Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिरवाई..!

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 07/24/2015 - 12:54
https://fbcdn-photos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-0/11011683_874883005931320_1886834214894539045_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=e150fb00433e127ce5eb77b63cd14a3d&oe=56498752&__gda__=1448309304_9470a65a2ebf713595aaffabdcccfc60 पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले! रंगांचिहि अशी नशा की गुंतत गुंतत जावे मुळचा आपुला रंग टाकुनि त्या रंगाचे व्हावे! व्यक्तित्वाला उरू नये मग मुळचा कुठला रंग व्यक्तित्वाने व्हावे त्याचा खराखुरा सत् संग! आत्म दुजा अन देह वेगळा भलते बेचव कोडे देहधारणा आत्मचि असता का हे वेडे चाळे? आत्मरूप मी निसर्गदेहि हिरवा हिरवा झालो मनी दाटता हिरवाई ती तुमच्या भेटि आलो साज रोजचे टाकुनि द्या हो तुम्हिही उचला रंग देवाजीच्या बागेमधला तुमचा एक अभंग चला गड्यांनो हिरवाईला डोळे भरुनी पाहू काही क्षण तरि आपुले नाही तिचेच होऊन राहू! https://scontent-lax1-1.xx.fbcdn.net/hphotos-xft1/t31.0-8/11246845_874845199268434_1853066153818177522_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

प्रतिक्रिया द्या
9828 वाचन

💬 प्रतिसाद (28)
क
कंजूस Fri, 07/24/2015 - 13:05 नवीन
समर्पक आणि सुंदर.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/24/2015 - 13:15 नवीन
बुवा मस्तंय कविता! छायाचित्रही समर्पक टाकलीत.
आत्म दुजा अन देह वेगळा भलते बेचव कोडे देहधारणा आत्मचि असता का हे वेडे चाळे
ही ओळ खूप आवडली. मला वाटते हे ज्ञानेश्वरांचे चिद्विलासवादी तत्वज्ञान आहे. वेदांती म्हणतात ब्रह्म आणि माया भिन्न आहेत. तर ज्ञानेश्वर म्हणतात माया ही देखील ब्रह्मच! बरोबर आहे ना?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 07/24/2015 - 13:37 नवीन
जबरद्स्त कविता. आगगाडीत लीवलीत काय? तसे असेल तर सलाम...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/24/2015 - 14:05 नवीन
हरिहरेश्वरला आहे. हे मी लिहिलच नाहिये,तिथे त्या पावसानी हिरवाईला ही कविता दिली आणि तिनी मला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्यारे१ Fri, 07/24/2015 - 14:37 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सनईचौघडा गुरुवार, 07/30/2015 - 09:40 नवीन
आगगाडीत लीवलीत काय? >>> मी चुकुन आग लावलीत काय असे वाचले? बाकी कविता सुरेख हो , आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
स्पंदना Fri, 07/24/2015 - 13:41 नवीन
सुंदर रचना आत्मुस!! (पण एक सांगितल्याशिवाय रहावत नाही. रसभंग नाही करायचा तरीही; ते हिरवे पाणी हे रासायनिक खतांच्या अतिरेकाचे फळ आहे. युरीया घालायचा थांबवा शेतातुन अन गांडुळ खत वापरले तर ही नको असलेली पाण्याची हिरवाई जाऊन निव्वळ शंख पाण्यात हिरव्या छब्या पहात झाडे डोलु लागतील.)
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 07/24/2015 - 13:50 नवीन
छान कविता गुर्जी. बरे झाले फोटो टाकले, नै तर काही लोकांनी, ऐका विशिष्ठ रंगाच्या वारंवार केलेल्या उल्लेखाकडे पाहून, गुर्जीनी 'त्या विशिष्ठ रंगाचा' धर्म तर स्वीकारला नाही नं ? अशी राळ उठवली असती.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 07/24/2015 - 14:32 नवीन
खूप छान जमलीय.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/24/2015 - 15:20 नवीन
मस्तच हो गुर्जी. कोकणात गेल्यामुळे चांगलीच त्रुप्ती होत असेल सध्या तुमची.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/24/2015 - 16:56 नवीन
@ चांगलीच त्रुप्ती होत असेल सध्या तुमची.>> कळलं आपणास काय म्हणायचय ते! :-\ दुत्त दुत्त! :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Fri, 07/24/2015 - 19:30 नवीन
सुरेख कविता आणि फोटो!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 07/24/2015 - 21:35 नवीन
अप्रतिम कविता आणि सुरेख फोटोज.. भारावुन टाकणारा निसर्ग तुम्ही शब्दात बांधलात :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/25/2015 - 15:22 नवीन
जडभरत @तर ज्ञानेश्वर म्हणतात माया ही देखील ब्रह्मच! बरोबर आहे ना? >> होय.बरोबर. पण तरिही हेतू भिन्न असणार. मला ज्ञानेश्वरांची भुमिका काहिही माहित नाही. मी म्हणतोय त्यापाठीमागे चार्वाकाचा देहात्मवाद हात जोडून उभा आहे. :) -------------------------------------------------------------------------------------------------------------- स्पंदना @सुंदर रचना आत्मुस!! >> धन्यवाद. @(पण एक सांगितल्याशिवाय रहावत नाही. रसभंग नाही करायचा तरीही; ते हिरवे पाणी हे रासायनिक खतांच्या अतिरेकाचे फळ आहे. युरीया घालायचा थांबवा शेतातुन अन गांडुळ खत वापरले तर ही नको असलेली पाण्याची हिरवाई जाऊन निव्वळ शंख पाण्यात हिरव्या छब्या पहात झाडे डोलु लागतील.)>> अगदी खरे. आणि सहमतंही. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पगला गजोधर @छान कविता गुर्जी. बरे झाले फोटो टाकले, नै तर काही लोकांनी, ऐका विशिष्ठ रंगाच्या वारंवार केलेल्या उल्लेखाकडे पाहून, गुर्जीनी 'त्या विशिष्ठ रंगाचा' धर्म तर स्वीकारला नाही नं ? अशी राळ उठवली असती.>>> ह्हा ह्हा ह्हा ! लिहिताना माझ्याही मनात तसेच काहिसे आलेले होते. पण फोटो टाकण्यामागे माझा उद्देश कवितेशी त्यांचा असलेला सांधा स्पष्ट व्हावा एव्हढाच होता. :) ------------------------------------------------------------------- स्रुजा @अप्रतिम कविता आणि सुरेख फोटोज.. भारावुन टाकणारा निसर्ग तुम्ही शब्दात बांधलात.>> होय . मि ही बांधलो गेलो त्याच्याशी. :) ---------------------------------------------------------------------------- बाकिही सर्व वाचक/प्रतिसादकांचे धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
सदस्यनाम Sat, 07/25/2015 - 15:26 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Sat, 07/25/2015 - 20:34 नवीन
आत्मुदा सुरेख हिरवाई लेखणीतून उतरावलित बघा ---^---
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/26/2015 - 02:01 नवीन
धन्यवाद रे लिल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
ए
एक एकटा एकटाच Sun, 07/26/2015 - 06:12 नवीन
मस्तच आहे ही हिरवाई "आल्हाददायक"
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 07/26/2015 - 06:31 नवीन
रचना आवडली. दुसरा फोटो तर अप्रतिम.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 07/26/2015 - 07:11 नवीन
निळ्या निळाई अवचित हे कृष्णजलद आले सरसर थरथर त्यातून अमृतथेंब निमाले तृषार्त तप्त विदग्ध व्याकुळ तेही सरले मनसृष्टीचे गाभारे भरून फुलून गेले पाननपानही आता गच्चहिरवे जहाले मी हिरवा, तू हिरवी, हिरवे जग सारे ल्याले!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/26/2015 - 09:15 नवीन
व्वाह्व्वा! मस्स्स्स्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एक एकटा एकटाच Sun, 07/26/2015 - 09:32 नवीन
हे ही सुरेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाखु Mon, 07/27/2015 - 13:09 नवीन
अलगद उतरली आहे काव्यात !!!
देवाजीच्या बागेमधला तुमचा एक अभंग
मी कवीता ठार अडाणी अजून शोधतोय काही लिहिण्यायोग्य, अजूनतरी योग आला नाही !! जरी वेष बावळा अंतरी नाना (रंग) कळा वाल्या बुवांचा पंखा नाखु
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 07/27/2015 - 15:44 नवीन
वाह! मस्तच!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 07/28/2015 - 18:39 नवीन
वा! वा! हिरवीगार कविता.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 07/31/2015 - 18:20 नवीन
हिरवे पाणी सोडून बाकी सगळे आवडले !
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/11/2015 - 14:37 नवीन
काही क्षण तरि आपुले नाही तिचेच होऊन राहू! छान रचना. आवडली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 08/11/2015 - 15:21 नवीन
सुरेख कविता बुवा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा