Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करशील ना?

र — रातराणी, Tue, 07/07/2015 - 23:01
हातात हात घेऊन चालताना, रुतेल पायात काटा, घाई घाईने काढलास तरी चालेल, पण नंतर हळुवार मारशील ना फुंकर? नव्याची नवलाई संपत असताना, होतील असंख्य प्रश्न उभे, प्रत्येकाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण नंतर हळुवार घेशील ना कुशीत? अस्तित्वाच्या कल्पना कोलमडून जाताना, जड होईल अपेक्षाच ओझ, प्रत्येकवेळी वाटून घेतलं नाहीस तरी चालेल, पण नंतर हळुवार मन करशील ना हलक? तुला माझी माझी तुला सोबत असताना, येईल एकटेपण आगंतुकासारख, प्रत्येकवेळी डोळ्यांनी शोधलं नाहीस तरी चालेल, पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत?

प्रतिक्रिया द्या
8339 वाचन

💬 प्रतिसाद (53)
य
यशोधरा Tue, 07/07/2015 - 23:05 नवीन
छान..
  • Log in or register to post comments
स
सटक Tue, 07/07/2015 - 23:19 नवीन
पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत? सुन्दर!!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 07/08/2015 - 07:39 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 07/08/2015 - 08:33 नवीन
एक मस्त मांसाहारी विडंबन डोक्यात आकार घेत आहे =))
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 07/08/2015 - 08:46 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 08:46 नवीन
होऊन जौ द्या : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दमामि Wed, 07/08/2015 - 08:49 नवीन
फकस्त काही शब्द काढून टाकले की। झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
ट
टवाळ कार्टा Wed, 07/08/2015 - 08:55 नवीन
तेच कर्तोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 08:59 नवीन
कसं काय जमत बॉ आपल्याच प्रतिसादाना प्रतिसाद द्यायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 07/08/2015 - 09:35 नवीन
खिक्क....मांसाहारी विडंबन तयार आहे...इच्छूकांनी व्यनी करावा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 09:39 नवीन
व्यनि करणे प्लीज़!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Wed, 07/08/2015 - 09:51 नवीन
मला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
द
दमामि Wed, 07/08/2015 - 09:51 नवीन
मला सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 09:52 नवीन
टका म्हणे छान चाललाय संवाद, आपला व्यनिवाद, आपणासी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/09/2015 - 16:17 नवीन
व्यनि करावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Wed, 07/08/2015 - 08:50 नवीन
मन वढाय वढाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मदनबाण Wed, 07/08/2015 - 08:46 नवीन
एक मस्त मांसाहारी विडंबन डोक्यात आकार घेत आहे =) हॅहॅहॅ... टाक हो ते विडंबन... संम नी उडवले नाही तर वाचता येउल हो आम्हाला ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 07/08/2015 - 08:47 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Wed, 07/08/2015 - 08:59 नवीन
अश्लील शिर्षक... ;)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 09:05 नवीन
_/\_ आधी लक्षातच नव्हतं आलं ; ) आता करशील ना म्हणणार नाही कधीच ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
प
प्यारे१ Wed, 07/08/2015 - 09:20 नवीन
अश्लीलता डोक्यात असते. आमचे लाडके संपादक मित्र किसनदेवांची लाडकी 'शब्दांना नसतो अर्थ' वाचावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 09:26 नवीन
लाडके आणि संपादक मित्र एका वाक्यात? वाचायलाच पाहिजे ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 07/08/2015 - 09:30 नवीन
भावनाओंको 'सटली' समझिए मोहतरमा!~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 09:35 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 09:27 नवीन
आँ????? डुआयडी अलर्ट? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
द
दमामि Wed, 07/08/2015 - 09:52 नवीन
+1111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Wed, 07/08/2015 - 09:22 नवीन
चांगलीय !!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 09:27 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 07/08/2015 - 09:34 नवीन
माफ करा पण लय मिसिंग आहे. मात्रा चुकल्या सारख्या वाटतात. काही शब्द काही ठिकाणी जास्त वाटतात.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 09:37 नवीन
धन्यवाद! सुधारण्याचा प्रयत्न करेन : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 09:40 नवीन
(ते सगळं दुरुस्त) करशील ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 09:45 नवीन
हा हा माईक्रो मॅनेजिंगपणा आहे बॅटमॅन ! ( चाल नेहमीची हा हलकटपणा आहे माने! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 09:48 नवीन
माईक्रो मॅनेजिंगपणा
ओह माय ग्वाड (& तिखट), इथे माई कुठून आल्या? त्यांनी कावळादेखील पाळलाय हे नव्यानंच कळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 09:58 नवीन
माई सर्वव्यापी आहेत मूढ बालका. <माई मोड ऑन> अरे आमच्या ह्यांना भारी कुतूहल हो कावळ्याच. हुशार पक्षी आहे म्हणतात. म्हणून पाळला. उकाच्या बोक्याने खाल्ला हो पण. दुष्ट मेला. कावळा नाही रे बोका बोका. <माई मोड ऑफ>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 10:00 नवीन
अर्र्र ते माई मोड ऑन/ऑफ दिसत नाय. समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
ब
बॅटमॅन Wed, 07/08/2015 - 10:46 नवीन
हा हा हा =)) रातस्वप्नराणी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 20:32 नवीन
नशीब रातस्वप्नराणीमाई नाही म्हणालात. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 08:32 नवीन
माईंची सर/मॅडम कुणालाच येणार नाय हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी गुरुवार, 07/09/2015 - 08:40 नवीन
धन्यवाद. दूध आणि पाणी राजहंसच वेगळं करू जाणे. ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 08:50 नवीन
अंगावर मूठभर मसल्स चढले हे ऐकून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी गुरुवार, 07/09/2015 - 08:58 नवीन
घ्या मी काही बोलले राजहंस कोण ते? निरर्थक आत्मकांडाचा भ्रमवाद वगैरे वगैरे. छ्या गुर्जीना मंत्र नीट विचारला पायजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 09:02 नवीन
=)) हे कोण बोलले बोला राजहंस येथे निजला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/09/2015 - 15:34 नवीन
@ छ्या गुर्जीना मंत्र नीट विचारला पायजे.>> ख्याक्क! आमच्यापेक्षा बाकिच्यांनाच आता आमचे मंत्र इथे पाठ झालेले आहेत. ;-) अत्ता सूड घेइल बघा कुणीतरी लग्गेच! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
ए
एक एकटा एकटाच Wed, 07/08/2015 - 15:17 नवीन
मस्तच!!!!!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/08/2015 - 20:49 नवीन
कविता आवडली पण शीर्षक वाचून दचकले.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 20:59 नवीन
हो ग ताई : ) शीर्षकासाठी फार विचार नाही केला नाही. नाऊ इट्स टू लेट : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 07/08/2015 - 21:05 नवीन
असू दे, असू दे! आपण पुढच्या कवितेचं नाव चांगलसं ठेवू, बिफोर इट्स टू लेट हं. :) माझी बाय ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी गुरुवार, 07/09/2015 - 08:36 नवीन
हो..हो डोहाळे लागले की कळवतें हं ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यसवायजी गुरुवार, 07/09/2015 - 18:36 नवीन
डोहाळे लागले की कळवतें हं तयारी चालू करा लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
प
प्यारे१ गुरुवार, 07/09/2015 - 16:46 नवीन
'करशील ना?' हा वत्सल प्रश्न नेहमीच माऊलींच्या डोक्यात फेर धरून असतो. बाळाला जेवू घालून आई जेवायला बसायला सुरुवात करतानाच, आssssई शीsssss असा आवाज येतो आणि धावपळ करत आई उठून योग्य जागी योग्य पोजीशन ला बाळाला बसवून वरील वत्सल प्रश्न विचारते. -अर्धशतकासाठी पाणी टाकलेला ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा