Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अव्यक्त

र — रातराणी, Tue, 08/04/2015 - 10:16
कितीदा तरी रे आले होते, खूण ओळखीची शोधत होते, नाहीच झाली पण भेट आपली, मी उम्बर्यातच थिजले होते. किती जपून आणले शब्द होते, तुझ्या ओंजळीत ते द्यायचे होते, मौनात वेदना डोळ्यांत विझल्या, शब्द कधीच रे निसटले होते. किती अंतर चालून आले होते, आता कुठे बघ विसावले होते, दिशा साऱ्या का अंधारून आल्या, की गावच तुझे बदलले होते. अस्पष्ट जे मनास स्पर्शुन गेले होते, मूर्त रूप मी त्याला देत होते, कधीच नाही केले व्यक्त तू ज्याला, ते अव्यक्त प्रेम माझे आयुष्य होते.

प्रतिक्रिया द्या
2524 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ज
जडभरत Tue, 08/04/2015 - 10:57 नवीन
छान. पहिलं कडवं खूप आवडलं.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Tue, 08/04/2015 - 11:03 नवीन
उंबर्यातच थिजून द्विधा मनस्थितीत हाताने साडीचे टोक अस्वस्थपणे हाताळणारी स्त्री डोळ्यासमोर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/04/2015 - 11:16 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 08/04/2015 - 11:45 नवीन
दिशा साऱ्या का अंधारून आल्या, की गावच तुझे बदलले होते. या ओळी विशेष भावल्या. सुंदर !
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 08/04/2015 - 19:24 नवीन
निव्वळ अप्रतिम
  • Log in or register to post comments
म
माहीराज Sat, 10/10/2015 - 07:55 नवीन
खुप छान. .सुरेख
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 10/11/2015 - 12:50 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 10/11/2015 - 15:29 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 10/11/2015 - 15:43 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 10/11/2015 - 16:17 नवीन
गूढ-रम्य काव्य !
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 10/11/2015 - 16:47 नवीन
'असा बेभान हा वारा...' या गीताची आठवण आली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 10/11/2015 - 22:08 नवीन
सर्वांचे धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा