वर्तुळ
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न …
चू. भू. दे. घे.
प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित
वर्तुळ
वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही
आयुष्य व्यापून टाकेल इतका
कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही ….
अपुरेपणाच्या विस्तृत्वाला
कोणतीच रेषा छेदत नसते
कितीही 'सुटावं' म्हटलं
प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते ….
वर्तुळाच्या गोलाईचा
कोणताच एक आकार नाही
मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं
कोणतच एक सूत्र नाही ….
गुरफटलेल्या आकृत्यांना
खरंतर स्वत:ची नावंच नसतात
आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना
पत्यांना, गावंच नसतात ….
- शब्दवेडी
फक्त
... आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. या ऐवजी आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना भू-मितींचे , गावंच नसतात …. हे कसं वाटतय पहा बरं. .. नै ...म्हणजे रुपकाला धरलय त्यातच पूर्णविराम दिला तर शेवटी ॥औम शांति:शांति:शांति:॥ म्हणायला कसं ग्गा ग्गार वाटेल..म्हणून सुचवलं.