हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी.
Primary tabs
कोलंबीची निर्मिती करताना परमेश्वर नक्कीच खुशीत असला पाहिजे.त्याशिवाय इतकी सुंदर निर्मिती होत नाही.आणि जसे,’पानी रे पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलादे मुझे उस जैसा.’ तशीच कोलंबीही ज्या मसाल्यासोबत कराल त्याच्याशी जमवून घेत स्वतःची चव,’बिलकुल उस जैसी ’करून सोडते.कमीत कमी मसाले हेही या कोलंबीच्या तिसऱ्या अध्यायाचे वैशिट्य,तळलेली कोलंबी तुम्ही खूप खाल्ली असेल .एकदा या पद्धतीने करून पहा.पुन्हा पुन्हा करावीशी आणि खावीशी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते.अतिशय उत्तम स्टार्टर.
माझ्या एका सारस्वत मैत्रिणीची आई याबाबतीत माझी गुरु.अतिशय कमी तेल हा पण या पाककृतीचा खास विशेष गुण.चला तर तुमच्या तोंडाला वर्णनानेच पाणी सुटण्याची वाट न पाहता मी कृती सांगायला सुरुवात करते.चला तर साहित्य गोळा करा.
साहित्य:-
हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी.
१. २० कोलंब्या.
२. अर्धी वाटी कोथिंबीर+दोन हिरव्या मिरच्या+पेरभर आले+१५/२० लसूणपाकळ्या.
३. एक चहाचा चमचा चिंचेचा कोळ.
४. चवीनुसार मीठ.
५. तेल.
कृती:-
१. कोलंबी सोलून ,काळा धागा काढून धुवून घ्यावी.
फोटो खाली दिला आहे..
२. कोथिंबीर+मिरच्या+आले+लसूण+काळीमिरी बारीक वरून घ्यावे, पाणी न घालता वाटायचे, हे लक्षात ठेवायचे.धुतलेल्या कोथिंबीरीचा ओलावा पुरतो.
३. हे वाटण+चिंचेचा कोळ +मीठ एकत्र करून कोलंबीला चोळून १५ ते २० ठेवावे.
४. नॉनस्टिक तव्यात दोन चहाचे चमचे तेल घालून तवा फिरवून ते सगळीकडे पसरवून घ्यावे.
५. तेल चांगले गरम झाले की,त्यात कोलंब्या रचाव्यात. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवाव्या,पाच मिनिटांनी झाकण कडून उलटाव्यात.आता झाकण नाठेवता दुसरी बाजू होऊ द्यावी.सगळे पाणी आटले की गॅस बंद करावा.ही कोलंबी कडक तळायची नाही,एवढे लक्षात ठेवायचे.
६. पुढची कृती सांगायची गरज मला वाटत नाही,ती तुम्हाला चांगलीच माहिती आहे.करा तर सुरुवात.
आहाहा... कोलंबी फेवरेट आहे माझी. तोंपासु.
मस्तच पाककृती.... पण फोटो ब्लर आलेत, त्यामुळे फोटोंचा आस्वाद घेता आला नाही !!
दु दु तायडे.
आता पुण्यात येताना सगळे पदार्थ करूँ करुन आण.
तो पै पण एकप्रकारचा टोलच असतो.
माझ्याइथून जाणार असाल तर एक डबा भरुन एक्ष्ट्रा घेउन येणे...कोलंबी माझा सगळ्यात आवडता नॉन्व्हेज प्रकार आहे :)
आता नेमके पोस्टिंग वर कोलंबी कुठून आणावी!! नॉस्टेल्जिक झालोय! आता एखाद सुट्टी मुंबई ला घालवणे आले !!
बापूसाहेब
कोलंबीच्या ऐवजी चिकनचे तुकडे वाफवून घ्या आणि त्यात टाका. मंगलोर कडच्या आणि केरळी सैनिकांकडून हे मी ऐकले होते. कारण काश्मीर किंवा पुर्वांचलात समुद्रातील मासे किंवा कोलंबी मिळत नाही. (नदीतील माशांना अशी चव येत नाही असे त्यांचे म्हणणे). तेंव्हा नारळ घातलेले किंवा अशा कोथीम्बिरीच्या चटणीचे पदार्थ खावेसे वाटले कि ते असे करत असत.निदान दुधाची तहान ताकावर भागवता येते.
मस्तच
नुसते नाव वाचूनच लाळ सुटली होती!
छळवाद आहे राव!
तळलेली कोलंबी...
आवडते ताेंडीलावणे आहे. आणखी पाकृ येऊ द्यात.
मस्तच आहे तै. छानच होणार.
कोलंबीच्या नवनवीन पाककृतीबरोबरीने तुमच्या लिखाणातला खमंगपणासुद्धा वाढत चाललाय, सुरुवातच अशी खास केलीय, अहाहा!
आणि कोलंबी... ती तर असतेच तशी!
छळवाद आहे नुसता :(
पण फोटो तेवढे क्लियर टाका ब्वॉ. धुसर फोटो पाहून खुप निराशा होते.
मस्त पाकृ! अगदी सोपी आहे!
मस्त पाककृती.
सुरन्गी, अजुन एक सांगायचं होतं की ती कोलम्बीची नारळा च्या रसतलि कढी मी काल करून बघितली. ही कढी आमच्या घरात अगदी हिट झाली. मुलांनी आणि त्यांच्या बाबांनी मिटक्या मारत सगळी कढी सफाचट केली. त्या मस्तं आणि सोप्या रेसिपी बदद्ल खूप खूप आभार. आता ही रिसेपी पण नक्कीच करून बघणार.
कहर यम्मी !
प्रचंड त्रास होतो ओ ............
अरे वा, अशी करतात का कोळंबी तळुन.
आता तळतेच तीला! जाते कुठे?
खपल्या गेलो आहे.
तोंडाला पाणी सुटल, मस्त
Ekdam jhakkas
अहो त्तै
श्र्रावन चालु है आम्चा.....
तोंडाला पाणी सुटल ना...........