Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्रात दारुबंदी ?

उ
उडन खटोला
Fri, 07/24/2015 - 08:06
🗣 13 प्रतिसाद
http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-may-go-for-complete-liquor-ban-2107542 या बातमीचा आशय खरा मानला, तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे. मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते. याची कारणे खालीलप्रमाणे - १. जर कायदेशीर दारुबंदी झाली, तर बेकायदेशीर दारुधंद्याला बरकत येईल, व भ्रष्टाचार वाढीस लागेल. कारण अट्टल बेवडे आणि विरंगुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच. २. दारूतून मिळणारा प्रचंड महसूल बुडेल, त्यामुळे सरकारी व प्रशासकीय खर्च चालवण्यास पैसे अपुरे पडू शकतात. याचे कारण अनधिकॄत आकडेवारी नुसार सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी ४०% उत्पन्न दारू व तंबाखूजन्य पदार्थान्च्या वरिल करांमधून येत असते. साहजिकच विकासकामाना निधीअभावी खीळ बसेल. ३.महाराष्त्ट्रात येणार्या पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पर्यटन व्यवसायाला फटका बसेल. ४.राजकीय दॄष्ट्या भाजप ला हा निर्णय धोकादायक ठरेल कारण दारूबंदी केल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो. आपली मते अपेक्षित.

प्रतिक्रिया द्या
6184 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रसाद१९७१ Fri, 07/24/2015 - 08:14 नवीन
धोकादायक आहे का नाही ते माहीती नाही, पण असला विचार सुद्धा करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. त्या ३ जिल्ह्यातली दारुबंदी ताबडतोब उठवण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 07/24/2015 - 08:14 नवीन
नितीश कुमारांनी परत निवडून आल्यास बिहारमध्येही दारूबंदी करायचे आश्वासन दिले आहे म्हणे. आणि गेली १० वर्षे सत्तेत असूनही त्यावेळी का दारूबंदी केली नाही याचे उत्तर अर्थातच ते देणार नाहीत. असो. असल्या गोष्टी कधी यशस्वी होत नसतात. त्यांना फाट्यावर मारावे.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 07/24/2015 - 09:33 नवीन
पक्षाला निधी मिळायचा मार्ग मोकळा झाला. समस्त लिकर लॉबी हॉटेल बार वाले आता आपली धनशक्ती पणाला लावणार. नुसती हूल उडवून द्यायची आणि मग गंमत पहायची हा राजकारणातील जुना खेळ झाला.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Fri, 07/24/2015 - 09:48 नवीन
हे सरकार बंदी घालण्यात आघाडीवर आहे. बंदीचा अर्थ स्पष्ट असतो... हप्ता गोळा करणे. साईबाबा बंदी गोमांसबंदी गोहत्याबंदी शिकवणीबंदी दारुबंदी
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/24/2015 - 09:52 नवीन
निषेध ! आर्य सनातन वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्हणुन मी ह्या असल्या आतातायी दारुबंदीचा आणि त्या योगे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा घालणार्‍यांचा निषेध करतो ! ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/24/2015 - 10:13 नवीन
खिक्क....शिवसेनेचा सगळ्यात जास्त फायदा होइल असे झाले तर...भाजपा स्वतःच्या पायावर स्वतःच कुर्हाड मारून घेइल
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 07/24/2015 - 10:37 नवीन
काळजी नसावी.
+ ज्यांना दारू प्यायचीच नाही ते लोक चर्चा करीत बसत नाहीत. + ज्यांना दारू प्यायचीच आहे (त्यांना बंदीचाच काय कशाचाच फरक पडत नाही उदा गुटखा प्रेमी) असे मदीराप्रेमी लोक कसल्याही बंदीची चर्चा न करणे यात धन्यता मानतात. + ज्यांना दारूशिवायही जग आहे, असे शिकलेले लोक कुठलिही मतं (उदा: महाभारतकाळी दारू होती/नव्हती हा दावा) इतरांवर लादून किंवा मांडून नवीन वादाला जन्म घालत नाहीत.
संकल्पना श्रेय का.पा. याचकांची पत्रे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 07/24/2015 - 10:44 नवीन
नाखु काका, याची एक टेम्प्लेट बनवून कॉपीराइट करुन घ्या. दारु आणि बंदी ऐवजी राजकारण,प्रेम, देव, धर्म, अशा हुकमी विषयांसाठी याचकपत्रे पाठवता येतील. बघा दारु ऐवजी राजकारण हां शब्द व आनुषंगिक बदल करुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 07/24/2015 - 11:07 नवीन
शिरसांवद्य. अलिकडच्या धाग्यात अशी (तीव्र) मागणी आहे खरी. आज्ञाधारक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मी-सौरभ Fri, 07/24/2015 - 12:22 नवीन
मा. मुख्यमंत्र्यांनी सरकारचा असं करण्याचा विचार नसल्याचे निवेदन केले आहे. तेव्हा 'नो फिकर' तुमचा खटोला उडन घेनार 'क्विकर'
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Fri, 07/24/2015 - 12:29 नवीन
महाराष्ट्रात दारुबंदी ? कैच्या कै
  • Log in or register to post comments
श
शंतनु _०३१ Fri, 07/24/2015 - 14:47 नवीन
एकंदरीत मिळणारा महसूल दारूचे वाढते (उपभोग) प्रमाण पाहता दारू बंदी हे कोणत्याही सरकारला परवडणार नाही, व्यसनी माणूस तर बंदी असताना दारू मिळवण्या साठी कोणत्या थराला जाईल याची कल्पना न केलेलीच बरी
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Fri, 07/24/2015 - 14:55 नवीन
व्यसनी माणूस तर बंदी असताना दारू मिळवण्या साठी कोणत्या थराला जाईल तसलं काही होणार नाही कारण "दारू बंदी होऊ नये म्हणून सरकार आधीच कोणत्याही थराला जाईल" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंतनु _०३१
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा