Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्रपट गप्पा .. ( सर्व भाषातील सिनेमे)

D
dadadarekar
Sat, 07/11/2015 - 12:25
🗣 69 प्रतिसाद
चित्रपट या विषयावरील गप्पांसाठी हा धागा. चालू व आगामी आकर्षण असलेल्या हिंदी / मराठी / इंग्रजी व अन्य भाषेतील चित्रपटाबाबत हा धागा. काल बाहुबली पाहिला. चांगला वाटला. थ्री डी असता तर अजुन छान वाटला असता. लहान मुलांसाठी मिनिऑन्स कसा आहे? थ्री डी , फोर डी , आयम्याक्स थ्री डी यात काय फरक असतो?
वर्गीकरण
सिनेमा

प्रतिक्रिया द्या
14282 वाचन

💬 प्रतिसाद (69)
उ
उगा काहितरीच Sat, 07/11/2015 - 12:28 नवीन
बाहुबली पाहिला , 3D पाहिजे होता, अशा वळणावर सोडला कि नंतरचा भाग पहिल्या दिवशी पहावा !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 07/11/2015 - 12:55 नवीन
त्वरअगदी असेच म्हणतो. रामायण - महाभारतावर असे पिच्चर आले तर सर्व सुपरहीरोंचं मार्केट क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल. (हो हो, त्यात आम्हीही आलोच. :( ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
स्वप्नांची राणी Sat, 07/11/2015 - 13:12 नवीन
काहिही हां ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 07/11/2015 - 13:22 नवीन
अहो काय करता मग. वैसेभी आमचा रोल पर्मनंट नसतो असे नोलानसाहेबांनी सांगितलेच आहे. बॅटमॅन एक सोच है-मोर दॅन अ सिंगल पर्सन. त्या अर्थे आम्ही अमरच आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
उ
उगा काहितरीच Sat, 07/11/2015 - 17:47 नवीन
पानिपत या विषयावर बिगबजेट पिक्चरच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सव्यसाची Sun, 07/12/2015 - 17:12 नवीन
चित्रपट आवडला. एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे. (चांगला होउ शकतो वगैरे नेहमीची टीका होउ शकते.) पण एवढा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करणारा हा पहिलाच चित्रपट पाहण्यात आला. युद्धासाठी जोधा अकबर मध्ये खुपच कमी लोक दाखवले होते. इथे बरेच लोक दाखवले तरी आहेत. काही ठिकाणी अ‍ॅनिमेशन वाटले पण अ‍ॅनिमेशन आणि खरे लोक यामधली सीमारेषा जेवढी छोटी करण्याचा प्रयत्न करता येइल तेवढा केला आहे. तरिही बर्याच ठिकाणी जाणवत राहते. माहिष्मती नगरीच्या अ‍ॅनिमेशन चे सर्व अ‍ॅंगलने शूटिंग आहे. त्यामुळे त्याची भव्यता ठसण्यास फायदा झाला आहे. बाकी रथाच्या समोर तलवारी फिरत राहताहेत, कपड्याचा शत्रुवर केलेला वापर या गोष्टी इतर कुठल्या इंग्रजी चित्रपटात पाहिल्या नाही. असे करणारा हा पहिलाच चित्रपट समजावा काय? गाणी आणि नाच या गोष्टी स्टोरी ला खुप पुढे नेतात असे वाटत नाही. अवांतरः ह्या डायरेक्टरने मगधीरा पण दिग्दर्शित केला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
D
dadadarekar Sun, 07/12/2015 - 19:15 नवीन
भव्यदिव्य लोकेशन्स आणि युद्धाच्या करामती यात थोडेफार साम्य जाणवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
उ
उपयोजक Sat, 07/18/2015 - 19:42 नवीन
सुब्रमण्यमपुरम - तमिळ कुंजिकुलेन - मल्याळम हे चित्रपट पाहिलेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चित्रगुप्त Sat, 07/11/2015 - 14:02 नवीन
काहीसा जुना, 'आँखों देखी' चित्रपट अवश्य बघावा. आँखों देखी : सत्याचं थेट प्रक्षेपण http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-utpal-v-4798933-NOR.html
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/12/2015 - 15:40 नवीन
@ 'आँखों देखी' >> पाहिला. आवडलाच आवडला. साधं शांत आणि तरीही कसल्याही तत्वज्ञानाची बळजोरि न करणारं कथानक आहे. कदाचित म्हणुनच चालला नसावा. गाणीही वेगळ्या पठडितलि आणि पटकथेला साजेशी आहेत. मस्स्स्स्स्त वाटत होतं ऐकायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मी-सौरभ Sat, 07/11/2015 - 15:03 नवीन
पिक्चर छान आहे
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 07/11/2015 - 19:26 नवीन
"...क्षमा कीजए सर, मुझे ये पता नहीं था मोती काला भी होता है..." गोलमाल पुनरेकवार पाहतो आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/16/2015 - 08:01 नवीन
एकच नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
एस Mon, 07/13/2015 - 11:03 नवीन
'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटातील 'कधी तू' या गाण्यात स्वप्नील जोशीसोबत असणारी ती मुलगी कोण आहे, जिचा चेहरा कधीही दाखवत नाहीत? मुक्ता बर्वेपेक्षा जास्त चांगल्या बांध्याची आणि छान आहे दिसायला असे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 07/13/2015 - 11:52 नवीन
सुंग ची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Mon, 07/13/2015 - 12:14 नवीन
ते पात्राचं नाव झालं. त्या अभिनेत्री/नर्तिकेचे नाव काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 12:22 नवीन
छत्रपतींवर असे चित्रपट का बनवता येऊ शकणार नाहीत. दक्षिणेकडचे दिग्दर्शक जर बाहुबली सारख्या काल्पनिक पात्रावर इतका भव्य दिव्य सिनेमा बनवू शकतात तर छत्रपतींवर किती भव्य चित्रपट बनवता येतील.
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 07/13/2015 - 13:31 नवीन
अफझल खान वधाचे पोस्टर लावण्यावरून दंगे भडकत असतील तर सिनेमात काय होईल तुम्हीच कल्पना करा… आणि अफझल खान वध गाळून छत्रपतींवर सिनेमा म्हणजे रावणाविना रामायण …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 13:39 नवीन
दुर्दैव आपले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 14:41 नवीन
आणि असे करणारे ब्राम्हण नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरवले जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ह
होबासराव Mon, 07/13/2015 - 12:37 नवीन
अगदि मनातल बोललात.. पण परंतु किंतु त्या स्क्रिप्ट ला अप्रुव्हल किति ठिकाणावरुन आणावे लागेल कळतय का.. त्यातहि काहि नावे आणि चरित्र सिनेमातुन / स्क्रिप्ट मधुन गाळावे लागतिल्..आणि हे केल्यानंतर सुद्धा एखादि चींधि-चोर संघटना काहि तरि खुस्पट काढेलच.. मग इतकि रिस्क कुठलाहि निर्माता का घेईल? भालजि नि सुद्धा कर्ज काढुनच आणि केवळ आपल्या निस्सिम शिव-भक्ति पायिच सुंदर चित्रपट काढले होते.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Wed, 07/15/2015 - 13:43 नवीन
बाहुबली दुसर्‍या भागात जॉन अब्राहम आहे म्हणे
  • Log in or register to post comments
ज
जडभरत गुरुवार, 07/16/2015 - 06:50 नवीन
का? दुसर्या भागात बाहुबली संन्यास घेऊन वस्त्रत्याग करतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चलत मुसाफिर गुरुवार, 07/16/2015 - 05:53 नवीन
'समर' दिग्द. शाम बेनेगल. जातिसंस्था व तदनुषंगिक दांभिकपणा यावर प्रखर प्रकाशझोत टाकणारा
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 07/16/2015 - 08:10 नवीन
सत्यजित रेंचा 'समाधी' पाहिलात का? ओम पुरी, मोहन आगाशे, स्मिता पाटील... स्टारकास्टच पुरेशी आहे या सिनेमाबद्दल सांगायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
D
dadadarekar गुरुवार, 07/16/2015 - 06:13 नवीन
आता नवीन आकर्षण ... बजरंगी भाइइजान आणि दृश्यम
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 07/16/2015 - 06:50 नवीन
कुणाला इंटरेस्ट नाही का या सिनेमात?
  • Log in or register to post comments
न
नया है वह गुरुवार, 07/16/2015 - 07:54 नवीन
थोडासा रुमानी हो जाये! पहिला आतिशय सहज, सुन्दर सिनेमा,नाना पाटेकर अप्रतीम!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/16/2015 - 08:09 नवीन
फेसबुकवर आत्ताच बाजीराव मस्तानीचे काही फोटो बघितले. तो कोणसा सिंग बरा दिसतो आहे बाजीराव म्हणून. पण प्रियंका चोप्रा काशीबाई असेल तर तिच्या कपड्यांची चांगलीच काशी केली आहे. दीपिका पदुकोण मस्तानी म्हणून धनुष्यबाण घेऊन काय विचित्रच वाटली.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/16/2015 - 08:17 नवीन
हिंदी चित्रपटांत खुप ऐतिहासिक चुका असतात ज्या इतिहासाचा विद्यार्थी म्हणुन कितीही छोट्या असल्या तरी खटकतात १ उदा जोधा अकबर मधे जोधाने तिच्या भावाला (सोनु सूद) लिहिलेल्या पत्रात प्लेन देवनागरी लिपी दाखवली आहे ते किंवा २ लेटेस्ट बाजीराव मस्तानी मधे रणवीर सिंह हा बाजीराव च्या वेशात असताना कानात भिकबाळी च्या जागी मोत्याचे डुल दाखवले आहेत इत्यादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 08:28 नवीन
जोधा राजपूत असल्याने तिच्या वैयक्तिक पत्रव्यवहारात देवनागरी लिपी येणे चूक नाही. मत्र मुघलांनी दुसर्‍या राजाला पाठवलेले फर्मान देवनागरीतले दाखवलेय, ते कैच्याकै आहे. सर्व फर्माने शुद्ध सदाशिवपेठी फारसी भाषेत असायची त्यांची. बाकी भिकबाळी अन डूल-डीटेल्सची अपेक्षा कुणाकडून करताय सोन्याबापूसाहेब? रिकामडोक्या बॉलीवुडकडून? हाच जर सौथवाल्यांनी बनवला असता तर खचितच अ‍ॅक्युरसीकरिता जास्त कष्ट घेतले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा गुरुवार, 07/16/2015 - 08:42 नवीन
या पिक्चराबद्दल वाचतेय की काशीबाई आणि मस्तानी बाजीरावासमोर एकत्र डॅन्स करणार आहेत. एक रागावलेली आणि वैताग आलेली स्मायली द्या रे कोणीतरी! यक्क्क्क्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
इ
इनिगोय गुरुवार, 07/16/2015 - 08:46 नवीन
बाजीरावाचा देवदास होणार तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 08:56 नवीन
काय बोलू कळत नाही. बाकी करण जोहर त्या इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक तद्दन भिकार सेरीजवर पिच्चर काढणारे माहितेय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 07/16/2015 - 09:03 नवीन
सारुखभाय शिवा का? आणि किरण खेर शिवाची आई असेल. भरजरी कपडे, लग्न, समूहनृत्ये वगैरे असेलच! करू देत काय काय ते! म्याड आहेत लोक असले पिक्चर पैशे घालवून बघायला जातात ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 09:06 नवीन
ओ तै, विचार करकरूनच काटा आला ना....."प प प पार्वती" म्हणेल मग तो शंकर. आय होप दॅट मूव्ही बिकम्स अ फ्लॉप. सीरियसलि. इतके वाईट शक्यतो कुणाबद्दल चिंतीत नाही, पण आय कांट हेल्प मायसेल्फ इन धिस केस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
द-बाहुबली गुरुवार, 07/16/2015 - 09:13 नवीन
शिवाचा रोल वरुण धवन करणार आहे असेच कळते. एबीसीडी मधे त्याची नृत्याची सिन्सीअ‍ॅरीटी व प्रचंड कुवत बघता शिवाचा रोल तो १००% व्यवस्थीत करु शकतो.(शिव हा उत्तम नर्तक दाखवला आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
द
द-बाहुबली गुरुवार, 07/16/2015 - 09:08 नवीन
इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक तद्दन भिकार सेरीजवर पिच्चर काढणारे माहितेय का?
त्याची रंगीत तालीम म्हणूनच त्याने बाहुबली प्रोड्युस केला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 09:13 नवीन
प्रोड्यूसर करण जोहर नाहीये. शोबू यर्लागड्डा, राघवेंद्र राव आणि प्रसाद देविनेनी हे प्रोड्यूसर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली गुरुवार, 07/16/2015 - 09:16 नवीन
सॉरी करन जोहरने फक्त हिंदी रिलीज केलयं. तो प्रोड्युसर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
वगिश Sat, 07/18/2015 - 20:51 नवीन
कथा म्हणून चांगली आहे कि 'इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा'. त्याकडे ऐतिहासिक किंवा धार्मिकतेच्या दृष्टीने बघितल्यास खटकू शकते. मध्यंतरी hollywood च्या निर्मात्यानेहि पुस्तकाचे अधिकार घेतल्याचे वाचले होते. करण जोहर फार तर फार निर्माण करेल , दिग्दर्शनाची हिम्मत तो करेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बोका-ए-आझम Sat, 07/18/2015 - 16:40 नवीन
जोधा ही आख्यायिका आहे ना? मी तर असं ऐकलेलं की तो इतिहासकारांचा कल्पविलास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पद्मावति Sun, 07/19/2015 - 16:09 नवीन
संजय लीला भंसाली बाजीराव पेशव्यांवर सिनेमा काढणार ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती ...बापरे...!! पण काल प्रोमो बघितल्यावर जरा हायसं वाटतय. तरीही पूर्ण सिनेमा बघेपर्यंत खात्री नाहीये की भंसाली साहेब काशीबाई आणि मस्तानीवर डोला रे डोला टाइप काही गाणं करणार नाही...keeping fingers crossed...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाव आडनाव गुरुवार, 07/16/2015 - 08:17 नवीन
"ऊनपाऊस" नावाचा मराठी चित्रपट आहे. कृष्ण - धवल आहे. नक्की महित नाही पण ~१९५० च्या दशकातला असेल. काही वर्षां आधी आलेला बागबान (अमिताभ बच्चन - हेमा मालिनी) ऊनपाऊस वरूनंच बनवला आहे असं वाटतं. बरीच दृश्यं तर जशीच्या तशी घेतलेली आहेत. ऊनपाऊस चॅनेल वर लागत नाही कधी आणी लई शोधून त्याची सीडी पण मिळाली नाही पुण्यात. मी दूरदर्श्न वर बघितला होता. एकदा यूट्यूब वर होता पण उडवला नंतर.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar गुरुवार, 07/16/2015 - 08:42 नवीन
तु तिथे मीवरुन घेतला हो५आ ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नाव आडनाव गुरुवार, 07/16/2015 - 10:19 नवीन
बरोबर, मी पण तसंच एकलं होतं. पण बागबान मधली काही दृश्यं ऊनपाऊस सारखी वाटली म्हणून मला बागबान बघतांना ऊनपाऊस आठवला. उदा. चिठ्ठी वाचायच्या आधी अमिताभ बच्चनच्या चष्म्याची काच पडल्यामुळे फुटते ते आणी पुढचं सगळं एकदम तसंच आहे ऊनपाऊस मधे. अजून बरंच सारखं आहे बागबान आणी ऊनपाऊस मधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
इ
इनिगोय गुरुवार, 07/16/2015 - 08:24 नवीन
इनसाईड आउट हा अॅनिमेशनपट मोठ्यांनापण खूप आवडेल असा आहे. आपल्या भावना आपल्याला कशा सांभाळतात, चिडवतात, बिथरवतात, तर कधी सावरतात, याची मस्त गोंडस गोष्ट आहे. थ्रीडीमध्ये बघितल्यास आणखी छान.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/16/2015 - 08:50 नवीन
माझ्या मैत्रिणीने पाहिला, ती म्हणाली की अ‍ॅनिमेशन असला तरी लहान मुलांपेक्षा मोठ्यांसाठी जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय
र
रायनची आई गुरुवार, 07/16/2015 - 09:03 नवीन
मला आठवत असलेले काही सिनेमे.. A Separation, Baran, Tokyo Story, Last Vegas, Mr. Bean's Holiday आणि आपले Mr. & Mrs. Iyer , Queen, Piku, Hera Pheri ..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 07/16/2015 - 09:34 नवीन
माझ्या मते - मराठीत - जगाच्या पाठीवर, पाठलाग, सामना, उंबरठा, सरकारनामा, पक् पक् पकाक ,पोष्टर बाॅइज. हिंदीत - मुघल-ए-आझम, गंगा जमना, शोले, अनुपमा, गाईड, जिस देश मे गंगा बहती है, अर्थ, कभी हां कभी ना, जाने भी दो यारों, चक दे इंडिया, स्वदेस, लगान, दिल तो पागल है. विंग्रजी - Schindler's List, Psycho, Silence of the Lambs, All the President's Men, Chinatown, The Pianist, Rain Man, Million Dollar Baby, Vertigo, Shutter Island. यातले सगळे मी किमान १० वेळा पाहिले असतील. पण अजूनही ते पाहून संपलेत असं वाटत नाही. चांगलं पुस्तक जसं एकदा वाचून समाधान होत नाही, तसंच. (Proud to be filmy) बोका-ए-आझम
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा