Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नुसतेच शब्द ओठी

व — वेल्लाभट, Wed, 07/29/2015 - 11:32
ब्लॉग दुवा हा. नुसतेच शब्द ओठी रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी मी आवरू न शकलो आवेग भावनेचा अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी एका दिशेस वळती माझे विचार सारे एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी - अपूर्व ओक सर्व हक्क राखीव.

प्रतिक्रिया द्या
2338 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पथिक Wed, 07/29/2015 - 12:15 नवीन
छान ! आवडली गझल.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Wed, 07/29/2015 - 13:57 नवीन
छानंय! आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/30/2015 - 08:45 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 07/30/2015 - 13:19 नवीन
मस्तच झालीये. चौथा आणि सहावा शेर आवडला. फक्त मतल्याच्या दुसर्‍या ओळीत वृत्तभंग झालाय तो सुधारून घ्या. :)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/30/2015 - 13:57 नवीन
डन ! धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Fri, 07/31/2015 - 09:14 नवीन
आता छान वाटतेय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
यशोधरा Fri, 07/31/2015 - 12:54 नवीन
शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी
सगळ्यात सुरेख!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Fri, 07/31/2015 - 14:40 नवीन
अगदी अगदी ! जमलंय वेल्लाभट, खुप आवडली गझल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शब्दबम्बाळ Tue, 08/04/2015 - 15:46 नवीन
इथे मतला दोन वेळा आला आहे, मग हा हुस्नेमतला होतो का? इथे मला गजलेबद्दल चांगली माहिती मिळाली! फक्त हिंदी मध्ये आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/04/2015 - 18:24 नवीन
शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी वाह्ह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जीवन से भरी तेरी आँखें... :- Safar { किशोर कुमार }
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/11/2015 - 14:06 नवीन
रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी वरील कल्पना आवडल्या. थोडेसे मीटर गडबडलेले आहे एखाद ठिकाणी.. पण तशी रचना छानच. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा