Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

D — drsunilahirrao, गुरुवार, 07/16/2015 - 06:08
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी अजून खस्ताच खात आहे दुकानदारी पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1646 वाचन

💬 प्रतिसाद (3)
D
dadadarekar गुरुवार, 07/16/2015 - 06:10 नवीन
वृत्त कोणते ?
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao गुरुवार, 07/16/2015 - 06:35 नवीन
लगालगागा/लगालगागा/लगालगागा वृत्त:सती जलौघवेगा
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 07/16/2015 - 08:13 नवीन
दुकानातल्या स्टीकरची आठवण झाली, कि ज्याच्या अर्ध्या भागात, कपाळाला हात लावून रिकाम्या तिजोरीसमोर बसलेला खंगलेला शेट , म्हणत असतो 'मैने सब उधारमें बेचा', उरलेल्या अर्ध्या भागात, गरगरीत ढेरीवरून हात फिरवणारा गल्छबु शेट, इस्त्रीचे कपडे टोपी घालून म्हणत असतो ' मैने सिर्फ नगदमें बेचा'
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा