Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"द्वारकेचा राणा"

श — शैलेन्द्र, Mon, 07/13/2015 - 08:32
मुखी नाम विठ्ठल, गळा तुळशीमाळा, वाहतो प्रवाह ओलांडून काळा, चाले रीघ आता, सुखाच्या शोधात , रूढीचे आवर्तन की भाव भोळा , उसळती अंतरी, कैक सलतात व्यथा , मनातून पाहती पंढरीच्या नाथा असे रान तान्हे परी फुटे जीवा पान्हा, समूहाची धुंदी नादावते माथा, लाख शंका मनी, परी पाहता या जना पेशीतून वाजे मृदुंग नी वीणा मन माझे डोले, पडती तालात पाउले रक्तातून वाहे द्वारकेचा राणा - शैलेंद्र

प्रतिक्रिया द्या
5386 वाचन

💬 प्रतिसाद (22)
त
तुडतुडी Mon, 07/13/2015 - 09:07 नवीन
छान
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 07/13/2015 - 12:02 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कंजूस Mon, 07/13/2015 - 13:17 नवीन
अगदी वेळेवर आणि छान ! पंढरीचा नाथ ,विठु,इट्टल हेच अधिक ऐकतो, द्वारकेचा राणा कमीच.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 07/13/2015 - 14:16 नवीन
धन्यवाद राम कृष्ण व विट्ठल या कल्पनांचे एकत्व नेहमीच भावते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 13:28 नवीन
वाहतो प्रवाह ओलांडून काळा,
छानच आहे. वरील ओळी वाचून "रात्र काळी घागर काळी" याची आठवण आली. आणि मग कविता आनखीच आवडली.
समूहाची धुंदी नादावते माथा,
हे मात्र खरे! सामूहिक उपासनेचा हा फायदा. भक्ती अनेक पटींनी ताकदवान होते. अष्टसात्विक भाव अशा वेळीस चटकन अनावर होतात. चपखल शव्दरचना!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 07/13/2015 - 16:17 नवीन
सामुहीक उपासनेचे जसे फायदे आहेत तसच् ती काही प्रश्नही उभे करतेच, असो मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
त
तुडतुडी Tue, 07/14/2015 - 13:15 नवीन
राम कृष्ण व विट्ठल या कल्पनांचे एकत्व नेहमीच भावते>>> पंढरीचा विट्ठल म्हणजे द्वारकेचाच राणाच . एकदा श्रीकृष्ण रुक्मिणी मध्ये काही वाद झाला . रुक्मिणी तिच्या माहेरी विदर्भात निघून गेलि. तिला समजवण्यासाठी निघालेल्या श्री क्रीष्णाना आपल्या भक्त पुंडलिकाची आठवण झाली . ते त्याच्या घरी घेले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत होता . (हाच पुंडलिक आधी आई बापाला शिव्या घालायचा .वय गेलेला मुलगा होता तो . नंतर तो अंतर्बाह्य बदलला . नक्की काय झालं होतं कुणाला माहित आहे का ? ). आईचं डोकं मांडीवर घेवून चेपत होता . आईला झोप लागलेली . उठता येईना म्हणून त्याने तिथे पडलेली वीट पांडुरंगाला बसायला दिली . देव त्याच्यावर उभा राहिला आणि अजून उभाच आहे . त्यानंतर प्रत्येक एकादशीला लोक भजन कीर्तन करत देवाच्या दर्शनाला येवू लागले . वैष्णव संप्रदायात एकादशीचं फार महत्व आहे . दूरच्या लोकांना प्रत्येक एकादशीला यायला जमत नसल्यामुळे त्यांनी आषाढी एकादशीला दर्शन घ्यायचं ठरवलं आणि वारीची प्रथा सुरु झाली .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 07/17/2015 - 07:07 नवीन
छान माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
द
द-बाहुबली Tue, 07/14/2015 - 14:07 नवीन
पांडुरंग म्हणजे नेमका कोणता रंग ? काळा नसेल तर विठ्ठलाला काळा का म्हणतात ? - अवघा रंग एक झाला मनी रंगला श्रीरंग.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Wed, 07/15/2015 - 06:34 नवीन
हा रंगाचा गोंधळ ह्याच देवाबाबत जास्त दिसून येतो. माझ्या मते विठ्ठल हा परब्रह्म म्हणून मानला तर पांडुरंग अर्थात शुद्ध शुक्ल वर्ण! आणि वारकर्‍यांना अति प्रिय असणारे क्रिष्णाचेच रूप मानले तर त्याचा प्रसिद्ध काळा वर्ण. काळा रंग हा सर्वात सामर्त्यवान समजला जातो कारण त्याच्यावर दुसरा कुठलाहि रंग चढत नाही. परब्रह्म तसेच आहे. तसेच शुद्ध विश्वाचा रंग काळाच आहे. प्रकाश फार मर्यादीत आहे. अंधःकार मात्र अनंत आहे. म्हणून तर कालीमातेला "काजळाऐसी दिसे काळी, म्हणोनी नाम महाकाळी" असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Wed, 07/15/2015 - 10:07 नवीन
होय रंगाचा गोंधळ आहेच पुन्हा हाच देव ज्याला भक्त "जिवलगा" असे आरतिमधेच संबोधतात. (राईच्या वल्लभा पावे जिवलगा). आता जिवलगा म्हणजे मित्र म्हणून ती हाक आहे, की ज्यावर जिव (परिणामी संसार) ओवाळुन टाकला आहे, ज्याचा एकमेव ध्यास लागला आहे ते तत्व म्हणून तो उल्लेख आहे हे सुधा उमजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
स
स्पा Wed, 07/15/2015 - 06:57 नवीन
ओहो हा आयडी कविताही करतो तर :) मस्तच रे
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 07/16/2015 - 05:47 नवीन
पडतो रे अधुनमधुन )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
कविता१९७८ Wed, 07/15/2015 - 11:01 नवीन
छान कविता , द्वारकेचा राणा ऐकलेलं नाही पण "जोंधळाच्या भाकरीला चव लय न्यारी... पंढरीचा राणा येई जनाईच्या घरी.." हे ऐकलंय.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 07/17/2015 - 07:09 नवीन
ते गीत मीही ऐकलय , सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
श
शैलेन्द्र गुरुवार, 07/16/2015 - 05:44 नवीन
विट्ठल आणि श्रीकृष्ण ही परंपरेने एकाच देवाची दोन रुपे मानली जातात, माझ्यासारखा नास्तिक माणूस देवाला मनुष्याची निर्मीती मानतो. जसा समाज तसा त्याचा देव, कर्तव्यापारायन कृष्णभक्तीतुन् संपूर्ण समर्पित विट्ठल भक्तीकडे जाताना समाजावर परचक्र आलेले होते; या परचक्रातही स्वत्व जपण्यासाठी जोवर शक्ती मिळत नाही तोवर संपूर्ण समर्पण ठेवून देवभक्ती करण्याचा मार्ग समाजाने स्वीकारला. कृष्णनीती हे माझ्या आवडीचे तत्वद्न्यान पण विठ्ठल भक्ती मात्र घराण्यातून , रक्तातून चालत आलेली; आजही जेंव्हा वारी बघतो तेंव्हा जीव खुळावतो; बुद्धीला पटत नसल तरी; तेच मांडायचा प्रयत्न केलाय, आणि कृष्ण -विठ्ठलाचे एकत्व म्हणून द्वारकेचा राणा तोच पंढरीचा राणा
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 07/16/2015 - 06:03 नवीन
कविता आणि मनोगत आवडलं. कवितेच्या आधी/नंतर हे टाकल्यास कवीची भूमिका जास्त स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
प
पैसा गुरुवार, 07/16/2015 - 05:48 नवीन
शैलेन्द्रची कविता म्हणून आश्चर्य नाही वाटलं. तुला लिहिता येतंच! बुद्धि आणि मन यात द्वंद्व चालूच असतं. छान लिहिलं आहेस.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 07/16/2015 - 12:36 नवीन
धन्यवाद पैसाताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया गुरुवार, 07/16/2015 - 13:54 नवीन
छान आहे कविता.आवडली.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 07/16/2015 - 17:53 नवीन
अतिशय सुंदर आणि लयबद्ध .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 07/18/2015 - 07:46 नवीन
धन्यवाद अजया आणि मनीषा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा