IIT आणि USA
आजकाल आयआयटी मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 100 ते 250 कोटी प्रतिवर्ष पगार देणार्या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 कोटी प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?
मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\
आपले काय म्हणणे ? मंडळी ?
💬 प्रतिसाद
(104)
श
श्रीरंग_जोशी
Fri, 07/17/2015 - 16:59
नवीन
खूप मोठ्या प्रमाणात नसल्या तरी आयआयटीत झालेल्या उपयोगी संशोधनांच्या बातम्या पूर्वीपासून वाचत आलेलो आहे.
९० च्या दशकाच्या शेवटीत जहाजवाहतूकीत अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणार्या इंडस्ट्रियल रेफ्रीजरेशन सिस्टिम्समध्ये लिक्विड नायट्रोजन वापरून व्यावसायिक दॄष्ट्या उपयुक्त बदल करण्याचे यशस्वी संशोधन आयआयटी मुंबईत झाल्याचे वाचले होते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 07/22/2015 - 11:01
नवीन
नारबा मूर्ती कैतरी बोलणार आणि लोकं डोळे झाकून माना डोलावणार.
जग बदलणारं संशोधन म्हणजे डैरेक्ट हिग्स बोसॉन, कंप्यूटर वगैरेच अपेक्षित आहे काय? अनेक शोध आपल्याकडेही लागलेले आहेत आणि त्यांचा उपयोगही कमीअधिक प्रमाणात झालेला आहे. इतकी जर पडली असेल तर इन्फोसिस वगैरे कंपन्यांऐवजी एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटला का नाय पैशे देत म्हणावं? मूर्ती क्लासिकल लायब्ररीला पैशे देता येतात तर याला काय झालं?
तस्मात असोच.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 07/22/2015 - 20:42
नवीन
हा प्रतिसाद http://www.misalpav.com/node/32069 इकडे पाहिजे काय?
मूर्ती,आय.टी,आय.आय.टी,मोदी... सगळा गुंता झालाय मिपावर.
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Tue, 07/28/2015 - 16:14
नवीन
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5618874217917713977
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3