Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)

म
माहितगार
Wed, 07/08/2015 - 14:09
🗣 63 प्रतिसाद
सध्या कलर्स नावाच्या दूरचित्रवाणीवर चक्रवर्ती अशोक सम्राट (टेक्स्ट अपडेट) नावाची धारावाहीक मालीका चालू आहे. (मी स्वतः दूरचित्रवाणी मालीकांचा फारसा पंखा नाही तरीही गेल्या चार एक महिन्यांपासून हि मालीका पाहतो आहे). मालीकेत कुमार वयातील अशोक एका चतुर आणि गुणी युवकाच्या रुपात उभा केला गेला आहे कुमार अशोकची आई सुद्धा जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आदर्श माता दाखवली आहे. आचार्य चाणक्य मगध साम्राज्याचे पितामह आणि सशक्त मार्गदर्शक स्वरूपात दाखवले आहेत. सध्या पाटलीपुत्र (पाटना) नगरीत अशोकाचे पिता बिंदुसार आणि राजघराण्यास कुमार अशोक एका मोठ्या कटकारस्थानातून वाचवतो आणि ते कटकारस्थान उघडकीस येण्याचे प्रसंग सध्या दाखवले जात आहेत. एकुण प्रसंगाचे सादरीकरण रोचक आहे. सम्राट बिंदुसारची त्याची पत्नी धर्मा आणि कुमार अशोक यांच्या पासून ताटातूट झालेली होती पण राजघराण्यातील कट कारस्थानांमुळे आचार्य चाणक्यांनी सम्राट बिंदुसारना कुमार अशोक त्यांचा मुलगा आहे हे अद्याप (हे लिही पर्यंत) सांगीतलेले नाही आणि राणी धर्मा बाकी राजघराण्यास न सांगता दासीरुपात पण सम्राट बिंदुसारला न दिसता वावरते आहे अशी काहीशी (मालीकेतील) कथा आहे. कुणा एका मराठी दिग्दर्शकाच वाक्य आहे व्हीलनला जेवढे जास्त व्हीलन केले दाखवले तेवढे हिरो अधिक हिरो वाटतो. तर या मालीकेत बाहेरचे दोन तीन (मांडलीक) राजे व्हीलनच्या स्वरूपात दाखवले आहेत. बिंदुसारची सावत्र आई हेलना ग्रीक राजा सेल्यूकल निकेटरची मुलगी आहे जीने युद्धात वडीलांचा पराभव झाल्यामुळे चंद्रगुप्ताशी विवाह केला, वरून मगधवर प्रेम करणारी पण प्रत्यक्षात कटकारस्थानांनी मगध साम्राज्याचा नाश करून आपला पुत्र जस्टीनला सिंहासनावर बसवून राजमाता होण्याचे तिचे स्वप्न कुमार अशोक आणि आचार्य चाणक्य यांच्यामुळे धुळीस मिळते. बिंदुसारचा पहिला मुलगा सुशीम हा सुद्धा अहंकारी व्हिलन स्वरूपात कुमार अशोकवर उगाचच सतत खार खाऊन असतो आणि त्याच्या आईचे (बिंदुसारच्या महाराणीचे) स्वप्नही राजमाता व्हायचे आहे. सम्राट बिंदुसारची एकराणी शुभरसी चांगल्या स्वभावाची दाखवलेली आहे जीच्याकडे अशोकची आई दासी स्वरूपात लपून राहते आहे. सम्राट बिंदुसारची तीसरी राणी नूरसुद्धा तिच्या मुलाला सम्राट स्वरूपात पाहू इच्छिते. राणी नूरचे चरित्र मात्र ती पत्नी बिंदुसारची असली तरीही प्रत्यक्षात ती बिंदूसारचा मोठा भाऊ जस्टीनवर प्रेमही करते आणि नूरचा मुलगा खरेतर जस्टीन पासून झालेला असतो (इति कलर्स मालीका-लेखकाचे स्वांतत्र्य - बहुधा नकारात्मक गोष्टींच्या अनुभवातून अशोक दुख्खाचे कारण शोधत अशोक पुढे बौद्ध धर्म स्विकारणार आहे त्या दृष्टीने अशोकच्या जिवनातील वेगवेगळ्या प्रसंगांची रचना करण्याचा लेखकाचा प्रयत्न होता का कि केवळ धारावाहीकात मसाला भरणे हे मालिकेत पुढे काय होते यावरून कळेल) बिंदुसार, त्याची ग्रीक वंशीय आई हेलेना, त्याचा सावत्र सासरा सेल्यूकस निकेटर, मुलगा सुशीम, आचार्य चाणक्याचा शिष्य राधागूप्त, अशोकची आई धर्मा हि नावे अशोकाच्या आईचे राजवाड्यापासून बराच काळ दूर असणे या आता पर्यंतच्या सम्राट अशोकाच्या बाबतीत माहित आहे असे समजल्या जाणार्‍या गोष्टी मालीकेत जशाच्या तशा आहेत पण बाकीचे दाखवलेले प्रसंग अत्यंत काल्पनीक आणि लेखकाने लेखनाचे प्रचंड स्वातंत्र्य घेतले आहे. योगा योगाने मालिकेच्या लेखकाचेही नाव अशोक बनकर आहे पण ते बहुधा योगा योगा योगानेच. इंग्रजी विकिपीडियावरील माहितीनुसार अशोक बनकरांचे पालनपोषण मॅटर्नल अँग्लोइंडीयन बाजूने झाले आहे. आणि ते इंग्रजी भाषिक लेखक म्हणूनही परिचीत आहेत तेव्हा त्यांची ही मालीका इंग्रजीत अनुवादीत होऊन बाकी जगभर प्रसिद्धी मिळवू शकली तर नवल असणार नाही. कलर्स आणि अशोक बनकर टिमने मिळून मालिकेत दर्शवलेला इतिहास हा नव्याने लिहीलेला आहे. तो बराचसा पॉलीटीकली करेक्ट लिहिण्याचा प्रयास त्यांचा यशस्वी होताना दिसतो. तो काळाच्या ओघात मिथॉलॉजी म्हणून नजीकच्या भविष्यात जनमान्यता मिळाल्यास आश्चर्य वाटावयास नको. खर्‍या व्यक्ती नामांच्या जवळ जाऊन सुद्धा बहुतांश काल्पनीक आहेत. नकारात्मक प्रसंग इतपत चातुर्याने रंगवले आहेत की सहसा लेखकाच्या स्वातंत्र्यावर सर्वसामान्य जनतेतून फारसे आक्षेप येणार नाहीत उलट लोकप्रीयताच लाभण्याची शक्यता अधीक आहे. या कलर्स मालिकेत मालिका प्रसंग काल्पनीक आहेत हे कुठे सांगीतले जात नाहीत. धागालेख चर्चेसाठी माझा मुद्दा लेखक आणि दिग्दर्शकांनी काल्पनीक प्रसंग रंगवण्याच्या स्वातंत्र्यावर नाही. पण कोणत्यातरी एका स्टेजला हे सर्व काल्पनीक प्रसंग आहेत हे लेखक आणि दिग्दर्शकांनी सांगावयास हवेत असे तुम्हाला वाटते का? या मालिकेतील मुख्य पात्रे सकारात्मक भूमीकेतच नव्हे अत्यंत आदर्श रंगवली आहेत की त्यांच्या लोकप्रीयतेत भरच पडेल. लेखकाने कल्पनेतून रंगवलेल्या मिथॉलॉजीचा समाजावर ती मिथॉलॉजी खरीच आहे समजून किती प्रभाव पडावा ? बाकीही या मालिके संदर्भाने चर्चा करण्यास हरकत नाही जसे की या मालिकेत दाखवलेल्या पात्रांबाबत आणि प्रसंगांबाबत तुम्हाला काय वाटते. सम्राट अशोकाचा ज्ञात प्रमाण अथवा आख्यायिकातील इतिहास आणि मालिकेतील इतिहास यांची तुलना इत्यादी. अर्थात काथ्याकुट करताना व्यक्तीगत टिका टाळाव्यात मिपा संपादकीय धोरणांचे यथोचीत पालन करावे हि नम्र विनंती
वर्गीकरण
धारावाहीक
इतिहास
साहित्य

प्रतिक्रिया द्या
18787 वाचन

💬 प्रतिसाद (63)
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 17:23 नवीन
हा हा हा, अगदी अगदी =)) =)) =)) एकूण मज्जाच मज्जा आहे सगळी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 07/09/2015 - 13:42 नवीन
हर्क्युलिस = हरी + कुल + ईश :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 14:04 नवीन
टवाळ ओक =)) जमलंय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/10/2015 - 05:41 नवीन
च्यामारी सुटलेयत सगळे नुसते .... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी गुरुवार, 07/09/2015 - 12:12 नवीन
यात भर म्हणून बरेचजण चर्चेमध्ये स्वामी, पानिपत, किंवा बेलवलकर यांच्या कादंबरीमधले दाखले देत असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/09/2015 - 12:52 नवीन
वरती बॅट्याने हॅरी पॉटरचा प्रतिसाद दिलाय याचबद्दल. पण बर्‍याच लोकांचा दावा असतो की हे मान्यवर लेखक, मालिका/चित्रपट निर्माते हे अभ्यास करुनच हे सगळे करत असणार (पक्षी:ते काय येडे हायत होय असं काही बाही लिहायला/दाखवायला). हे अजूनच डोक्यात जातं. स्वामी, श्रीमान योगी आणि पानिपताचा पगडा तर अतिशय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 12:58 नवीन
पण बर्‍याच लोकांचा दावा असतो की हे मान्यवर लेखक, मालिका/चित्रपट निर्माते हे अभ्यास करुनच हे सगळे करत असणार (पक्षी:ते काय येडे हायत होय असं काही बाही लिहायला/दाखवायला). हे अजूनच डोक्यात जातं.
हाथ मिलाओ, सेम हिअर. लैच डोक्यात जातं. याला उत्तर इतकंच की हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ द रिंग्स हेही तुफान अभ्यासानिशीच लिहिलेले आहेत. तुफान अभ्यास म्हणजे सत्य असे आजिबात जरूरी नाही. पण हे कुणाला, तर मेंदू थोडातरी शिल्लक असलेल्याला. नायतर शीर्यस चर्चेत "बघा बघा, खरा पुरावा पु ना ओकांच्या पुस्तकात दिलाय" म्हणून परम श्रद्धेने अर्ग्यू करणार्‍यांपुढे काहीच मात्रा चालत नाही. त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/09/2015 - 15:18 नवीन
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)
हा हा हा.. हे शिकायला हवंय खरंतर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/09/2015 - 18:36 नवीन
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;) अशी एक धुमश्चक्री बघायची आस आहे ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
योगी९०० गुरुवार, 07/09/2015 - 12:36 नवीन
जबरा प्रतिसाद... बाकी लोणीमॅन म्हणजे काय? बॅटमॅनचा भाऊ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 12:54 नवीन
हाहा, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
माहितगार गुरुवार, 07/09/2015 - 14:19 नवीन
सम्राट अशोकाच्या आख्यायीकेत आणि या मालिकेत सत्तेसाठीच्या साठमारीचे भावाभावातील संघर्ष वेगळ्या पद्धतीने रंगवले आहेत. या मालिकेतून सत्तेसाठीच्या राजकीय तडजोडींसाठी विवाह आणि अशा राजकीय कारणांनी झालेल्या विवाहातून झालेल्या संततीत भावी सत्तेचा अंकुरपाहून इर्षा बाळगणारे हितसंबंध भावाभावातील संघर्षांना कसे कारणीभूत होऊ शकतात याचे रोचक दर्शन होते आहे. सत्तेसाठी इतिहासातील भावांची साठमारी या विषयावर एनी कॉमेंट्स ?
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 07/22/2015 - 14:03 नवीन
माहितगार यांचा हा लेख वाचून तुनळीवर या मालिकेचे सगळे भाग पाहिले. मालिकेला सर्व प्रकारचा प्रेक्षकवर्ग मिळवण्यासाठी यथायोग्य मसाला भरलेला असल्नेया ती इतिहासापासून भरकटलेली वाटत असली तरी एकंदर खिळवून ठेवणारी आहे. ही मालिका म्हणजे इतिहासाचा आधार घेवून निर्मिलेली एक काल्पनिक नाटीका आहे आहे हे एकदा मान्य केले की त्यातल्या 'मसाला' नसलेल्या बर्‍याच गोष्टी विचार करण्यायोग्य वाटतात. उदा. वर माहितगार यांनी उल्लेखलेला मुद्दा: "या मालिकेतून सत्तेसाठीच्या राजकीय तडजोडींसाठी विवाह आणि अशा राजकीय कारणांनी झालेल्या विवाहातून झालेल्या संततीत भावी सत्तेचा अंकुरपाहून इर्षा बाळगणारे हितसंबंध भावाभावातील संघर्षांना कसे कारणीभूत होऊ शकतात याचे रोचक दर्शन होते आहे."
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा