Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

श — शब्दबम्बाळ, Wed, 07/22/2015 - 16:48
सध्या चांगलाच पाऊस सुरु झालाय, त्याच्याकडे पाहताना काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी आठवल्या. इथे प्रकाशित करतो! कधी पाऊस म्हणजे वाहणारे ओढे आणि रस्त्यांवरती पाणी, तर कधी थांबलेल्या गाड्या आणि रेडिओवरची गाणी! कधी पाऊस म्हणजे पत्र्यांचा आवाज आणि कोसळणाऱ्या सरी, तर कधी नाचणारी मुले आणि भिजण्यातली गम्मत खरी! कधी पाऊस म्हणजे नवीन रेनकोट आणि खिश्याला लागलेली कात्री, तर कधी कोणाचे चिंब ओले कपडे आणि हरवलेली छत्री! कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी, तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी… प्रत्येकासाठी पाऊस वेगळा आणि वेगळे त्याचे पाणी, थोडे मी हि भिजावे म्हणतो पण सोबत असावे कोणी! आशिष

प्रतिक्रिया द्या
1711 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
रातराणी गुरुवार, 07/23/2015 - 16:00 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 07/23/2015 - 16:18 नवीन
क्या बात!!!!!
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 07/24/2015 - 11:59 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 07/24/2015 - 16:35 नवीन
कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी, तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी….....टचिंग.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 07/25/2015 - 21:25 नवीन
कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी, तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी… हे मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा