Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्रपट गप्पा .. ( सर्व भाषातील सिनेमे)

D
dadadarekar
Sat, 07/11/2015 - 12:25
🗣 69 प्रतिसाद
चित्रपट या विषयावरील गप्पांसाठी हा धागा. चालू व आगामी आकर्षण असलेल्या हिंदी / मराठी / इंग्रजी व अन्य भाषेतील चित्रपटाबाबत हा धागा. काल बाहुबली पाहिला. चांगला वाटला. थ्री डी असता तर अजुन छान वाटला असता. लहान मुलांसाठी मिनिऑन्स कसा आहे? थ्री डी , फोर डी , आयम्याक्स थ्री डी यात काय फरक असतो?
वर्गीकरण
सिनेमा

प्रतिक्रिया द्या
14282 वाचन

💬 प्रतिसाद (69)
प
पद्मावति गुरुवार, 07/16/2015 - 11:30 नवीन
हलक्या फुलक्या हिंदी सिनेमांमधे सई परांजपे यांचा कथा मस्तं आहे. गंभीर चित्रपटांमधे कलयुग- शशी कपूर. इंग्रजी पीरियड फिल्म्स मधे- द अदर बोलीन गर्ल, द बटलर उत्तम.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 07/18/2015 - 20:30 नवीन
सई परांजपे यांचा 'पपीहा' हाही चित्रपट छान आहे. तसेच मूळ 'चष्मेबद्दूर' ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
D
dadadarekar गुरुवार, 07/16/2015 - 12:26 नवीन
थ्री डी आयम्याक्स काय असते ?
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 07/16/2015 - 13:18 नवीन
मराठी 'रमा माधव' मध्ये सुध्दा फालतु आयटम साँग घुसडले आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच गुरुवार, 07/16/2015 - 15:10 नवीन
कुणी वास्तुपुरूष पाहीलेला आहे काय ?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे गुरुवार, 07/16/2015 - 18:06 नवीन
पाहिलाय छान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
च
चित्रगुप्त गुरुवार, 07/16/2015 - 20:45 नवीन
मी पंचवीस हून जास्त वेळा बघितलेला एकमेव चित्रपट (आठ ऑस्कर लाभलेला): Image removed..Image removed. Image removed..Image removed. याबद्दल विक्किती: (विक्कीतील माहिती) https://en.wikipedia.org/wiki/Amadeus_(film)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 21:01 नवीन
माझाही परम आवडता पिच्चर. अफाट, अप्रतीम, बेफाट सुंदर, अचाट वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ब
बोका-ए-आझम Fri, 07/17/2015 - 09:57 नवीन
काय चित्रपट आहे हा! लियाम नीसनचा शिंडलर अफाट, राल्फ फाईन्सचा अमाॅन गाॅथ म्हणजे नखशिखांत नाझी (विशेषतः तो I pardon you सीन), बेन किंग्जलेचा इत्झॅक स्टर्न अप्रतिम. ज्यू घेट्टो नष्ट करुन नाझी सगळ्यांना श्रमछावणीत नेतात - तो सीन तर अंगावर येतो. ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रण चित्रपटातलं क्रौर्य आणि कारूण्य अजून अधोरेखित करतात. स्टीव्हन स्पीलबर्गने अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेले असतील पण अविस्मरणीय असा शिंडलर्स लिस्टच.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 07/18/2015 - 18:55 नवीन
'शिंडलर्स लिस्ट' ह्या चित्रपटात स्पीलबर्गने त्याचा प्राण ओतला असावा! असाच रोमान पोलान्स्कीचा 'द पियानिस्ट'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ए
एक एकटा एकटाच Sun, 07/19/2015 - 08:13 नवीन
शिंडलर्स लिस्ट जबरादस्तच. जेव्हा जेव्हा पाहिलाय तेव्हा तेव्हा अंगावर काटा उभा राहिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sun, 07/19/2015 - 04:33 नवीन
स्पीलबर्ग आणि पोलान्स्की हे दोघेही ज्यू. पोलान्स्की तर खुद्द आॅशविट्झमध्ये राहिलेला. त्याची आई तिथल्या मृत्युछावणीतल्या गॅसचेंबरमध्येच मारली गेली. स्पीलबर्गही जर्मनीतून जीव वाचवून पळून आलेल्या नातेवाईकांच्या गोष्टी ऐकत मोठा झाला. त्यामुळे दोघांनीही आपल्या चित्रपटात जीव ओतला यात काही आश्चर्य नाही.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 07/19/2015 - 08:47 नवीन
तसाच पोलान्स्कीचा चायनाटाऊन. जॅक निकलसन आणि फे डनवे यांचा. त्याचं रुपांतर करायचा एक चांगला प्रयत्न नवदीप सिंगने (ज्याने अनुष्का शर्माचा NH10 दिग्दर्शित केलाय) केला होता - मनोरमा ६ फूट अंडर मध्ये.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Fri, 07/31/2015 - 19:22 नवीन
Apocalypto, Now You See Me and Olympus Has Fallen ---- Must watch and Upcoming MI-5
  • Log in or register to post comments
स
सुंड्या Fri, 07/31/2015 - 21:38 नवीन
English-The Shawshank Redemption, 300, The Godfather-I, Forest Gump, It's a Wonderful Life (1946), American History X (1998),The Departed (2006), Django Unchained (2012), Lawrence of Arabia (1962),Full Metal Jacket (1987),Scarface (1983), The Bridge on the River Kwai (1957),A Beautiful Mind (2001),Fargo (1996),12 Years a Slave (2013, Groundhog Day (1993), Dead Poets Society (1989),Broken Arrow (1996),Dangerous Minds 1995 , For a Few Dollars More (1965), The Good, the Bad and the Ugly (1966), Ip Man (2008),Kid Cannabis [2014],No Mans Land, The MotorCycle Diaries,The Secret in Their Eyes (2009), City of God (2002),Foolproof (2003), God Bless America (2011),Grease (1978),Love Story (1970), Pathology[2008], A Perfect Getaway (2009), The Devil's Double (2011), The Dictator[2012], The Game (1997), The Odessa File (1974), Under the Tuscan Sun (2003) ... हिंदीत-सलिम लन्ग्डे पे मत रो, सलाम बोम्बे,कथा(1983),इजाज़त(1987),सूरज का सातवाँ घोड़ा (1993), छोटी सी बात(1975), खट्टा मीठा (1978),बाझार (1982), अरन्यक (1994)... .(योग्यायोग्य ठरवण्याचा अधिकार दर्श्कावर).
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 07/31/2015 - 21:48 नवीन
Django Unchained (2012)हा कालच बघितला. खुप आवडला. तसेच The Blues Brothers (1980)हा पण मस्त चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुंड्या
अ
अनामिक२४१० Sat, 08/01/2015 - 05:07 नवीन
मला 'एक हजाराची नोट' पाहायचाय … ऑनलाईन डाऊनलोड करायला लिंक मिळेल का मला …. ?
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Fri, 08/28/2015 - 08:32 नवीन
कट्यार काळजात घुसली. सिनेमा येत आहे. खान्साहेब ... सचिन. पंडितजी .... शंकर महादेवन
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 08/29/2015 - 05:53 नवीन
जर 'कट्यार काळजात घुसली' वर चित्रपट येणार असेल तर. पण नाटकांवरुन आलेले चित्रपट अयशस्वी ठरतात असा इतिहास आहे - सुंदर मी होणार वरुन आज और कल, अश्रूंची झाली फुले वरुन आंसू बन गये फूल आणि तो मी नव्हेच वरुन वो मै नही - हे सगळे प्रयत्न सपशेल फसले. मराठीत जयवंत दळवींच्या पर्याय वरुन काढलेला पुढचं पाऊल चालला होता. कट्यार पण असंच अपवादात्मक ठरलं तर छान होईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा