शरदातला स्वित्झर्लंड : ०८ : टिटलिस-एन्गेलबर्ग, देवदूतांचे क्रिडांगण
इनमिन ४००० वस्तीचे एन्गेलबर्ग गाव किती आधुनिक आणि टापटिपीचे असावे याचा अगोदर अंदाज करणे कठीण होते. पण आता अश्या गोष्टी दिसल्या नसत्या तर मला एक स्विस नागरिक नसूनही चीड आली असती इतपत मनाची तयारी झालेली होती !
.
आल्प्स पर्वतराजीतील टिटलिस हे शिखर आणि त्याचा परिसर एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थल आहे. ३,२३८ मीटर उंचीच्या या शिखराच्या परिसरात अनेक जागतिक स्तरांच्या पर्यटनसेवा असलेली आकर्षणे निर्माण केली गेली आहेत. हे ठिकाण १९०३-०४ च्या हिवाळ्यात पर्यटकांसाठी खुले झाले.
येथे सर्वसाधारण स्की खेळाडूंसाठीही व्यवस्था आहेत. पण, इथले स्की उतार खूप तीव्र असल्याने ते कुशल स्कीपटूंमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. इथल्या अनेक कठीण हिमवाटा धाडसी हायकर्सच्या खास आवडीच्या आहेत.
टिटलिसचे रौर्द्र आणि आश्चर्यकारक सौंदर्य मुख्यतः डोळ्याने आणि कॅमेऱ्याने टिपण्यात खूश होणाऱ्या आपल्यासारख्या बाकी पर्यटकांना तो आनंद उबदार वातावरणात आरामशीरपणे घेता यावा यासाठीही सज्जड व्यवस्था आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षभर तेथे जगभरच्या पर्यटकांची रहदारी चालू असते.
एक हजार मीटरपेक्षा किंचित जास्त उंचीवरचे हे एन्गेलबर्ग जेमतेम ४,००० लोकवस्तीचे गाव टिटलिसच्या सर्व परिसरातल्या आकर्षणांचे केंद्रबिंदू आहे. १९६७ मध्ये लुत्सर्न या मोठ्या स्विस शहराला रुंद रस्त्याने आणि रेल्वेने जोडले गेल्यावर तेथे जाणे येणे सुलभ झाल्यामुळे ते गाव आणि तेथील पर्यटनव्यवसाय दिवसेंदिवस बहरला आहे. जागतिक स्तराच्या सोयीसवलती असल्यामुळे पर्यटनाइतकेच ते व्यावसायिक सभासंमेलनांचे (प्रोफेशनल कॉन्फ़रन्सेसचे) केंद्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे. अप्रतिम सौंदर्यामुळे या जागेची जाहिरात "टिटलिस-एन्गेलबर्ग, देवदूतांचे क्रीडांगण" (MOUNT TITLIS, ENGELBERG, where Angels come to play) अशी केली जाते ! विशेषतः हिवाळ्यात सुंदर रंगीबेरंगी शैलीदार स्की परिधानाने* पेहरलेले स्त्रीपुरुष जेव्हा टिटलिसच्या तीव्र उतारावरून लांबच लांब स्की जंप्स मारत जवळ जवळ उडत जाताना बघताना ते वाक्य मनोमन पटून जाते !...
......
एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०१ व ०२
एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०३
एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०४
एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०५
(* : Helmets, Boots, Jackets, Pants, Goggles, Hats, Gloves, and of course Hi-tech skies... आणि या सगळ्या गोष्टी भडक पण एकमेकाला पूरक आणि आकर्षक रंगाच्या असतात हे सांगायला नकोच !)
या ठिकाणी असलेल्या पर्यटन आकर्षणांची यादी विश्वास बसायला कठीण जाईल इतकी मोठी आहे. पण तेथे जाताना इच्छुकांना वेळेचे नियोजन करायला सोपे जावे म्हणून ती खाली देत आहे (एन्गेलबर्गच्या अधिकृत संस्थळावरून साभार) :
१. वर्षभर उपलब्ध असणारी आकर्षणे :
Indoor and outdoor pool
Ice Sports
Horse-drawn carriage rides
High rope park
Climbing wall
Paragliding
TITLIS Cliff Walk
TITLIS Ice Flyer
TITLIS Glacier Cave
TITLIS Glacier Park
TITLIS Chocolate Shop
Nordic Walking Trails
२. मुख्यतः उन्हाळ्यात उपलब्ध असणारी आकर्षणे :
Hiking
Bike & E-Bike/Hikes
Climbing
Via Ferrata
Picnic areas
Kayaking & Rowing
Fishing
Toboggan run
Golf
Whey Bath
Vitap Parcours
Wildlife watching
३. मुख्यतः हिवाळ्यात उपलब्ध असणारी आकर्षणे :
Ski & Snowboard
Winterhiking
Snowshoeing
Ski tours
Cross Country Skiing
Sledding
Airboarding
Igloo Village
snowXpark
Rope Park
Ski & Snowboardschool
थोडक्यात, एन्गेलबर्ग-टिटलिस हा परिसर सर्व वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले एक मोठे खेळांचे मैदान आहे !
.
एन्गेलबर्ग (देवदूतांचे गाव) ते क्लाईन टिटलिस (छोटा टिटलिस) प्रवास
टिटलिसच्या मुख्य शिखरावर (३,२३८ मीटर) फक्त धाडसी गिर्यारोहकांनाच चढाई करता येते. मात्र त्यापेक्षा जरा खालच्या स्तरावर (३,०२८ मीटर) असलेल्या छोटा टिटलिस या शिखरापर्यंत अगदी शारीरिक समस्या असलेले लोकही जाऊ शकतील अशी वाहतूक व्यवस्था आहे. एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस हा तीन टप्प्यांत केला जाणारा प्रवास एक अनपेक्षित आणि संस्मरणीय पर्यटक आकर्षण आहे ! पहिला टप्प्यात फ्युनिक्युलर किंवा रज्जूमार्ग आपल्याला १,२६२ मीटर उंचीवरील गेर्शनीआल्प येथे घेऊन जाते. प्रवास सुरू झाला की सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेते ते टूमदार एन्गेल्बर्गचे मनोहारी विहंगम दर्शन...
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०१ : एन्गेलबर्गचे विहंगम दृश्य
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०२ : मनोहारी जंगलातून वाटचाल
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०३
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०४
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०५
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०६
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०७ : ट्र्युबसे सरोवर
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०८ : रोटएअर (जालावरून साभार)
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०९ : रोटएअर मधून दिसणारी टिटलिस हिमनदी
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : १० : रोटएअर मधून दिसणारे ट्र्युबसे सरोवर
एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ११
देवदूतांचे क्रीडांगणाचे आणि त्यातल्या प्रवासामार्गांचे रेखाचित्र (जालावरून साभार)
क्लाईन टिटलिस
रोटएअरमधून आपण नाईलाजानेच उतरतो. या प्रवासाच्या अनोख्या अनुभवानंतर आपण जरासे हवेत तरंगतच असतो ! रेस्तराँ, आठवणवस्तूंची दुकाने आणि पर्यटकांसाठीच्या इतर सुविधा असलेली इमारत क्लाईन टिटलिसला आपले स्वागत करते. थोडासा दम घेत, कॉफी आणि काही खाद्यपदार्थ यांची रसद पोटात जमा करून, आपण टिटलिसवर स्वारी करायला ताजेतवाने होतो. इमारतीच्या बाहेर पाय टाकल्या टाकल्या आपण टिटलिस हिमनदी नावाच्या हिमसागरावर अवतरतो. आपल्यासारखे नवशे (स्विस पर्यटन ज्याला पांढरे सोने म्हणते त्या) चारी बाजूला पसरलेल्या भुसभुशीत पांढर्याशुभ्र नवलाईवर बराच वेळ फुदकत बसतात...
क्लाईन टिटलिस : ०१ :
क्लाईन टिटलिस : ०२ :
क्लाईन टिटलिस : ०३ :
क्लाईन टिटलिस : ०४ :
क्लाईन टिटलिस : ०५ : आईसफ्लायर (जालावरून साभार)
क्लाईन टिटलिस : ०६ : हिमझोपडी (जालावरून साभार)
क्लाईन टिटलिस : ०७ : इग्लू (जालावरून साभार)
क्लाईन टिटलिस : ०७ : टिटलिस क्लिफ् वॉक (जालावरून साभार)
क्लाईन टिटलिसहून परतताना : ०१ : हरितसागर
क्लाईन टिटलिसहून परतताना : ०२ : एन्गेलबर्ग
एन्गेलबर्ग ते लुत्सर्न : ०१
एन्गेलबर्ग ते लुत्सर्न : ०२
एन्गेलबर्ग ते लुत्सर्न : ०३
छताच्या लाकडी फळ्यांवर प्रेमिक जोड्यांनी वासू-सपना फॅशनमधे आपापली नावं बदामबाणादि चिन्हांसहित रेखाटलेली पाहून शांत वाटलं.छताच्या लाकडी फळ्यांवर प्रेमिक जोड्यांनी वासू-सपना फॅशनमधे आपापली नावं बदामबाणादि चिन्हांसहित रेखाटलेली पाहून शांत वाटलं.हे मात्र पिलाटस कुल्मला बधितलं आहे :) स्विस बर्फाचे व्यवस्थापन उच्च प्रतिचे आहे. हिवाळ्यातला स्वित्सर्लंड चाळलात तर अनेक वर्षातल्या मोठ्या बर्फाच्या वादळातही सेंट मॉरिट्झ सारख्या हिवाळी पर्यटन स्थानावरचे रस्ते सकाळी सहाला उत्तम अवस्थेत केलेले होते आणि आमची ग्लेशियर एक्सप्रेस एक मिनीट इकडे-तिकडे न होता सगळे आठ तासांचे अंतर मजेत कापत गेली ! नॉर्वेनेही असेच चकीत केले होते. भर हिवाळ्यात जमिनीवर मीटर-दोन मीटर बर्फ साठलेले असताना रस्ते आणि विमानतळ जणू आदर्श हवामान असल्यासारखे चालू होते !