Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(राहिले रे अजून देश किती)

स — स्वामी संकेतानंद, Mon, 07/13/2015 - 08:55
राहिले रे अजून देश किती? ट्वीटरावर तुझाच मेस किती! आजची रात्र ब्रिक्स देशांची आज टोप्या किती नि ड्रेस किती ? मी कसे शब्द थोपवू त्यांचे? भाविका! लपवशील फेस किती? ट्वीट माझे विरंगुळा त्यांचा ट्रॉल्सना मी करेन फेस किती? बोलताना कुणीतरी हसले पेटले भक्त ते विशेष किती! हे असे गेम? ही अशी भाषा? मी धरावे अजून वेश किती? रोज त्यांना करून ब्लॉक, सख्या! मी करू पोलिसांत केस किती? -- स्वामी संकेतानंद ९ जुलै, २०१५ ( पळतो आता................)

प्रतिक्रिया द्या
5899 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ए
एस Mon, 07/13/2015 - 09:15 नवीन
हाहाहा! पळा पळा... या देशांच्या यादीत अधूनमधून 'भारत' याही गरीब बिचार्‍या देशाचा समावेश असला म्हणजे मिळवले!
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 07/13/2015 - 09:38 नवीन
व्यक्तिश: मी मोदींच्या विदेशनितीचा फ्यान आहे. नुकताच केलेला मध्य आशियाई देशांचा दौरा हा मास्टरस्ट्रोक आहे. आधीच्या सगळ्याच शासनांनी तिकडे दुर्लक्ष केले. खरे तर यु एस एस आर च्या विघटनानंतरची पोकळी भरायला भारताने पुढाकार घ्यायला पाहिजे होता. मोदींचे सगळेच दौरेच आवश्यक आहेत.भाषणात मोदींचे क्वचित वाहत जाणे क्षम्य नाही(पंतप्रधान आहेत ते) पण एकदंर दौरे भारतासाठी लाभदायक ठरतील. पण याचा अर्थ आम्ही दोन-चार जोक मारू नये असा होत नाही.. ;) आणि उरलेले शेर मोदींपेक्षा जास्त भक्तमंडळींवर किंवा ट्रॉल्सवर आहेत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Mon, 07/13/2015 - 09:58 नवीन
शेम शेम. बाकी आधीच्या सरकारांनी मध्य आशिया आणि एकूणच परदेशनीतीकडे दुर्लक्ष केले हे म्हणणे पुरेशा माहितीअभावी आले असावे. मध्य आशियात भारताचा सामरीक विमानतळ आणि सुखोई स्क्वाड्रन आहे. अजूनही मुद्दे आहेत, पण कवितेचा लाईट मूड घालवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Mon, 07/13/2015 - 10:07 नवीन
माहीत आहे मला. तरीही त्या भागाकडे आपण नव्वदीनंतर 'पुरेसे लक्ष' दिले नाही यावर ठाम आहे. :) असो. चर्चेचा हा धागा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
स्वामी संकेतानंद Mon, 07/13/2015 - 10:11 नवीन
आणि हो, एकूणच विदेशनितीकडे पूर्वीच्या शासनांनी दुर्लक्ष केले असे म्हणायचे नाही, ते विधान फक्त मध्य आशियाबद्दल होते.. मनमोहनसिंग स्वत: बरेच सक्रीय होते. कुठलाही पंतप्रधान परराष्ट्र धोरणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही हो.. :) असो. असो...असोच.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
प
पैसा Mon, 07/13/2015 - 09:18 नवीन
खिखिखि! खुखुखु!! खोखोखो! ख्याख्याख्या!!!! या निमित्ताने पंतप्रधानांच्या स्वगताला "तुम तो ठहरे परदेसी" गाणे वाजवून मार खाणार्‍या बँडवाल्यांबद्दलचा जोक आठवला!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 07/13/2015 - 09:21 नवीन
आणी बिनपाण्याने.. पुलेशु चमन नाखु
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 07/13/2015 - 09:30 नवीन
ट्वीटरावर तुझाच मेस किती!
मेस म्हणजे?
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 07/13/2015 - 09:33 नवीन
सावळागोंधळ... एम इ एस एस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 07/13/2015 - 09:40 नवीन
आपण पुणे महापालिकेत उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत हे विसरून अमेरिकेची आर्थिक घडी बसविण्यासाठी काय करायला पाहिजे यावर लेक्चर झोडता आले पाहिजे. त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीवर-- आपल्याला कळो की न कळो, त्यामागची गुंतागुंत आपल्या कितीही प्रकाशवर्षे डोक्यावरून जाओ, टिका करता आली पाहिजे. अन्यथा पुरोगामी, विचारवंत, विश्लेषक इत्यादी इत्यादी कसे म्हणवता येणार? एकदम रद्दड.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 07/13/2015 - 10:04 नवीन
विनोदबुद्धी देगा देवा| कमेंटलाइकांचा रवा|| कृपया वर मी स्वॅप्स ह्यांना दिलेला प्रतिसाद वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
व
विशाल कुलकर्णी Mon, 07/13/2015 - 10:18 नवीन
तथास्तु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
ख
खेडूत Mon, 07/13/2015 - 11:32 नवीन
उंदीरमामांचा उप्रोध हाय ओ त्यो! बाकी कविता आवडली . पुकप्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/13/2015 - 11:17 नवीन
स्वामिज्जी की म'हान रचनांएं। :-D
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 07/13/2015 - 11:22 नवीन
खिक्क्क! काय ओ स्वामीजी? आज एका देशाचा उद्या दुसऱ्या देशाचा ऎसे दौरे पंतप्रधान स्वत: ठरवून जातात का? की सगळा सेट अप असतोय आणि मुख्य म्हणजे त्यामागे काही उद्देश्? ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 07/13/2015 - 11:42 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा