बाहुबलीच्या निमित्ताने …
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?
तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात?हा प्रश्न खरेतर किती मराठी मंडळी मराठी चित्रपट बघतात? असा हवा आहे ;)