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/07/2015 - 09:59 नवीन
मुद्दा पकड में नहीं आया है।
  • Log in or register to post comments
प
पथिक Tue, 07/07/2015 - 10:53 नवीन
काही मुद्दा नाहीच. मनात सहज आलं ते लिहिलं….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पद्मावति Tue, 07/07/2015 - 10:20 नवीन
सुरेख ....खूप आवडलि.
त्या शूभ्र हृदयाला आपल्या मलीन हातांनी स्पर्श करायला संकोचतं. मनावर विकारांची पुटं चढलेला मी, चाचपडत धडपडत स्वत्तःच वाट शोधणारा मी त्या निष्पाप जीवाला काय मार्ग दाखवणार ?
काय छान लिहिलय....मस्तं.
  • Log in or register to post comments
प
पथिक Tue, 07/07/2015 - 10:37 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
म
मदनबाण Tue, 07/07/2015 - 12:50 नवीन
आवडले... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 07/07/2015 - 13:06 नवीन
पथिकभौ, याला कविता का म्हणायची? स्फुट का नाही??????
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 07/08/2015 - 05:02 नवीन
खरं सांगायचं तर मला माहिती नाही. साहित्याच्या बाबतीत मी स्वतःच 'बाळ' आहे. :) कुठल्या लेखण प्रकारात हे प्रकाशित केले पाहिजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा