Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बायोस्कोप... पाहिला का?

श
शब्दबम्बाळ
Fri, 07/24/2015 - 17:15
🗣 2 प्रतिसाद
मागच्या आठवड्यात बायोस्कोप हा चित्रपट प्रदर्शित झाला. एकाहून एक सरस कवी आणि दिग्दर्शकांनी मिळून केलेल्या या चित्रपटाबद्दल फार उत्सुकता आहे. ४ कवितांपासून कथानक तयार करून चित्रपट बनवणे हि संकल्पना देखील छान वाटली पण बजरंगी भाईजान या चित्रपटासोबत हा का प्रदर्शित केला गेला कोणास ठाऊक! आठवड्याभरात काही कुठे बातमीच दिसली नाही बायोस्कोपबद्दल... आपल्यापैकी कोणी हा चित्रपट पहिला का? पहिला असेल तर कसा आहे सांगावे. ४ कथा असल्याने एखादी खूप छान आणि एखादी यथा तथा असे होऊ शकेल त्यामुळे त्यावर इथे चर्चा झाली तर आवडेल. कारण मराठी चित्रपट जरी देशोदेशीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावत असला तरी भारताच्या दक्षिणेमध्ये त्याचा शिरकाव व्हायला बराच काळ लागेल असे वाटतंय! तोपर्यंत आम्ही अशा चर्चान्मधुनच तो पाहण्याचे समाधान घेतो! :)
वर्गीकरण
चित्रपट

प्रतिक्रिया द्या
4059 वाचन

💬 प्रतिसाद (2)
र
रोहन अजय संसारे Fri, 07/24/2015 - 18:49 नवीन
रविवारी च पहिला खूप चं छान आहे. एक वेगळा विषय मनून पाहायला आवडला. ४ कथा खूप च मनाला लागल्या. तुमी पण पहा आवडेल तुमाला.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 07/25/2015 - 16:44 नवीन
व्वा , सुरेख प्रतिसाद! अ) एक वेगळा विषय मनून पाहायला आवडला >> तुम्हाला वेगळा "प्रयोग" म्हणायचे आहे का ? कारण जवळ जवळ सर्वच सिनेमात वेगवेगळे विषय असतात ! ब) ४ कथा खूप च मनाला लागल्या. >> तुम्हाला कथा मनाला "भावल्या" असे म्हणायचे आहे का ? कारण सिनेमाची कथावस्तु रद्दी असेल तर तिकिटाचे व पॉपकॉर्नचे पैसे वाया गेल्या या गोष्टी मनाला लागुन राहतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहन अजय संसारे

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा