कट्टा........!!!!!!
कट्टा.............
मित्रांच्या मैफिलीत
होता तो ही रंगलेला
हास्यविनोद अन टाळ्यांनी
होता तो ही सजलेला
तेथे जमणार्या सार्या
अवलियांची तो "जान" होता
येणार्या जाणार्यामध्ये
त्याला कौतुकाचा "मान" होता
टिंगल-टवाळी, शेरो-शायरी
किस्स्यांचा तेथे बाजार होता
राग, द्वेष, मत्सर, अविश्वासाला
तेथे किंचितही थारा नव्हता
हरएक पिकनीक ही
त्यालाच विचारुन ठरवलेली
प्रत्येक पार्टीची कुणकुण
सर्वप्रथम त्यालाच कळलेली
एरियामधली नवी आयटम
ह्यानेच पहिली हेरलेली
गुजरणारी हरएक बाला
वहिनी नाहीतर भाभी ठरलेली
आजवर जे कुणा सांगितले नाही
ते इथे बोलायची मुभा होती
सोल्युशन मिळायची गॆरेंटी नाही
पण टेंशनगुलची हमी होती
अश्या चतुरंगी बहुढंगी दुनियेत
रमताना दिवस मजेत जात होते
पण नेहमी हे असेच रहावे
बहुधा नियतीच्या मनात नव्हते
NOKIA ला BB मध्ये बदलताना
फ़्री Talktime हि आता Roaming झाला होता
रंगली असती अजूनही ती ...मैफिल
पण एक एक "शायर" आता उठत होता
हरवुनी गेल्या आठवणीच्या सावल्या
तरी तो अजुनी तेथेच आहे
फिरुनी पुन्हा रंगेल तीच मैफिल
अजुनही त्या वेड्या जीवाला आस आहे
💬 प्रतिसाद
(8)
ज
जडभरत
गुरुवार, 07/30/2015 - 13:49
नवीन
:(
अरेच्चा!!!
होतं असं कधी कधी. जुन्या मित्रांची आठवण येते.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 07/30/2015 - 18:19
नवीन
छान लिहिलय.
थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती पण ती दिसत नाहीये म्हणून पुन्हा देतेय.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 07/31/2015 - 08:02
नवीन
चांगलं जमलंय....
फिर इसी राहगुजर पर शायद
हम कभी मिल सके मगर; शायद
जो भी बिछडे वो कब मिले है फराज़
फिर भी तू इंतजार कर; शायद
अहमद फराज़ यांच्या या ओळी आठवल्या...
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Wed, 08/12/2015 - 20:39
नवीन
वाह!!!!!
- Log in or register to post comments
स
सटक
Wed, 08/12/2015 - 22:21
नवीन
जगजीतजींनी म्हटली पण सुंदर आहे!
मला अजून एक 'शायद' वरुन आठवणारी गझल म्हणजे..
अबके हम बिछडे तो फिर कभी शायद मिलें !
जिस तरह सूखे हुवे फूल किताबों मिले !!
गम-ए-दुनिया भी गम-ए-यार में शामिल कर लो !
नशा बढता है शराबों में जो शराबों मिले !!
मतला:
अब ना वो मैं हूं ना तू है न वो माझी है फराज !
जैसे दो सायें तमन्नाओंके सराबों मिले !!
मेहदी हसन....लाजवाब! पुन्हा फराज!
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 08/13/2015 - 11:55
नवीन
Class
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Wed, 08/12/2015 - 20:39
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
गुरुवार, 08/13/2015 - 16:21
नवीन
छान
- Log in or register to post comments