शरदातला स्वित्झर्लंड : १२ : जिनिव (जिनिवा)
मी स्वित्झर्लंडच्या प्रेमात पडण्यामागे या तीन दिवसांचा खूप मोठा हात आहे... आणि पुढच्या दर भेटीत हे प्रेम वाढत जावे असेच अनुभव आले. अर्थातच, जेवढ्या ओढीने मी दुसर्या दिवशी सुरू होणार्या अभ्यासक्रमाची वाढ पाहत होतो, तितक्याच ओढीने अभ्यास संपल्यावर प्रवासाच्या उरलेल्या दोन दिवसांत मी करणार असलेल्या जिनिवाच्या भेटीची वाट पाहत होतो.
.
अभ्यासक्रमाचा कालखंड संपला. आता वेळ होती शरदातल्या स्विस सफरीच्या दुसऱ्या भागाची. झुरिक ते जिनिवा या साधारण तीनशे किलोमीटर अंतराला रेल्वेने तीन तास लागतात हे आधीच मिळालेल्या वेळापत्रकावरून माहीत झाले होतेच. शेवटच्या दिवशी किती वाजता सुटका होईल हे माहीत नव्हते. पण स्विस पर्यटनाच्या कृपेने १६:०४, १६:३२ आणि १७:३२ अश्या तीन गाड्यांचे वेळापत्रक मिळाले होते. त्यामुळे निर्धास्त होतो. शेवटचा दिवस असल्याने प्रोफेसरांच्या कृपेने दुपारी दोनलाच कोर्स संपल्याचे जाहीर झाले. त्यामुळे घाई-गडबड न करता १६:०४ ची पहिली गाडी गाठता आली आणि मोक्याची खिडकी गाठून आरामात बसलो. गाडी सुरू झाली तसा मागे धावणारा स्विस निसर्ग पाहता पाहता वेळ भराभर जाऊ लागला.
स्वित्झर्लंडमध्ये असंख्य सरोवरे आहेत. बहुतेक सर्व मोठ्या नद्या त्यांच्या मार्गांत अनेक सरोवरांच्या एका टोकातून आत शिरतात आणि दुसरीकडून बाहेर पडून पुन्हा पुढचा प्रवास सुरू करतात. या नद्या व सरोवरे त्यांच्या मार्गांच्या आजूबाजूच्या प्रदेशाला सुपीक हिरव्या पैठणीने नटवत पुढे जातात. निसर्गाच्या या दानाची स्विस लोक मोठ्या जबाबदारीने जपणूक करून त्याला स्वच्छ आणि नीटनेटके तर ठेवतातच, पण त्यात मानवी कल्पकतेची भर टाकून ते सौंदर्य अधिकाधिक कसे खुलून दिसेल यासाठीही कष्ट घेतात हे सतत जाणवत राहते.
या प्रवासाचा एक तृतियांशापेक्षा जास्त मार्ग झ्युरिक् (७३ X १४ किमी), लाक द नॉयशातेल (३८ X ८ किमी) आणि बिलेरसे (१५ X ४ किमी) या तीन मोठ्या सरोवरांच्या काठाने जातो. स्वच्छ सुंदर सरोवरे; त्यांच्या काठांवरचे सुंदर बगीचे, हिरवळी व जलक्रीडेच्या व्यवस्था; सरोवरांत दिमाखाने जलक्रिडा करणार्या पांढर्या शिडांच्या बोटी; सरोवरांच्या काठावर वसलेली टूमदार गावे व शहरे; असे नजारे सतत दिसत राहतात. हे सगळे पाहताना वेळ मजेत जातो आणि तिथे राहत असलेल्या लोकांबद्दल थोडीशी असूयाही मनात डोकावून जाते…
झ्युरिक् ते जिनिवा : ०१
झ्युरिक् ते जिनिवा : ०२
झ्युरिक् ते जिनिवा : ०३
झ्युरिक् ते जिनिवा : ०४
झ्युरिक् ते जिनिवा : ०५
झ्युरिक् ते जिनिवा : ०६
झ्युरिक् ते जिनिवा : ०७
झ्युरिक् ते जिनिवा : ०८
झ्युरिक् ते जिनिवा : ०९
झ्युरिक् ते जिनिवा : १०
जिनिवा
जिनिवा हे शहर स्वित्झर्लंडच्या दक्षिण-पश्चिम टोकाला फ्रँको-स्विस सीमेवर आहे. स्वित्झर्लंडमध्ये चार अधिकृत भाषा आहेत. सर्वात मोठ्या प्रमाणात जर्मन भाषा बोलली जाते (६३.५%); त्याखालोखाल फ्रेंच (२२.५%), इटॅलियन (८.१%) आणि रोमांश (०.५%) भाषा बोलल्या जातात. रोमांश ही काही विभागांत बोलली जाणारी मूल स्विस भाषा आहे. या देशात अनेक जागतिक संस्थांची मुख्यालये असल्याने, हा देश एक महत्वाचे जागतिक आर्थिक केंद्र आहे आणि पर्यटन हा या देशाचा महत्त्वाचा व्यवसाय आहे; त्यामुळे इंग्लिश भाषा या सर्व देशभर सामान्यपणे वापरली जाते. त्यामुळे एका भाषिक प्रदेशातून दुसर्यात जाताना इंग्लिश बोलू शकणार्या पर्यटकांना भाषेची अडचण येत नाही. झ्युरिक् हे शहर जर्मन भाषिक विभागात येते तर जिनिवा फ्रेंच भाषिक विभागात आहे. ज्याला आपण मराठीत जिनिवा अथवा जिनिव्हा असे म्हणतो त्या नावाचे अनेक उच्चार स्वित्झर्लंडमध्ये मान्यताप्राप्त आहेत... सर्वसामान्यपणे इंग्लिशमध्ये जिनिव (Geneva [dʒɨˈniːvə]; यातला ज 'जिर्यातला' आहे 'जरतारी' मधला नाही); जर्मनमध्ये गेन्फ् (Genf [ɡɛnf]); फ्रेंचमध्ये जनेव (Genève [ʒə.nɛv]); इटॅलियनमध्ये जिनेव्ह्रा (Ginevra [dʒiˈneːvra]) आणि रोमांशमध्ये जिनेव्ह्रा (Ginevra [dʒiˈneːvra])... हुश्श ! पण या लेखामध्ये नावाचा गोंधळ टाळण्यासाठी आपण या शहराला जिनिवा असेच संबोधूया. ;) र्होन (Rhône, र्हाईन नाही) नदी जिनिवा सरोवराच्या एका टोकातून आत शिरून दुसर्या टोकातून बाहेर पडते आणि पुढे जात फ्रान्समध्ये शिरते. सरोवराच्या त्या दुसर्या निमुळत्या टोकदार भागाच्या किनार्यांवर जणू एखाद्या काठीवर भाल्याचे टोक असावे तसे जिनिवा शहर वसले आहे. जिनिवा शहरात र्होनला तिची आर्वं (Arve) नावाची उपनदी येऊन मिळते. म्हणजे या शहरात सरोवरकाठ, नदीकाठ आणि नदीसंगम असा त्रिवेणी जलयोग आहे आणि त्याचा तेथील लोकांनी शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.
जिनिवा : ०१ (जालावरून साभार)
जिनिवा : ०२ (जालावरून साभार)
जिनिवा : ०३ (जालावरून साभार)
जागतिक बौद्धिक संपदा संस्था (World Intellectual Property Organization)
...
जागतिक आरोग्य संघटना(WHO).......जागतिक रेड क्रॉस संघटना (International Committee of the Red Cross)
जिनिवा : बस आणि बस थांबा (जालावरून साभार)
जिनिवा : ट्रॅम (जालावरून साभार)
जिनिवा सरोवराचा किनारा : ०१ : पर्यटकांची अनुपस्थिती, नांगरलेल्या पर्यटक बोटी आणि बंद तिकीट खिडक्या
जिनिवा सरोवराचा किनारा : ०२ : वादळी वारा आणि उसळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर अस्मादिक
जिनिवा सरोवराचा किनारा : ०३
जिनिवा सरोवराचा किनारा : ०४
जिनिवा सरोवराचा किनारा : ०५ : काष्ठशिल्प
जिनिवा सरोवराचा किनारा : ०६
जिनिवा सरोवराचा किनारा : ०७ : पुष्पवाटीकेतले घड्याळ
जिनिवाचा अंतर्भाग : ०१ : मेरी-गो-राउंड
जिनिवाचा अंतर्भाग : ०२ : बी एम डब्ल्यू ची अनवट दुचाकी
जिनिवाचा अंतर्भाग : ०३
जिनिवाचा अंतर्भाग : ०४
जिनिवाचा अंतर्भाग : ०५ : आठवड्याचा बाजार ०१
जिनिवाचा अंतर्भाग : ०६ : आठवड्याचा बाजार ०२
झ्युरिक् कडे परतताना : ०१
झ्युरिक् कडे परतताना : ०२
झ्युरिक् कडे परतताना : ०३
झ्युरिक् कडे परतताना : ०४
झ्युरिक् कडे परतताना : ०५
Book traversal links for शरदातला स्वित्झर्लंड : १२ : जिनिव (जिनिवा)
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments