Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला

ख — खटासि खट, Sun, 07/12/2015 - 14:40
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला तेव्हां चर्चिल घासलेटच्या साठ्यावर फणा काढून उभा होता मी मार्क्सला म्हटलं पेटवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी माओचीही राख झाली आता इंद्रायणीतून भिजलेली गारगोटी काढून त्यावर अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय मात्र उजवीकडून येणारा मुसळधार भगवा पाऊस म्हणाला रांडेच्या, बघतोच तुला एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना पुरूष कानात कुजबुजला माणसं पेटवतोस का ? गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात लागतील तेव्हढे ! फक्त त्या आगीत घाल सगळे ज्वलनशील ग्रंथ आणि माझं सूक्तही माझा नाईलाज झालेला सांगायला पाहीजे का ?

प्रतिक्रिया द्या
12588 वाचन

💬 प्रतिसाद (51)
प
प्यारे१ Sun, 07/12/2015 - 14:49 नवीन
___/\____ ही कविता अजरामर होणार! मराठी आधुनिकोत्तर साहित्य विश्वात एका चमचमत्या आकाशगंगेची भर.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Sun, 07/12/2015 - 15:09 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 07/12/2015 - 16:08 नवीन
कविता पोचली. नव्वदच्या दशकास जास्त फिट बसत असली तरी थोडा अजून विचार केल्यास आजही तितकीच चपखल आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 07/12/2015 - 17:20 नवीन
कं लिवलयं काळाच्या पुढची क्विता....
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 07/12/2015 - 18:00 नवीन
अफाट!
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Sun, 07/12/2015 - 18:04 नवीन
__/|\__
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 07/12/2015 - 21:41 नवीन
लोल. तुम्हाला "छटाक शरदिनी" हा किताब देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 07/12/2015 - 22:04 नवीन
हा हा हा, इंडीड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नाखु Mon, 07/13/2015 - 06:09 नवीन
कित्येक नवटाक पेक्षा ही छटाक भारी आहे!!! इथे नव हा नवकवीतेंसाठी वापरला नाही याची नोंद घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय Mon, 07/13/2015 - 15:12 नवीन
खिक्क. ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मंदार दिलीप जोशी Mon, 11/09/2015 - 09:47 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
श्रीरंग_जोशी Sun, 07/12/2015 - 22:16 नवीन
स्टोव्ह पळवला गेला तर चूल पेटवा. आपले पूर्वज तेच करत होते ;-) . कवितेद्वारे केलेले भाष्य आवडले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/12/2015 - 22:20 नवीन
स्टोव्ह पळवला म्हणता... हायला, आता लष्करच्या भाकर्‍या कश्या भाजणार ! आँ ? काव्य लोल आहे हेवेसांन
  • Log in or register to post comments
द
दमामि Mon, 07/13/2015 - 04:06 नवीन
वाह!!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/13/2015 - 05:37 नवीन
ऊंsssssउंब,उंब, भुब्बुक!
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 07/13/2015 - 05:49 नवीन
अावडली कविता!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 07/13/2015 - 07:00 नवीन
स्टोव्ह पळवला? अजून स्टोव्ह वापरताय? बूर्झ्वा कुठले! तुम्ही त्याचे १०/१२ अणुबाँब पळवून आणा आणि वर्गक्रांती करा. हाकानाका!
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 07/13/2015 - 07:11 नवीन
लग्नाळलेला संसारी गृहस्थ काय पुरोगामित्व गाजवणार हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विजुभाऊ Mon, 07/13/2015 - 07:14 नवीन
लग्नात लाजा होम काय स्टोव्ह पेटवून केला होता का? लग्नाचा आणि पुरोगामित्वाचा काय सम्बन्ध? जरा एक्षप्लेन कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
प
पैसा Mon, 07/13/2015 - 07:19 नवीन
लग्न केलेला पुरुष पुरोगामी म्हणजे पुढेच काय मागे किंवा इकडेतिकडे कुठेही जाऊ शकणार नाही असे त्यांचे म्हणणे असावे. बाकी ही क्रांतीकारी कविता घरातून "रेशनला रॉकेलच्या लायनीत उभे रहा" असे सांगितल्यावर वाटेत मदिरागृह दिसल्यानंतर प्रसवली गेली असावी अशी शंका घेण्यास जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ख
खटासि खट Mon, 07/13/2015 - 07:37 नवीन
जवळपास सगळंच बिंग फोडलं की. घरात बायको नसताना लायटर सापडत नाही म्हणून स्टोव्ह पेटवायला घ्यावा तर घासलेट पक्षी रॉकेल नाही आणि वर्गीय फोडणीमुळे ते मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर ...पुढचा खुलासा मॅजेस्टीक गप्पांत करायचा विचार आहे, पण त्या पुण्यात ठेवल्या तरच. - जो मनुक्ष लिव इन न करता लग्न करतो तो पुरोगामी कसा होऊ शकतो ? ऑं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विजुभाऊ Mon, 07/13/2015 - 07:11 नवीन
बूर्झ्वा............. क्रान्तीचे धगधगते अग्निकुंड स्टोव्ह मुळे पेतते राहिले होते हे ठाउक नव्हते. नानु सरंजामे (" मी झोपतो हिमालयाची करुन उशी फेम") यांचे आठवण झाली
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 07/13/2015 - 07:47 नवीन
जबराट ! आजच्या काळालासुद्धा तितकीच फिट आणि समर्पक _/\_
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 07/13/2015 - 08:41 नवीन
बुद्धीला न पेलवल्या जाणारे वजन आहे कवितेत. आवडली...
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 07/13/2015 - 08:47 नवीन
मस्त , पोचलेली कविता
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 07/13/2015 - 08:48 नवीन
सहीच आहे !!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 09:22 नवीन
चटका लागेल असं वास्तव !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/13/2015 - 12:55 नवीन
किती येळा सांगीतल तुम्हाला ते आइअनस्टाइन बेन लहान पणापासुनच असच विद्र आहे. तेला घरात घेऊ नका. त्याचा नाद करू नका. त्यो दिसलं तिकड हात मारतोच. आता पर्यंत त्यानं त्यो इष्ठो इकून त्या पैक्याची दारू बी प्यायली असल. आता येउदे घराकडे त्याला त्याला पायतानान चांगला तुडवूनच काढतो. अन तुमाला बी सांगून ठ्युतो पुन्यांदा त्याच्या नादाला लागून श्यान खाल्लात तर माझ्या कड कंप्लेण घिउन यिऊ नका तुमची बी खेट्रान पूजा करीन, आत्ताच साण्गून ठेवितो नंतर बोलियाचा नाय. एका सांगा तुमी ग्यासची सबशीडी सोडली का? (आइन्स्टाइन चा बाप) पैजारबुवा
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 07/13/2015 - 12:57 नवीन
कविता मरो, हे बूर्झ्वा काय प्रकरण आहे?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/13/2015 - 13:02 नवीन
तुला बुर्झ्वा माहीत नाही? छे अगदीच बुर्झ्वा आहेस तू. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आदूबाळ Mon, 07/13/2015 - 13:21 नवीन
बघा ना. अगदीच प्रोलिटारिएटसारखं... ह्या:...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड Mon, 07/13/2015 - 13:32 नवीन
बास का राव, सांगा की आता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पैसा Mon, 07/13/2015 - 13:50 नवीन
कामगार आणि भांडवलदार असे दोन वर्ग आहेत ना, त्यातला भांडवलदार वर्ग म्हणजे बूर्झ्वा. सर्व उत्पादनाची साधने यांच्या मालकीची असतात आणि ते दुष्ट लोक गरीब बिचार्‍या कामगारांचे शोषण करतात. मध्यमवर्गीयसुद्धा कामगारविरोधीच असतात. थोडक्यात म्हणजे तुम्ही जुनाट मध्यमवर्गीय वगैरे दु..दु..दुत्त लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आनंदी गोपाळ Mon, 07/13/2015 - 17:52 नवीन
स्पेलिन्ग लिवा पाहु बूर्झ्वा चं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 07/13/2015 - 18:32 नवीन
गुगला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Tue, 07/14/2015 - 04:22 नवीन
मला ऑल्रेडी येतंय :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मृत्युन्जय Mon, 07/13/2015 - 15:11 नवीन
वाह. कॉंग्रेस सरकारवरची ही कविता मनाला एकदम स्पर्षुन गेली. +१००००००००००००००००००००००००००० लाइक्स.
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 07/14/2015 - 13:04 नवीन
दाहक.. अत्यंत दाहक कविता.. कोंडमारा झालेल्या भावनांचा भडका उडतोय वाक्यावाक्यातून, आणि होतेय राखरांगोळी सगळ्या नपुंसक वर्गभेदाची.. ह्यातूनच होणार आता सामाजिक नवनिर्मिती उकळती, धगधगती आणि तरीही सुंदर आल्हाददायक स्टोव्हच्या निळ्याशार ज्योतीसारखी..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 07/14/2015 - 18:04 नवीन
एक दृश्य डोळ्यासमोर आलं. ह्ये भलं मोट्टं केबिन. रेड/मरुन कारपेट. जुन्या पद्धतीची लाकडी मोट्टी कपाटं पुस्तकानी ठासून भरलीत. तकडं चार/सा जण बसतील असं सोफासेट. सायबाचं मोट्टं जड टेबल. टेबलावर भारताचा झेंडा आणि बाकी चार मोट्टे ठोकळे. सायेब आसं तितक्याच मोट्ट्या खुर्चीत बसलेत. हाताची बोटं ल्यापटॉप समोर नाचवत २ मिनिटं. चेहर्‍यावर आसुरी आनंद. समोरच्याला काळजी सायेब असं का करतेत.... बगितलं तर समोर मिपा. सायेब येकदम पेटून खवून प्रतिसाद ल्हितेत. कोंडमारा झालेल्या भावनांचा...... ;) ;) (आक्खा प्रतिसाद हलका घ्या मालक.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Wed, 07/15/2015 - 08:45 नवीन
सायेब येकदम पेटून खवून प्रतिसाद ल्हितेत. कोंडमारा झालेल्या भावनांचा...... ;) ;)
आक्षी बरुबर वळखलंस बग, प्यारे.. ;-) बाकी तपशिलात चुका हायती, कारण की तुमी कलेक्टर साहेबाचं केबिन नजरेसमोर ठेवूनश्यान प्रतिसाद दिलाय.. आमी सध्या त्या पदावर नाही.. म्हणून समोर फारसं कुणी नसतं, आणि डेस्कटॉप वापरतो बघा.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अस्वस्थामा Wed, 07/15/2015 - 12:27 नवीन
अस्लं असतंय व्हय कलेक्टर सायबांचं केबिन ? ह्म्म.. :) (चिगो, बरेच दिवस काही नवीन लिहिलं नै तुम्ही असं नमूद करतो बादवे.. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Wed, 07/15/2015 - 13:16 नवीन
अस्लं असतंय व्हय कलेक्टर सायबांचं केबिन ? ह्म्म.. :)
असं म्हणतात ब्वॉ.. तशीही ती ठासून भरलेली पुस्तकं फार कामाची नसतात, असंही ऐकलंय.. पण असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
प
प्यारे१ Wed, 07/15/2015 - 13:25 नवीन
आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
अ
अस्वस्थामा Wed, 07/15/2015 - 13:41 नवीन
आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो. :)
आमच्याकडे सेट म्याक्स नव्हता राव (नै तर आमाला पन दिसलं आस्तं).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ट
टवाळ कार्टा Wed, 07/15/2015 - 13:50 नवीन
आता घ्या मग...अजूनही सुरु असेल तो पिच्चर...सेट मॅक्सवाले मधे मधे दुसर्या गोष्टी दाखवतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ख
खटासि खट Tue, 07/14/2015 - 14:38 नवीन
कविता शांतपणे वाचल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 07/14/2015 - 19:45 नवीन
अगगागागा!! आईनस्टाईनकडून हि अपेक्षा नव्हती... कशाला आधी वर तोंड करून सिलिंडर सबसिडी सोडायचा ना मग!
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Fri, 07/17/2015 - 04:57 नवीन
एक नंबरचा नालायक माणूस ! लॉजिकल विचार करायची सवय लावतो लोकांना. कसं चेतवायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
प्रचेतस Wed, 07/15/2015 - 13:13 नवीन
जबराट कविता.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Mon, 11/09/2015 - 06:25 नवीन
..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा