Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिबिंब

व — विशाल कुलकर्णी, Sun, 07/12/2015 - 09:22
मेघ सावळा का नभी एकटा? तो वाट प्रियेची बघ, पाहतसे विरह वेळा ही असह्य झाली प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे सखी प्रिया तव दूर वसुधा आतुर मिलना मनी कळवळे सरतील कधी, क्षण विरहाचे? नभास वेड्या कधी ना कळे... शल्य त्याचे कुणा ना कळले हलकेच कसे नभ ओघळले? विरह वेदना जळी बुडाली.. प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले... बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी विशाल... अ फ़ोटो आंतरजालावरून साभार

प्रतिक्रिया द्या
2211 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
जडभरत Sun, 07/12/2015 - 09:26 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 07/12/2015 - 09:56 नवीन
बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी Class
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 07/12/2015 - 11:05 नवीन
कवीता मस्तच आहे पण चायला मला यात भरपुर कच्चा मसाला दिसतोय ;)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 07/12/2015 - 11:45 नवीन
नेकी और पुँछ पुँछ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जडभरत Sun, 07/12/2015 - 11:50 नवीन
शाब्बास रे पठ्ठ्या! चल येवू दे एक फर्मास तांबिय विडंबन काव्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 07/12/2015 - 12:34 नवीन
नौ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/12/2015 - 12:41 नवीन
सुंsssssssssदर!!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 07/12/2015 - 13:00 नवीन
धन्यवाद मंडळी _/\_
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 07/12/2015 - 17:57 नवीन
वा! क्लास आहे ही कविता!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा