Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैत्र झुलवून बघ

ग — गंगाधर मुटे, Tue, 08/04/2015 - 21:25
मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ

चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
4333 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ज
जडभरत Wed, 08/05/2015 - 03:40 नवीन
छान जमलीय! शर्थ, अटी काही नकोत खुले-खुले सांग इथे अटी शर्थी काही नकोत असं पाहिजे होतं. म्हणजे लय कायम राहील.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 08/06/2015 - 12:19 नवीन
नोंद घेतलीय. बदल करतोय अटी-शर्ती काही नकोत, असे करतोय धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ख
खेडूत Wed, 08/05/2015 - 05:50 नवीन
मस्तच! कविता आवडली . प्रयत्नांची शर्थ असते . इथे अटी ता अर्थाने शर्ती हवे !
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 08/06/2015 - 12:20 नवीन
नोंद घेतलीय. बदल करतोय अटी-शर्ती काही नकोत, असे करतोय धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
प
प्रचेतस Wed, 08/05/2015 - 06:21 नवीन
छान. आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 08/06/2015 - 12:21 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाव आडनाव Wed, 08/05/2015 - 06:23 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 08/06/2015 - 12:21 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
ग
गंगाधर मुटे Sun, 08/07/2016 - 09:44 नवीन
ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात..... त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना...... ऋणानुबंधाच्या मुसळधार पावसासारख्या ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!! - गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Sun, 08/07/2016 - 10:31 नवीन
असे का म्हणताय सर, अहो मैत्रि म्हटलि कि थोडेसे मतभेद कधि कधि असायचेच. ईथे सगळेच तुम्हाला मित्र समजतात.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 08/07/2016 - 14:26 नवीन
आवडली कविता. थोडे प्रवचन - 'ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....' - कितीही होऊ नये असे म्हटले तरी मिपावर थोडेफार वाद होतात लोकांचे. जरी वाद झाला तरी ते लगेच विसरून जावे हे उत्तम. जर जुन्या वादांच्या स्मृती सतत मनात ठेवलात तर विनाकारण मानसिक शांतता निघून जाईल आणी सतत स्कोर सेटलिंग ची संधी शोधत बसाल. कोणतीही व्यक्ती (स्वतःस धरून )100% 'सद्गुणी' नसते हे मान्य केले की एकूणच जीवन सुसह्य होते. प्रवचन समाप्त.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/07/2016 - 15:01 नवीन
मैत्री दिनाच्या सर्व अबाल वृद्ध मिपाकरांना माझ्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ज
जावई Sun, 08/07/2016 - 15:24 नवीन
काका....एक नंबर
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 08/07/2016 - 17:09 नवीन
तरी म्हणायचत! ;) मुटेसर कविता शॉल्लेट! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई
प
पेशवा भट Mon, 08/08/2016 - 08:51 नवीन
छान आहे. मोजत बसू नकोस मित्रा स्पंदनाची धग डोळे मिटून खांद्यावरती मान ठेवून बघ हे जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/08/2016 - 08:53 नवीन
अहाहा, मस्त कविता मुटेसर. आवडली
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Mon, 08/08/2016 - 17:52 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा