Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा पाऊस

र — रातराणी, Fri, 07/24/2015 - 09:55
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?

प्रतिक्रिया द्या
2339 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ए
एक एकटा एकटाच Fri, 07/24/2015 - 10:15 नवीन
मस्त मस्त मस्त!!!!!!!!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 07/24/2015 - 19:05 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/24/2015 - 19:15 नवीन
सुंदर!!! रोमँटीक!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/24/2015 - 19:20 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 07/25/2015 - 04:34 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 07/25/2015 - 07:31 नवीन
सुरेख..
बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?
वा, वा..
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 07/25/2015 - 10:59 नवीन
सुंदर कवीता.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 07/25/2015 - 12:01 नवीन
मस्त आहे कविता!
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/11/2015 - 14:38 नवीन
छान कल्पना. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा