Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?

स
संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 16:58
🗣 160 प्रतिसाद
मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे. दुवा १ दुवा २ दुवा ३ वय वर्ष पाच ते पंधराच्या मुलांना दोन दिवसीय शिबीरामधे ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते. ही मुले चमत्कार झाल्यासारखी अचानक डोळे बांधून रंग, आकडे, अक्षरं, वस्तू, आकार ओळखायला लागतात. ह्यामुळे मुलांच्या संवेदनाक्षमता वाढतात, कल्पनाशक्ती वाढते असं म्हटलं जातं. पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर अचूक सांगतात, अगदी पलिकडल्या खोलीत काय चाललंय तेही (हे जरा विचित्र आहे, नाही का?) दरवाजावर बेल कोण मारतंय तेही. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते. मुलं मार्क्स अधिक मिळवायला लागतात असा ह्या लोकांचा दावा आहे. याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे. धमाल म्हणजे हे प्रात्यक्षिक मी स्वतः उपस्थित राहून बघितलंय. नाशिकमधे माझं जिथे ऑफीस होतं, त्याच्या मालकाने स्वतःच ह्याची फ्रँचायजी घेतली आहे. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असल्या हरकती ही छोटी छोटी पोरं करतात. हे सगळं थोतांड आहे की काय असं कदाचित वाटूही शकेल. प्रात्यक्षिक दाखवणारे सगळं नाटक वठवत असतील असंही तुम्हाला वाटेल. पण... एका चुकार क्षणी मी अगदी बुचकळ्यात पडलो. प्रात्य़क्षिकासाठी उभ्या असलेल्या ४ मुलांना त्यांचे 'ते' सर काय काय सूचना करत होते. चेंडूचा रंग ओळख, माझ्या हातात काय वस्तू आहे ओळख, एखाद्या माणसाचा पाठलाग करून दाखव. आणि हे सर्व डोळे गच्च बंद करून. अशाच घाईघाईत चाललेल्या सूचनांमधे एका १३ वर्षांच्या मुलीला काहीतरी वस्तू द्यायला कुणा प्रेक्षकाला सांगितले, तो प्रेक्षक मी नव्हतो. पण मी पुढच्याच रांगेत असल्याने पुढच्या प्रात्यक्षिकासाठी मी सहज नोट काढायला माझे पाकिट बाहेर काढले. पुढच्या सेकंदाला ती पोरगी बोलली - ब्राऊन कलरचं वॅलेट. आणि मी धक्का बसून ते वॅलेट तसंच धरून बसलो. च्यायला ह्या पोरीला हे ५ फुटांवरचं वॅलेट कसं दिसलं? तीच्या डोळ्यांचा अँगल आणि माझ्या पाकीटाचा अँगल यात कितीही चोरून पाहिलं तरी ते दिसेल अशी काहीच शक्यता नव्हती. परत ते वॅलेट सोकॉल्ड अ‍ॅक्टमधे अजिबात समाविष्ट नव्हतं. मी ते काढणार आहे हे फक्त मलाच माहिती होते. आणि तीने ते शब्द उच्चारले ते फक्त मीच ऐकले कारण खूप आवाज आणि गोंधळ सूरू होता वेगवेगळ्या सूचनांचा. त्याच अ‍ॅक्टीवेशन फ्रँचायजीवाल्याने एका शाळेत या मुलांचं प्रात्यक्षिक दिले. त्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना आव्हान दिले की आमच्या खेळाच्या मैदानात काय चाललंय हे ही मुलगी सांगू शकेल का. तर म्हणे त्या मुलीने मैदानात काय चाल्लंय ते तर सांगितलंच वर मैदानाच्या बाहेरून जाणार्‍या रस्त्यावरच्या एका माणसाचा पेहरावही अचूक सांगितला. (अंतर ५०० मिटर्स) हे सगळं डोळे बांधून. झालंना, मुख्याध्यापक फ्लॅट आणि त्याला त्या विंटरनॅशनल शाळेची अधिकॄत एजंसी म्हणून मान्यता मिळाली. नंतर नेटवर वाचलं तर हे सगळं थोतांड आहे, ती मुलं लपून पाहतात, तिरके डोळे करून पाहतात असं काहीसं विरोधी मत आढळलं. अजुन बरंच काय काय. कुणाला याची योग्य वैज्ञानिक बाजू माहिती आहे का? अंनिस व बालमानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? कुणाच्या मुलांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का? (ढिस्क्लेमरः ही कुठल्याही तर्‍हेने मिड-ब्रेनवाल्यांची जाहिरात नसून माझ्या अनुभवापरांतही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. वाचकांनी आपआपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. या विषयावर सर्व बाजूने उचित चर्चा व्हावी. )
वर्गीकरण
जीवनमान अनुभव
शिक्षण

प्रतिक्रिया द्या
42699 वाचन

💬 प्रतिसाद (160)
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2015 - 17:03 नवीन
मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे १००% सत्य आहे . मी बोटीवर होतो तेव्हा मी माझा मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्ह केला होता आणि मी मिपा चे सदस्यत्व घेतले =))
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 07/08/2015 - 17:38 नवीन
३ (+३) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/09/2015 - 10:52 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विवेकपटाईत Fri, 07/17/2015 - 15:59 नवीन
आमची सौ. म्हणते तुमचे डोके कामातून गेले म्हणून संध्याकाळी आल्यापासून कामधाम सोडून मिपावर ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
स्रुजा Wed, 07/08/2015 - 17:20 नवीन
मला तरी हे थोडं संशयास्पद वाटतंय. २ दिवसात हा वर्क्शॉप संपतो म्हणुन जास्त च वाटतंय. बरं डोळे बंद करुन वॉलेट चा रंग का ओळखायचा? ५ वर्षां पुढची मुलं तसं ही कलर्स ओळखतात च की. एकाग्रता वाढवण्यासाठी वगैरे एक्सरसाईझेस असतात पण सातत्य लागतंच त्यात. हळु हळु सवयी लावणं, अस्थिर स्वभाव असेल तर त्याला थोडं स्थैर्य देणं वगैरे त्यात अभिप्रेत असतं. आणि आता लहान मुलं जात्याच हुशार अस्तात. कुणाचं ग्रास्पिंग चांगलं असतं, कुणाला खेळात रस असतो , कुणाला अजुन कशात आणि पालक सुद्धा इतके जागरुक पणे लक्ष देतात की साधारण २ र्‍या , ३र्‍या वर्षापर्यंत मुलांचे हे कल लगेच कळतात. आणि त्यांचं कौतुक पण सगळीकडुन होत असत, त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकद रॅट रेस मध्ये उतरले की मग या दुव्यांमध्ये लिह्लंय तसं परिक्षेतले मार्क्स आणि मेडिकल मधलं यश वगैरे मधुन हे असले प्रकार जनमाला येत असावेत आणि त्यांना लोकप्रियता पण म्हणुन च मिळत असणार.
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Wed, 07/08/2015 - 17:24 नवीन
प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या मामाचा दहा वर्षाचा मुलाने डोळे बंद करुन (मी स्वतः verify केलं डोळे नक्की बंद आहेत ना?) माझ्याकडच्या नोटेवरचा नंबर अचुक सांगितला. मी मोबाईल वरुन डायल केलेला नंबर (कीटोन अक्टिवेटेड असताना) फक्त आवाजावरुन अचुक ओळखला. फळे आणी ईतर पदार्थांचे रंग स्पर्श न करता ओळखले. मामांना याबद्दल विचारले असता कुठल्यातरी शिबीरात शिकल्याचे सांगितले. तसेच आपण मुलाला प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास आग्रह करीत नाही असेही म्हणाले, कारण त्याची इच्छा/मुड नसताना तसे करावयास लावले तर त्याला ते जमत नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 07/08/2015 - 17:39 नवीन
असं धरून चला कमालीचं अॅक्टिवेशन येतय पंचवीस हजारात.---- ---लगेच एक नवीन ओएस लिहून घ्या मुलांच्याकडून.
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 07/08/2015 - 17:43 नवीन
ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते
हे ध्वनी व ब्रेन जिम व्यायाम टाँरंटवरही उपलब्ध्द आहे का ?
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 18:28 नवीन
भौ ही खरी शंका! चेक करायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
व
वडाप Wed, 07/08/2015 - 17:56 नवीन
फरंट आणि ब्याकचं अलाइनमेंट करायचे किती घेत्यात ?प्वारीला डाकतर कह्रायचं हाइ.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/08/2015 - 18:40 नवीन
**च्या गावात! एव्हढेच म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस Wed, 07/08/2015 - 18:48 नवीन
थो तां ड
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/08/2015 - 19:00 नवीन
डोळ्यांवर पट्टी बांधून अनेक जादूगार मंडळी भर रस्त्यातून बाईक चालवणे व अनेक प्रकार करतात, त्यापैकी काही प्रकार वाटतो. इथे जो व्हिडियो दिला आहे, त्यातील मुलीला कागद, नोट वगैरे समोर धरावे लागत असताना दिसते, त्याअर्थी तिला पट्टीतून दिसत असणार असे वाटते. मी स्वतः लहानपणी जादूचे खेळ करायचो, त्यात अगदी अशक्य वाटणार्‍या करामतींच्या मागे अगदी सोपी युक्ती असायची, पण जोवर ती ठाउक नाही, तोवर चमत्कार वाटायचा. अश्या एकाद्या युक्तीचा पैका कमावण्यासाठी रचलेला हा बनाव वाटतो. कुणाच्या परिचयात कोणी जादूचे खेळ करणारा असेल, तर तो बरोबर सांगू शकतो. एक शक्यता संमोहनाची पण वाटते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 07/08/2015 - 19:09 नवीन
मला थोतांड वाटते कारण असे काही असते तर पप्पू विपश्यनेसाठी थायलंड ऐवजी इथेच नस्ता का थांबला
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/08/2015 - 19:10 नवीन
मुलीच्या डोळ्यांवर विशिष्ट प्रकारची जी पट्टी बांधलेली आहे, त्यात लहानसा स्पीकर/हेडफोन/ असून त्याद्वारे कोणीतरी तिला माहिती पुरवत असेल. लास वेगासच्या मोठमोठ्या जुगारी अड्ड्यातून अश्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात, याबद्दल मोठा कार्यक्रम मागे कोणत्यातरी च्यानेलावर बघितला होता. कोण केंव्हा किती पैसे जिंकतो/हरतो, यावर कसिनोवाल्यांचा पूर्ण ताबा असतो, आणि हे काम अत्याधुनिक तंत्राद्वारे वरील मजल्यावर बसलेले अनेक तंत्रज्ञ करत असतात, असे दाखवले होते. समोरील विमान वा बस, हत्ती इ. वस्तू क्षणार्धात दिसेनाश्या करणे वगैरे करामती या तंत्राने करता येतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/08/2015 - 20:04 नवीन
कोठे गेले श्याम मानव आणि अंनिसवाले?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 07/09/2015 - 19:55 नवीन
त्या गोळ्या घालून मारलेल्या दाभोलकरांबद्दल विचारताय का तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीरंग_जोशी Wed, 07/08/2015 - 20:29 नवीन
दोन अडीच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी वॄत्तपत्रांत एक बातमी वाचली होती. छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात इस्राइलहून आलेल्या काही तांत्रिकांनी एकाग्रतेच्या जोरावर काही करामती करून दाखवल्या. जसे धातूचा चमचा हात न लावता केवळ बघत राहून वाकवणे. भुजबळांनी (कशाचा तरी आडोसा करून) कागदावर काय लिहिले असेल ते वाचून दाखवणे. ती बातमी आता शोधताना मिळत नाहीये कारण भुजबळांचा उल्लेख हजारो बातम्यांमध्ये असतो. दीड वर्षांपूर्वी जादूगार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम आमच्या मंडळाने ठेवला होता. अगोदरच्या दिवशी त्यांनी काही साधे प्रयोग आम्हाला दाखवले होते व काहींमध्ये कशी हातचलाखी केली जाते तेही दाखवले होते. धाग्यात उल्लेखलेल्या प्रयोगांच्या मागेही काही हातचलाखीच असणार हे नक्कीच.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 07/08/2015 - 21:37 नवीन
हम्म..इंटरेस्टिंग. मिड राहू द्या आमचा कुठलातरी मेंदू चालू करून दाखवा हे चॅलेंज घेतील का? : )
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Wed, 07/08/2015 - 22:15 नवीन
मी सुधा हा प्रकार पाह्यला आहें . पण वर वर्णिलेले प्रकार सोडले तर या मुलांची बाकी विषयात काही नेत्रदीपक प्रगति दिसलेली नाही कदाचित अजुन काही काळ जावा लागेल नेटवर शोधले असता दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या ।या विषयातील जाणकाराणी मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/09/2015 - 01:17 नवीन
तो dynamo नावाचा जादुगार कमालीच्या जादु ( पाण्यावर चालणे,हवेत उडणे ,कारंज्यातील पाण्याचा बर्फ करणे ,कागदाची फुलपाखरे जिवंत करणे इत्यादी ) करतो रस्त्यातच तरी यास मनोरंजन म्हणतो.हिच माणूस भारतात असता तर ? काशीला येऊन गंगेत असंख्य दिवे लावले पण तिकडच्या राख फासून बसलेल्या साधुंनी ढिम्म आश्चर्य दाखवले नाही.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/09/2015 - 03:38 नवीन
Dynamo चा शो जर टीव्ही वर असेल आणि मी तिथे असेन तर तो शो फाट्यावर मारतो. जादु/ हातचलाखी बघण्यात जी मजा आहे ती त्यामागच्या ट्रिक्स समजुन घेण्यामधे नाही. एक प्रेक्षक म्हणुन मला जादुच्या रेसिपीपेक्षा तिची मजा चाखण्यामधे जास्त रस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 18:53 नवीन
भौ बरोबर हाय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
य
यसवायजी Sun, 07/12/2015 - 08:27 नवीन
का नाही? जादूचे प्रकार फारसे बदलत नाहीत. तेच कुठूनतरी काहीतरी बाहेर काढणे, पत्त्याचे खेळ वगैरे. किती वर्षं तेच तेच बघायचं? डोकं चालवून बघितलं, नाहीच जमत. मग आता ट्रिक बघतो. - शाळेत असताना एकदा अं.नि.चा एक शो पाहिला होता. तेंव्हापासून "मॅजिक रिव्हील्ड" पहायला आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कंजूस गुरुवार, 07/09/2015 - 04:27 नवीन
"जादु/ हातचलाखी बघण्यात जी मजा आहे ती त्यामागच्या ट्रिक्स समजुन घेण्यामधे नाही. ""-ट्रिक्स नाही समजावत तो.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 07/09/2015 - 08:12 नवीन
हा प्रकार कर्णपिशाच्च किंवा टेलीपथीचाही असू शकतो . जादु/ हातचलाखी यांवर आधारीत ख्रिस्तोफर नोलनचा 'द प्रेस्टीज ' हा चित्रपट मस्त आहे .
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/09/2015 - 08:24 नवीन
याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.
वॉव.. कशी मिळते याची फ्रँचाईजी? बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता. तिथे मिसळ उत्तम मिळत असल्याने जात असे. तिथेही मिसळ खाण्यात काहीतरी सायंटिफिक आहे असं म्हणत "मिसळ खाण्याच्या अनुभवा"विषयी काही शास्त्रीय किचकट प्रश्न असलेला फॉर्म भरुन घेत होते. आत मेंदूच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि वेगवेगळ्या सीझन्समधे त्याचे वेगवेगळे भाग कसे अ‍ॅक्टिव्हेट होतात यासम काहीतरी होतं. आहे आहे.. हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 07/09/2015 - 11:00 नवीन
बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता.
तो पंथ होता का? शाळेत असताना त्यांचे लोक अधून मधून यायचे आणि कसल्या कसल्या मेंदुच्या आकृत्या असलेली पुस्तके विकायचे. तेव्हा ते सारे खरेही वाटायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मनो Sat, 07/11/2015 - 18:23 नवीन
मनशक्ती असं काहीतरी नाव होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/09/2015 - 11:22 नवीन
हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!
हे सगळं मोठ्ठं सायन्स का असतं आणि विज्ञान का नसतं असा प्रश्न मला नेहमीच सतावतो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
त
तुडतुडी गुरुवार, 07/09/2015 - 09:03 नवीन
हे फक्त लहान मुलांच्याच बाबतीत का ? मोठ्या माणसांच्या बाबतीत का नाही ? आणि ह्याची जाहिरात करण्यासाठी वापरलेली मुले त्यांचीच अस्तिल. त्यांना शिकवल्याप्रमाणे ते करून दाखवत अस्तिल. किवा डोळ्यावर बांधलेली ती पट्टी पारदर्शक असेल . आत मध्ये छोटा कॅमेरा , हेड फोन लपवलेला असू शकतो
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 18:57 नवीन
हं तै!!!! तुमची शंका बराबर है!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/09/2015 - 11:33 नवीन
नुकतीच ही बातमी वाचली होती. http://www.thehindu.com/news/national/kerala/debunking-midbrain-activation-of-children/article7124550.ece भोंदूगिरी आहे असे हे म्हणतात.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 07/09/2015 - 12:39 नवीन
मी आत्ताच त्या मालकाला भेटून आलोय. गेल्या नऊ महिन्यातली प्रगती अविश्वसनीय आहे. मी त्याला म्हटले मला यावर रीसर्च करायचा आहे. तो म्हणाला कधीही या. त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो, जर त्यातल्या एकाही पालकाने म्हटलं की ह्यांनी फसवलंय, हे थोतांड आहे तर मी ही संस्था बंद करून घरी बसेन. तर मंडळी, तिथे येणार्‍या मुलांवर मी माझ्या पद्धतीने रीसर्च करणार आहे. तुमचे काही प्रश्न, कुतूहल, शंका असेल तर कळवा. अभ्यासात अंतर्भूत करेन. 'जे विश्वास ठेवतात त्यांना कुठल्याही कारणाची गरज नाही. जे ठेवत नाहीत त्यांना कुठलेही कारण पुरेसं नसतं'. या वाक्यात नमूद केलेल्या दोन अवस्थांपलिकडे जाऊन काहीतरी करता येण्यासारखं आहे का? या प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 07/09/2015 - 20:05 नवीन
तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल स्केप्टीक आहात की एका वेगळ्या पद्धतीने त्यांची जाहिरात करत आहात? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/10/2015 - 18:12 नवीन
गावडेसाहेब, असा प्रश्न येईल हे अपेक्षितच होते. मी स्वतःला स्केप्टीक म्हणत नाही. कारण जे कोणी स्केप्टीक/रॅशलिस्ट बघितलेत ते फार अहंकारी आणि 'माझं तेच खरं' असं म्हणणारे असतात. त्यांना कितीही समजावून सांगा ते आपला हेका सोडायला तयारच नसतात, काहीतरी बेसलेस एक्स्प्लेनेशन देत असतात आपल्या "वाटण्याचं". मी तरी असंच बघितलंय, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. मी स्वत:ला अभ्यासक म्हणेल. एखाद्या दाव्यात काय खरं, काय खोटं असं आधीच ठरवून न बघता, सगळ्या बाजूने प्रॉपर विचार करून निष्कर्ष काढणे याला मी महत्त्व देतो. मला या मिड-ब्रेनच्या वर्किंग लॉजिक मधे अजिबात इंटरेस्ट नाही. ते कसं काम करतं, खरं आहे की फसवतात वैगेरेच्या भानगडीत पडून उपयोग नाही. फक्त रीझल्ट आहेत का? आधी आणि नंतर च्या अवस्थांमधे जाणवण्याइतपत फरक आहे का? आणि तो या कोर्समुळेच झालाय का? या तीन प्रश्नांची उत्तरे शोधायचीत. रच्याकने: कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय? मी शोधतोय. तुम्ही पण सांगा. खोटा दावा करून तोंडघशी पडणारे हजारो आहेत. पण उलटं उदाहरण अपवादालातरी असायला पाहिजे की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आनंदी गोपाळ Fri, 07/10/2015 - 07:53 नवीन
फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?
१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/10/2015 - 18:02 नवीन
१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा? >> https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method#Process. जी काय माहिती उपलब्ध होईल त्याचे तटस्थपणे संकलन, निरिक्षण व त्यावर प्रयोग करून येणारे परिणाम तटस्थपणे तपासणे. यापेक्षा अजून काय वेगळी पद्धत असेल तर जरूर सांगा मी अंतर्भूत करेन. २. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात? >> जी मुले कोर्स करून गेलेली आहेत व इथून पुढे हा कोर्स करणार आहेत त्यांचा विदा गोळा करणार, कौटुंबिक माहिती, शालेय प्रगती, इतर सवयी. कोर्स नंतर त्यांच्यात काय फरक पडला, पालकांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्रमैत्रिणींचं मत, शालेय प्रगतीत पडलेला फरक, इत्यादी विषयांचे माहिती संकलन. शिवाय माझ्या स्वतःच्या मुलाला ह्या कोर्सला घालणार आहेच.(तेही फुकटात होईल याची तजवीज करून आलोय) मी फक्त बाहेरून, वरवर अंदाजपंचे दाहोदसे करणारा बुद्धीवादी नाही. गटारात उतरूनच घाण आहे का हे बघायला लागत असते या विचाराचा आहे. माझी कामे सांभाळून जेवढा जमेल तेवढा वेळ यासाठी देणारच आहे. ३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार? >> तुम्ही करा. जो काय रीपोर्ट तयार होईल तो सगळ्यांसाठी खुला असेल अभ्यासायला. फक्त कुणी नुसतं तार्किक तारे तोडायला नको. कारण त्याचा काय उपयोग नसतो. ४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे? >> आम्ही अशा फसवणार्‍यांची बीन-पाण्याने करायला सर्वात पुढे असू. कारण मुले आणि त्यांचे आयुष्य-मन-स्वभाव-इच्छा ह्यांच्या बद्दल आम्ही कमालीचे हळवे आहोत. त्यात कुणीही (अगदी कुणीही बरंका) भंकस करत असेल तर आम्ही त्येनला काय सोडत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ऋ
ऋतुराज चित्रे गुरुवार, 07/09/2015 - 12:46 नवीन
हे पहा आणि ठरवा https://www.youtube.com/watch?v=BoR8uDMCbm0
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/18/2015 - 06:48 नवीन
धन्यवाद ऋतुराज चित्रे. माहितीपुर्ण दुवा आहे.नाशिक अंनिस ने चांगले काम केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ब
बबन ताम्बे गुरुवार, 07/09/2015 - 14:28 नवीन
यासंबंधी अगदी अशीच आठवण माझ्याकडे आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी एका कंपनीत अ‍ॅप्रेंटीस असतानाची ही आठवण आहे. आम्हाला शिकवायला जे सर होते, ते एकदा म्हणाले की तुम्ही फळ्यावर जे लिहाल ते मी डोळे झाकून पुन्हा लिहू शकतो. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे रुमालाने डोळे बांधले आणि आम्ही फळ्यावर खडूने काहीतरी लिहीले. नंतर सरांच्या हातात खडू दिला.डोळे बांधलेले असताना सरांनी फळ्यावर आम्ही जे लिहीले होते ते तेच लिहीले.आम्ही अत्यंत आश्चर्यचकीत झालो. मग सरांनी खुलासा केला की तुम्ही ज्यावेळी डोळ्यावर रुमाल बांधला, त्यावेळी खरे म्हणजे मी माझ्या पद्ध्तीने तुमच्याकडुन रुमाल बांधून घेतला. मी खाली थोडी गॅप ठेवली होती.आणि तुम्ही जेव्हा लिहीत होतात तेंव्हा मी त्या गॅपमधून बघत होतो. थोडक्यात मला सगळे दिसत होते. वरील व्हीडीओत अनिस ने तेच दाखवले आहे.
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली गुरुवार, 07/09/2015 - 14:36 नवीन
आस्सयं काय... मग मी सुधा ब्रेन अ‍ॅक्टीवेशनची एक ट्रीक दाखवु शकतो. शेजारच्या खोलीतला मुलगा तुमच्या मनातला पत्ता आपोआप ओळखतो असा तो प्रयोग आहे. बाकी हे अ‍ॅक्टीवेशन खरेच झाले तर मज्जाच मज्जा आहे. अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 15:50 नवीन
चेष्टा करत नाही. सिरीयस आहे. असे उपद्व्याप शिकलेली लेकरं आजूबाजूला असतील तर नवीन नवरा बायकोचं काय होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
ब
बॅटमॅन Sat, 07/11/2015 - 17:35 नवीन
त्यासाठी नवीन नवराबायकोच पाहिजेत असं नाही. आय मीन नवीन आणि नवराबायको या दोन्हीही नेसेसरी किंवा सफिशियंट कण्डिषन्स नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Sat, 07/11/2015 - 17:41 नवीन
नवीन अशासाठी म्हटलं की ते जास्तच अॅक्टीव्ह असतात!!! हीः हीः हीः!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 07/13/2015 - 10:49 नवीन
खी खी खी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
द
द-बाहुबली Mon, 07/13/2015 - 17:56 नवीन
यावरुन रिलायन्सने प्रोड्युस केलेला जज ड्रेड नामक तद्दन मारधाडपट आठवला... त्यात बायडीचं नक्कि काय अ‍ॅक्टीवेट केलं गेलं यावर भाष्य नाही पण ती... मिडब्रेन एक्टीवेट केल्याप्रमाणे पावर्स राखते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अंतु बर्वा Mon, 07/13/2015 - 19:40 नवीन
आमच्या स्कार्लेट जॉन्सनचा लुसी सुद्धा असाच. फरक एवेढाच की यातलं स्त्री पात्र १००% ब्रेन वापरु लागते (साधारण माणसं फक्त १०% ब्रेनचा वापर करु शकतात या गृहितकावरुन). अवांतरः https://en.wikipedia.org/wiki/Ten_percent_of_the_brain_myth
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/09/2015 - 20:30 नवीन
मी मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशन करून घेतलं तर मला मोठ्मोठ्या लॉटर्‍यांचे नंबर (६+१, ७+१, इ इ) ओळखता येतील काय ? कोणीतरी लवकर सांगा. म्हणजे मला युरोमिलिओनेन आणि युएस मधल्या क्रिसमसच्या जंबो लॉटरी एडिशन्सच्या अगोदर अ‍ॅक्टिवेशन करून घेता येईल !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 07/09/2015 - 20:39 नवीन
अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.
असेच होण्याची पूर्ण शक्यता आहे. इथे दिलेले व्हिडिओ बघून ते मनगटावर चोळणे, वास घेणे वगैरे निव्वळ नाटक असून पट्टीतुन दिसते, हेच खरे असे वाटले.
त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो,
ताबडतोब ती लिस्ट घ्या आणि त्या सर्वांना भेटा. अर्थात त्यातही काही मखलाशी असेलच, तरी त्यातून काहीतरी कळेलच. लहान मुलांना, विशेषतः शाळकरी मुला -मुलींना या कामी वापरणे हे अश्लाघ्य आहे, (पण ते फार परिणामकारक आहे). "शाळकरी मुली" असल्याचा आभास निर्माण करून कशी फसवणूक केली जाते, याबद्दलचे दुसरे उदाहरण अनेकांना ठाऊक असेल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा